Lokmat Sakhi >Fitness > दीपिका पडुकोनचा फिटनेस फंडा, ठरवलं तर आपल्यालाही जमेल तिचा हा डाएट-फिटनेस प्लॅन!

दीपिका पडुकोनचा फिटनेस फंडा, ठरवलं तर आपल्यालाही जमेल तिचा हा डाएट-फिटनेस प्लॅन!

दीपिकाच्या मते फिटनेस ही सोपी गोष्ट नाहीये. एकप्रकारची ती आराधना आहे. ती नियम पाळून आणि मन लावून करत नाही तोपर्यंत ती साध्य होत नाही. आणि म्हणूनच व्यायामाचे आणि आहाराचे नियम पाळा आणि फिट राहा हा दीपिकाचा फिटनेस फंडा आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 05:56 PM2021-06-03T17:56:49+5:302021-06-03T18:36:55+5:30

दीपिकाच्या मते फिटनेस ही सोपी गोष्ट नाहीये. एकप्रकारची ती आराधना आहे. ती नियम पाळून आणि मन लावून करत नाही तोपर्यंत ती साध्य होत नाही. आणि म्हणूनच व्यायामाचे आणि आहाराचे नियम पाळा आणि फिट राहा हा दीपिकाचा फिटनेस फंडा आहे.

Deepika Padukone's fitness funda. This is a smart formula that you can easily follow if you decide | दीपिका पडुकोनचा फिटनेस फंडा, ठरवलं तर आपल्यालाही जमेल तिचा हा डाएट-फिटनेस प्लॅन!

दीपिका पडुकोनचा फिटनेस फंडा, ठरवलं तर आपल्यालाही जमेल तिचा हा डाएट-फिटनेस प्लॅन!

Highlights योग अभ्यास हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असल्याचं दीपिका म्हणते.दीपिका बॅडमिंटन खेळाडू आहे.  आता ती अभिनय करत असली तरी तिने तिची बॅडमिंटन खेळण्याची सवय आवड आणि व्यायामाचा भाग म्हणून जपली आहे.योग्य आहार योग्य प्रमाणात घेणं हा दीपिकाचा आहार नियम आहे. दीपिकाच्या आहारतज्ज्ञाच्या मते दीपिका ही स्मार्ट इटर आहे

दीपिका पडुकोन  जेवढी मेहनत आपल्या चित्रपटातील भूमिकांसाठी घेते तितकीच मेहनत ती फिटनेस राखण्यासाठी  घेते. त्यात व्यायाम आणि खाण्या पिण्याचे नियम पाळण्यावर ती ठाम असते. तिच्या मते केवळ अभिनेत्री आहे म्हणून फिटनेस महत्त्वाचा आहे असं नाही तर तुम्ही कोणतंही काम करत असा त्या कामासाठी फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. आणि फिटनेस व्यायाम आणि आहाराचे नियम पाळल्याशिवाय प्राप्त होत नाही . दीपिकाचा व्यायाम आणि आहाराचा फिटनेस फंडा कोणालाही फॉलो करता येईल असा आहे.

फिटनेससाठी दीपिका काय करते?


दीपिकाची ट्रेनर तिला ‘पिलाटे क्वीन’ म्हणते. तिला पिलाटे करण्यास अतिशय आवडतं. शरीराचं संतुलन राखण्यासाठी, शरीराला लवचिकता येण्यसाठी , स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी ती पिलाटे हा व्यायाम नियमित करते.

  •  योग अभ्यास हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असल्याचं दीपिका म्हणते. शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य जपण्यासाठी ती नियमित योग करते. डोक्यातील नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी, चिंता आणि ताण कमी करण्यासाठी, कामातली एकाग्रता वाढवण्यासाठी आपण नियमित योग करत असल्याचं दीपिका म्हणते.
  •  स्नायू मजबूत असतील तरच आपण ताकदीनं कोणतंही काम करु शकतो यावर दीपिकाचा विश्वास आहे. म्हणूनच शरीरातील स्नायुंची ताकद वाढवण्यासाठी ती नियमित पुलअप्स करते. पुलअप्स हाही दीपिकाच्या व्यायामाचा महत्त्वाचा भाग आहे. पुलअप्समधे शरीरातील छोटे, मोठे सर्व स्नायुंचा व्यायाम होतो. शिवाय सांध्यांची हालाचाल करण्यासही सहजता येते. शरीराची ठेवण योग्य करण्यासाठी, पाठ आणि पोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी, शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी तसेच शरीरातील उष्मांक घटवण्यासाठी दीपिका नियमित पुलअप्स करण्यावर भर देते.
  • खेळ हाही एक उत्तम व्यायाम आहे. उलट खेळासारखा दुसरा व्यायाम नाही असं दीपिका म्हणते. दीपिका बॅडमिंटन खेळाडू आहे. पण आता ती अभिनय करत असली तरी तिने तिची बॅडमिंटन खेळण्याची सवय आवड आणि व्यायामाचा भाग म्हणून जपली आहे. सेटवर नसते तेव्हा ती दिवसातला थोडा वेळ तरी बॅडमिंटन खेळण्यासाठी काढतेच.
  • जीममधे जाऊन व्यायाम करणं ही दीपिकाची आवड आणि सवय आहे. पण एखाद्या दिवशी तिला जीममधे जाऊन व्यायाम करणं शक्य नसेल तेव्हा ती जॉगिंग-वॉकिंगचा व्यायाम करुन आपल्या व्यायामाचं टार्गेट पूर्ण करते.
  •  दीपिका नृत्याकडे कला, आवड आणि व्यायाम या नजरेनं बघते. शरीरातील उष्मांक जाळण्यासाठी ती नियमित नृत्याचा सराव करण्यावरही भर देते.

 

दीपिकाचे आहार नियम काय आहेत?

  • योग्य आहार योग्य प्रमाणात घेणं हा दीपिकाचा आहार नियम आहे. दीपिकाच्या आहारतज्ज्ञाच्या मते दीपिका ही स्मार्ट इटर आहे. संतुलित आहार आणि योग्य आहार घटक हा नियम ती कायम पाळते. आपल्या आहारात काय असावं आणि किती असावं याचा दीपिका बारकाईनं विचार करते आणि त्याचं पालनही करते. आहार नियमांच्या बाबत आपण खूप कठोर असल्याचं दीपिका सांगते. पण म्हणून ती आइस्क्रीम-चॉकलेट हे आवडणारे पदार्थ खात नाही असं नाही. तर जे आवडतं तेही प्रमाणात आणि वेळेनुसार खाण्याचा तिचा नियम आहे. दीपिका म्हणते की आहाराचे नियम पाळल्यानं योग्य आहार योग्य प्रमाणात पोटात जातो. त्यातून शरीरास आवश्यक असलेले पोषक तत्त्वं मिळातत, वजन नियंत्रित राहातं, कामाची भरपूर ऊर्जा मिळते, संतूलित आहार घेतल्यानं कायम उत्साह राहातो, ताजंतवानं वाटतं. या कारणांंमुळे घरी असो किंवा सेटवर आहार नियमांच्या बाबत दीपिका स्वत:ला कधीही सूट देत नाही.

  •   तरुण आणि ताजंतवानं दिसण्यासाठी दीपिका मेकअप इतकंच पाणी पिण्याला महत्त्व देते. शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाणं आवश्यक असल्याचं ती म्हणते. मधे मधे ती वेगवेगळ्या भाज्यांचे ज्यूस घेते. भाज्यांच्या रसानं भाज्यांमधील पोषक तत्त्वं, फायबर शरीराल मिळतातच शिवाय शरीरातील पाण्याचं प्रमाणही योग्य राहातं. भरपूर पाणी पिणं आणि आहारात पातळ पदार्थांचा समावेश करणं हा नियम दीपिका पाळते.
  •  घरी बनवलेलं जेवणं हे सर्वात सुरक्षित आणि पौष्टिक असतं, या कारणामुळेच दीपिका घरच्या जेवणाला जास्त महत्त्व देते. बाहेरच्या पदार्थांमधील जास्तीचं मीठ आणि साखर हे शरीरास हानिकारक असल्यानं स्वत:चं आरोग्य जपण्यासाठी दीपिका घरच्या खाण्याला महत्त्वं देते.
  •  एकाच वेळेस खूप खाण्यापेक्षा दीपिका दिवसातून पाच सहा वेळेस थोडं थोडं खाते. आपलं आरोग्य नीट ठेवायचं असेल तर नाश्ता टाळू नये हा दीपिकाचा सगळ्यांनाच सल्ला आहे. आपल्या दिवसाची सुरुवात कोमट पाणी आणि लिंबाच्या रसानं करणारी दीपिका आहारातले नियम काटेकोरपणे पाळले जावेत यासाठी स्वत: तयार केलेला डाएट चार्टचं तंतोतंत पालन करते. दीपिकाच्या मते फिटनेस ही सोपी गोष्ट नाहीये. एकप्रकारची ती आराधना आहे. ती नियम पाळून आणि मन लावून करत नाही तोपर्यंत ती साध्य होत नाही. आणि म्हणूनच व्यायामाचे आणि आहाराचे नियम पाळा आणी फिट राहा हा दीपिकाचा फिटनेस फंडा आहे.

Web Title: Deepika Padukone's fitness funda. This is a smart formula that you can easily follow if you decide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.