Lokmat Sakhi >Fitness > डाएट की व्यायाम वजन कमी करण्यासाठी काय फायद्याचे? ‘हे’ करा- पोषणतज्ज्ञांचा सल्ला, वजन होते कमी...

डाएट की व्यायाम वजन कमी करण्यासाठी काय फायद्याचे? ‘हे’ करा- पोषणतज्ज्ञांचा सल्ला, वजन होते कमी...

Diet vs workout know which one is more effective to lose weight : डाएट आणि वर्कआऊट मधील काय जास्त महत्वाचे ? असा प्रश्न पडला असेल तर न्यूट्रिशनिस्ट सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2024 04:47 PM2024-08-02T16:47:38+5:302024-08-02T17:00:39+5:30

Diet vs workout know which one is more effective to lose weight : डाएट आणि वर्कआऊट मधील काय जास्त महत्वाचे ? असा प्रश्न पडला असेल तर न्यूट्रिशनिस्ट सांगतात...

Diet vs workout know which one is more effective to lose weight Which is more effective in losing weight, diet or exercise Diet vs. exercise: What is better for weight loss | डाएट की व्यायाम वजन कमी करण्यासाठी काय फायद्याचे? ‘हे’ करा- पोषणतज्ज्ञांचा सल्ला, वजन होते कमी...

डाएट की व्यायाम वजन कमी करण्यासाठी काय फायद्याचे? ‘हे’ करा- पोषणतज्ज्ञांचा सल्ला, वजन होते कमी...

सध्याच्या काळात वाढते वजन ही एक कॉमन समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक पर्यायांचा वापर केला जात्तो. वजन कमी करण्यासाठी कुणी डाएट करते तर कुणी जिम. वजन कमी करुन आपण फिट आणि हेल्दी होण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु असतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी शक्यतो आपण डाएट आणि वर्कआऊटची मदत घेतो. काहीजण वजन कमी करण्यासाठी कडकडीत डाएट फॉलो करतात तर काही जिममध्ये जाऊन तासंतास वर्कआऊट करुन आपला घाम गाळतात(Which is more effective in losing weight, diet or exercise).

वजन कमी करण्यासाठी डाएट आणि वर्कआऊट करताना नेमके यातील काय जास्त महत्वाचे आहे, असा प्रश्न अनेकांना पडतोच. वजन कमी करण्याच्या या कठीण जर्नीमध्ये, बहुतेकजण (Diet vs. exercise: What is better for weight loss?) कधी डाएट फॉलो करतात पण वर्कआऊट करायचा कंटाळा करतात. याउलट (Which is better for lose weight workout or diet?) काहीजण तासंतास वर्कआऊट करतात परंतु तोंडावर ताबा नसल्याने डाएटकडे नीट लक्ष देत नाहीत. अशावेळी वजन कमी करण्यासाठी नेमके काय महत्वाचे आहे, डाएट की वर्कआऊट ? ते पाहूयात. फरिदाबादमधील क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या क्झिक्युटिव्ह न्यूट्रिशनिस्ट, मनप्रीत कौर पॉल यांनी डाएट आणि  वर्कआऊट मधील काय जास्त महत्वाचे आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे(Which is more effective in losing weight, diet or exercise).

वजन कमी करण्यासाठी काय अधिक महत्वाचे आहे ?

न्यूट्रिशनिस्ट, मनप्रीत कौर पॉल सांगतात की, वजन कमी करण्यासाठी डाएट आणि वर्कआऊट दोन्ही तितकेच महत्वाचे आहे. परंतु जर का या दोघांमधील सगळ्यात महत्वाचे काय आहे असे विचारल्यास, डाएट हे आवश्यक आहे, असे न्यूट्रिशनिस्ट सांगतात. वजन कमी करण्यासाठी कॅलरी इंन्टेक कमी असणे गरजेचे असते. आपल्या शरीरात कॅलरी इंन्टेक कमी करणे हे वर्कआऊटपेक्षा डाएटने अगदी सहज शक्य होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट देखील महत्वाचे आहे परंतु वर्कआऊट करुन कॅलरी इंन्टेक कमी करणे थोडे कठीण असते.

अनन्याचा फेसमास्क ते दीपिकाचा ब्यूटी रोलर ! बॉलिवूड अभिनेत्रींचे खास होममेड ब्यूटी सिक्रेट... 

 

एक्स्पर्ट सांगतात की, समजा उदाहरणार्थ, एखादया व्यक्तीला एका दिवसाला किमान ५०० कॅलरीज कमी करायच्या असतील तर ते वर्कआऊटच्या माध्यमांतून करणे कठीण होऊ शकते. याउलट, योग्य डाएट चांगल्या पद्धतीने फॉलो केल्यास आपण हे अगदी सहजपणे करु शकता. 

पावसाळ्यातही फ्रिजमधलं थंड पाणी घटाघट पिताय? तज्ज्ञ सांगतात, गार पाणी पिण्याने काय होतं..

आपल्या शरीरातील स्नायूंच्या मजबुतीसाठी, चयापचय क्रिया योग्य पद्धतीने चालावी आणि हृदयाच्या आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी वर्कआऊट आवश्यक आहे. डाएट आणि वर्कआऊट या दोन्हींचे  योग्य पद्धतीने केलेले प्लॅनिंग हे कायमस्वरूपी वजन कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय  आहे. योग्य डाएटसोबत नियमित वर्कआऊट केल्यास वजन कमी करण्याचे उद्दिष्ट जलद आणि आरोग्यदायी मार्गाने गाठता येते.  

वर्कआऊट आणि डाएटमध्ये, डाएट जास्त महत्वाचे असलयाने डाएटमध्ये नेमके काय खावे ते पाहूयात... 

१. फळे आणि भाज्या
२. प्रोटीनयुक्त पदार्थ 
३. कडधान्य 
४. हेल्दी फॅट्स 
५. बीन्स

Web Title: Diet vs workout know which one is more effective to lose weight Which is more effective in losing weight, diet or exercise Diet vs. exercise: What is better for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.