Lokmat Sakhi >Fitness > दिवाळीत खा खा खाल्लं आता 'डल' वाटतंय? हे घ्या बॉडी डिटॉक्सचे ५ उपाय; रुटीन ताळ्यावर फास्ट!

दिवाळीत खा खा खाल्लं आता 'डल' वाटतंय? हे घ्या बॉडी डिटॉक्सचे ५ उपाय; रुटीन ताळ्यावर फास्ट!

दिवाळीत नातलग, मित्रमंडळी यांच्या गोतावळ्यात जीभेवरचा कंट्रोल सुटला आणि अगदी पोटाच्या वर जेवणं झाली.... हे सगळं आता अंगावर येत आहे... म्हणूनच तर आपली फिटनेस आणि डाएटची बिघडलेली गाडी ताळ्यावर येण्यासाठी गरज आहे बॉडी डिटॉक्स करण्याची. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 01:56 PM2021-11-08T13:56:23+5:302021-11-08T14:03:05+5:30

दिवाळीत नातलग, मित्रमंडळी यांच्या गोतावळ्यात जीभेवरचा कंट्रोल सुटला आणि अगदी पोटाच्या वर जेवणं झाली.... हे सगळं आता अंगावर येत आहे... म्हणूनच तर आपली फिटनेस आणि डाएटची बिघडलेली गाडी ताळ्यावर येण्यासाठी गरज आहे बॉडी डिटॉक्स करण्याची. 

Digestion problems after Diwali? Here are 5 body detox remedies; | दिवाळीत खा खा खाल्लं आता 'डल' वाटतंय? हे घ्या बॉडी डिटॉक्सचे ५ उपाय; रुटीन ताळ्यावर फास्ट!

दिवाळीत खा खा खाल्लं आता 'डल' वाटतंय? हे घ्या बॉडी डिटॉक्सचे ५ उपाय; रुटीन ताळ्यावर फास्ट!

Highlightsअति खाण्यामुळे शरीरात जे टॉक्सिन्स तयार झाले आहेत, ते एकदा बाहेर काढण्याची गरज असते. यालाच बॉडी डिटॉक्स करणे म्हणतात. 

दिवाळीचा फराळ म्हणजे तेलकट, तुपकट आणि गोड पदार्थांचा भरपूर मारा. यात जेव्हा कुटुंबातली सगळी मंडळी, इतर नातलग, मित्रमंडळी एकत्र जमतात, तेव्हा आग्रहाखातर आणखी जास्त खाल्ले जाते. बरं त्यातही गाडी दिवाळीच्या फराळापर्यंतच मर्यादित राहात नाही. फराळासोबत मग मस्त चमचमीत आणि सुग्रास भोजनाचा बेत आखला जातो. यामुळे मग फराळ आणि भरपेट जेवण असा पोटावर वारंवार मारा होत जातो. खूप जणांना या अतिजेवणाचा त्रास होतो आणि मग ॲसिडीटी, अपचन, पोटदुखी, अस्वस्थता असे सगळे त्रास जाणवू लागतात. अति खाण्यामुळे शरीरात जे टॉक्सिन्स तयार झाले आहेत, ते एकदा बाहेर काढण्याची गरज असते. यालाच बॉडी डिटॉक्स करणे म्हणतात. 

 

फिट राहण्यासाठी ठराविक काळानंतर बॉडी डिटॉक्स करणे हा एक अतिशय चांगला उपाय आहे. यामुळे शरीरातील सगळेच विषारी घटक बाहेर टाकले जातात. म्हणजेच शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते. बॉडी डिटॉक्स केल्याने अनेक त्रास कमी होतात. कारण या प्रक्रियेमध्ये शरीरातील यकृत, किडनी, फुफ्फुसे, त्वचा यांच्यामधील विषारी घटक बाहेर पडतात. बाॅडी डिटॉक्स करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असून हे ५ उपाय अतिशय सोपे आणि प्रत्येकाला सहज जमण्यासारखे आहेत. 

 

अशा पद्धतीने करा बॉडी डिटॉक्स
१. कार्बोहायड्रेट्स भरपूर खा

बॉडी डिटॉक्स करणे म्हणजे खूप कमी प्रमाणात अन्न पोटात जाणे. या प्रक्रियेत पोटावर अन्नाचा मारा करायचा नसतो. त्यामुळे कमी अन्न खाऊनही शक्ती टिकवून ठेवायची गरज असते. यासाठी कार्बोहायड्रेट्स भरपूर असणारे पदार्थ दोन दिवस जास्त प्रमाणात खावेत. असे केल्यामुळे पाेट भरल्यासारखे वाटते अणि वारंवार भूक लागत नाही. दूध, दही, ताक, लस्सी, डाळींचे पाणी, भात, बीन्स, वाटाणे या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कार्बाेहायड्रेट्स असतात. 

 

२. ग्रीन टी
बॉडी डिटॉक्स करण्यासाठी ग्रीन टी हा देखील एक उत्तम पर्याय आहे. यासाठी दिवसातून चार ते पाच वेळा ग्रीन टी प्या. ग्रीन टीमध्ये संत्री, मोसंबीचा रस टाकल्यास अधिक चांगले. ग्रीन टीमध्ये लिंबू पिळून टाकल्यानेही चांगला फायदा होतो. 

 

३. दररोज सकाळी प्या कोमट पाणी
बॉडी डिटॉक्स करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे दररोज सकाळी कोमट पाणी घेणे. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळा आणि त्यात एक टेबलस्पून मध टाका. असे पाणी पिऊनच सकाळची सुरुवात करा. हा उपाय दररोज नियमितपणे केल्यास वेटलॉससाठी देखील ते खूपच फायद्याचे ठरते. 

 

४. फळांचा रस आणि भाज्यांचे सूप
फळ आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, फॉलिक ॲसिड, लोह व पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे फळांचा फ्रेश रस घेतला तर त्यामुळे शरीर शुद्ध होते आणि त्यातून खूप उर्जा मिळते. तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे बॉडी डिटॉक्स करण्यासाठी फळांचा रस आणि भाज्यांचे सूप जास्त प्रमाणात घेणे गरजेचे आहे. 

 

५. भरपूर पाणी प्या
पाणी जेवढे जास्त प्यायले जाईल तेवढे ते शरीराचे शुद्धीकरण करण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे बॉडी डिटॉक्स करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. ८ ते १० ग्लास पाणी दिवसभरातून पोटात गेलेच पाहिजे याची काळजी घ्या. पाणी जास्त प्यायल्यामुळे किडनी, यकृत आणि त्वचा या तिघांचेही डिटॉक्सिफिकेशन होते. शरीर आतून स्वच्छ होत जाते. शरीर आतून स्वच्छ झाल्यामुळे ॲसिडीटी, अपचन, अस्वस्थता, थकवा असे त्रास कमी होतात.

 

६. उपवास करा
उपवास करणे हा देखील बॉडी डिटॉक्स करण्याच एक उत्तम उपाय आहे. पण उपवास करायचा म्हणून त्यादिवशी भगर, साबूदाणा, तळलेले, तुपकट पदार्थ खाणे असे टाळा. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी थोडा वेगळ्या पद्धतीने उपवास करा. यादिवशी शिजवलेले कोणतेही अन्न खाऊ नका. त्यापेक्षा दूध, दही, ताक, फळे, कच्च्या भाज्या, सॅलड असं काही खा. 
 

Web Title: Digestion problems after Diwali? Here are 5 body detox remedies;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.