Lokmat Sakhi >Fitness > तब्येत लुकडीच पण पोट खूप सुटलंय? रात्री खा ४ पदार्थ, पोट होईल कमी

तब्येत लुकडीच पण पोट खूप सुटलंय? रात्री खा ४ पदार्थ, पोट होईल कमी

Dinner options for weight loss : रात्रीचं जेवण हलकं असल्यास वजन कमी करण्यास मदत होते. ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. रात्रीच्या जेवणासाठी उत्तम असे ४ पदार्थ पाहूया. ज्यामुळे वजन कमी करणं अधिक सोपं होऊ शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 11:47 AM2023-03-09T11:47:22+5:302023-03-09T14:22:55+5:30

Dinner options for weight loss : रात्रीचं जेवण हलकं असल्यास वजन कमी करण्यास मदत होते. ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. रात्रीच्या जेवणासाठी उत्तम असे ४ पदार्थ पाहूया. ज्यामुळे वजन कमी करणं अधिक सोपं होऊ शकतं.

Dinner options for weight loss : Weight loss light food for dinner which will reduce your weight and fill your stomach | तब्येत लुकडीच पण पोट खूप सुटलंय? रात्री खा ४ पदार्थ, पोट होईल कमी

तब्येत लुकडीच पण पोट खूप सुटलंय? रात्री खा ४ पदार्थ, पोट होईल कमी

दिवसभराच्या आहारात नाश्ता हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. रात्रीचं जेवण थोडं हलकं असावं आणि नाश्ता हेवी असावा. जर तुम्ही योग्य पद्धतीनं वेट लॉस करण्याचा प्रयत्न केला तर रात्री झोपण्याच्या ३ ते ४ तास आधी  जेवायला हवं. (Health Tips)  यामुळे चांगली झोप येते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि पचनक्रियेत सुधारणा होते. याशिवाय रात्रीचं जेवण हलकं असल्यास वजन कमी करण्यास मदत होते. ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. रात्रीच्या जेवणासाठी उत्तम असे ४ पदार्थ पाहूया. ज्यामुळे वजन कमी करणं अधिक सोपं होऊ शकतं. (Weight loss light food for dinner which will  reduce your weight and fill your  stomach)

ओट्स इडली

ओट्स इडली एक फायबरयुक्त पदार्थ आहे. जो हलका आहारत असून चवीला उत्तम असतो. सकाळच्या नाश्ता किंवा रात्रीच्या जेवणात तुम्ही ओट्स इडलीचा समावेश करू शकता. दक्षिण भारतात हा पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. याशिवाय यात कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

मूग डाळ डोसा

पिवळ्या मूग डाळमध्ये भरपूर फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते, जे रक्तदाब राखण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते.

पपई

पपईमध्ये पपेन नावाचे नैसर्गिक पाचक एंझाइम असते, जे फुगणे, बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या लक्षणांपासून आराम देते. ते हलके देखील आहेत आणि त्यामुळे वजन कमी करण्यास मदत करतात.

बारीक व्हायचंय पण डाएट, व्यायामाचा कंटाळा येतो? ५ टिप्स, झरझर घटेल वजन, स्लिम दिसाल

बेसनाची पोळी

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि रात्री हलके जेवण करण्याचा विचार करत असाल तर बेसनाचा चीला योग्य आहे. बेसन चीला वजन कमी करण्यास मदत करण्यासोबतच अतिशय हलका पदार्थ आहे.  याशिवाय तुम्ही ब्राऊन राईसचाही आहारात समावेश करू शकता. 

Web Title: Dinner options for weight loss : Weight loss light food for dinner which will reduce your weight and fill your stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.