Lokmat Sakhi >Fitness > फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

Diwali sweets: 5 ways to make diet-friendly mithai : दिवाळीनंतर पचनक्रिया सुधारण्यासाठी करून पाहा ५ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2024 18:14 IST2024-11-04T16:54:07+5:302024-11-04T18:14:30+5:30

Diwali sweets: 5 ways to make diet-friendly mithai : दिवाळीनंतर पचनक्रिया सुधारण्यासाठी करून पाहा ५ गोष्टी

Diwali sweets: 5 ways to make diet-friendly mithai | फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

दिवाळी (Diwali 2024) या सणानिमित्त भरपूर खाणं होतंच. फराळ, मिठाई, फ्राईड पदार्थ, चमचमीत पदार्थ आपण आवडीने खातो (Diwali Faral). जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पाहूनही आपण या पदार्थांना दुर्लक्ष करू शकत नाही (Healthy Diet). पण नंतर याचा त्रासही होतो. वजन वाढतं, पचनक्रियेत अडचण येते, यासह खाल्लेलं व्यवस्थित पचतही नाही (Indigestion). वजन वाढलं की, पश्चाताप होतो. या दिवसात खाल्लेलं व्यवस्थित पचत नसेल तर, नक्की काय करावं?

यासंदर्भातील माहिती देताना, डॉक्टर निधी धवन यांनी सांगितले की, 'दिवाळीत आपलं भरपूर खाणं होतं. मिठाई, फराळ आणि फ्राईड पदार्थ खाल्ल्याने वजन वाढतं आणि पचनक्रियेत अडथळे येतात. याचा त्रास होऊ नये म्हणून काही डाएट टिप्स फॉलो करणे गरजेचं आहे. यामुळे नक्कीच बॉडी डिटॉक्स होईल'(Diwali sweets: 5 ways to make diet-friendly mithai).

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी फॉलो करा काही टिप्स

मसालेदार, गोड आणि फ्राईड पदार्थ खाल्ल्याने शरीरात अनेक बदल घडतात. अशावेळी शरीर डिटॉक्स करणं गरजेचं आहे. वेळीच बॉडी डिटॉक्स केली नाही तर, पचनाच्या निगडीत समस्या उद्भवू शकतात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी आपण डिटॉक्स ड्रिंक बनवू शकता. यासाठी रात्री एका ग्लासमध्ये मेथी दाणे, दालचिनी, तुळशीची पानं टाकून त्यावर झाकण ठेवा. सकाळी गाळून हे पाणी प्या. यामुळे पचनक्रिया सुधारेल.

फुग्यासारख्या गोलगुबगुबीत झालाय चेहरा? स्वयंपाकघरातले ५ पदार्थ करतील जादू-चेहऱ्यावरची चरबी कमी होईल चटकन

हिरव्या पालेभाज्या खा

हिवाळ्यात पालेभाज्या मोठ्या प्रमाणात मिळतात. आपल्या आहारात शक्य तितक्या पालेभाज्यांचा समावेश करा. यामुळे शरीराला बरेच फायदे मिळू शकतात. यामुळे पचनक्रिया सुधारते, आणि कमी वेळात अन्न पचते.

बिन्स खा

विविध प्रकारच्या बिन्समध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरातील पौष्टीक गरजा पूर्ण होतात. यासह मसल्स बिल्ड होतात. यामध्ये फायबरचेही प्रमाण जास्त असते. जे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. ज्यामुळे वेट लॉस होते.

रवा घालून नाश्ता तयार करा

सकाळी नाश्त्याला रवा घालून उपमा, इडली, डोसा बनवून खाऊ शकता. हे पदार्थ खाल्ल्याने फक्त चव नाही तर, शरीराला पौष्टीक घटकही मिळतात. जे वेट लॉससाठी मदत करतात.

दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन

स्मुदी

जर आपल्याला ज्यूस प्यायला आवडत नसेल तर, आपण स्मुदीही तयार करून पिऊ शकता. स्मुदी प्यायल्याने पचनसंस्था निरोगी राहते आणि वेट लॉससाठी मदत होते. 

Web Title: Diwali sweets: 5 ways to make diet-friendly mithai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.