Join us  

दिवाळीत दिसायचंय सुडौल-सुंदर? आतापासूनच आहारात करा १० सोपे बदल, काही दिवसात बेली फॅट होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2023 2:08 PM

Diwali weight loss tips: 10 smart ways to prevent belly fat : बेली फॅटमुळे ट्रेडीशनल विअर खराब दिसते, आहारात करा १० सिंपल बदल, होईल वेट लॉस झटकन

पोटाभोवती साचलेली चरबी कमी करण्यासाठी लोकं अनेक उपाय करून पाहतात. काहींचे हात-पाय सडपातळ मात्र. पोटाभोवती चरबी वाढत जाते. वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आपण फॉलो केलेले उपाय उपयुक्त ठरतीलच असे नाही. बेली फॅट कमी करण्यासाठी व्यायामासह डाएटकडेही विशेष लक्ष द्यायला हवे. मुख्य म्हणजे आपण कॅलरीज इनटेक किती प्रमाणात करत आहोत, यावर आपले फॅट्स किती प्रमाणात बर्न होईल हे ठरते.

जंक-प्रोसेस्ड, तळकट, गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे पोटाभोवती चरबी जमा होते. आता काही दिवसांवर दिवाळी हा सण येऊन ठेपला आहे. आपल्याला देखील दिवाळी आऊटफिटमध्ये सुंदर-सुडौल दिसायचं असेल तर, आहारतज्ज्ञ मनप्रीत कालरा यांनी सांगितलेल्या १० वेट लॉस टिप्स नक्की फॉलो करून पाहा(Diwali weight loss tips: 10 smart ways to prevent belly fat).

बेली फॅट कमी करण्यासाठी डाएटमध्ये आणा खास १० बदलाव

नट्स खा

नियमित सुकामेवा खा. बदाम, काजू, अक्रोड रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळची सुरुवात भिजलेल्या सुकामेव्यांनी करा.

प्रोटीनयुक्त नाश्ता खा

सुका मेवा खाल्ल्यानंतर प्रोटीनयुक्त नाश्ता खा. आपण नाश्त्यामध्ये विविध डाळींचा डोसा, किंवा इतर हेल्दी पदार्थ खाऊ शकता.

अॅप्पल सायडर व्हिनेगर

लंच करण्याआधी एक ग्लास पाण्यात एक चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर घालून मिक्स करा. व दुपारच्या जेवणाआधी अर्धा तास आधी प्या.

तूप

दुपारचं जेवण करण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर करा. तुपामधील विशिष्ट गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

वाढत्या वजनापुढे हतबल आहात? रात्री झोपताना कोमट पाण्यात ‘हा’ चिमूटभर पदार्थ घालून प्या, फॅट्स होतील गायब

दही

दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश नक्कीच करा. दह्यामधील घटक शरीरात गुड बॅक्टेरियाची वाढ करतात.

बाजरीची भाकरी

बरेच जण दुपारच्या जेवणात चपाती खातात. पण गव्हाच्या पिठाच्या चपात्या खाण्याऐवजी बाजरी, ज्वारी किंवा नाचणीची भाकरी खा. यामुळे वजन वाढणार नाही.

जेवणानंतर गोड पदार्थ खाणं टाळा

जेवणानंतर गोड पदार्थ खाणं टाळा, जेवल्यानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते. त्याऐवजी दालचिनीचा चहा प्या.

पोटाची चरबी, कंबरेच्या वाढलेल्या घेरामुळे त्रस्त आहात? रोज खा ५ पैकी एकतरी भाजी, पोट होईल सपाट

रॉक मीठ

रात्रीच्या जेवणात सामान्य मिठाच्या ऐवजी रॉक मीठ वापरण्याचा प्रयत्न करा. सैंधव मीठ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे पचन सुधारते, वजन कमी होते.

वेळेवर जेवा

रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान ३ तास आधी करा. तसेच, रात्रीच्या जेवणानंतर २० मिनिटे शतपावली करा. यामुळे जेवण लवकर पचते.

सकाळी होममेड फॅट बर्नर पेय प्या

आपल्या दिवसाची सुरुवात बेली फॅट बर्नर ड्रिंकने करा. यासाठी, एका पॅनमध्ये कपभर पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चिमुटभर हळद, काळी मिरी पावडर, सुंठ पावडर, रॉक मीठ घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर चहाच्या गाळणीने पाणी गाळून घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस मिक्स करून होममेड फॅट बर्नर पेय रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या.

टॅग्स :दिवाळी 2023वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स