Join us  

व्यायामासाठी वेळच नाही, ५ मिनिटांचे स्ट्रेचिंग करा... बघा फिटनेससाठी तज्ज्ञांनी सांगितलेले ५ व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2023 8:08 AM

5 Important Stretches For Fitness: हे ५ स्ट्रेचेस नियमितपणे केले तरी कित्येक दुखणी बरी होऊ शकतात शिवाय फिटनेसही टिकून राहतो.

ठळक मुद्दे५ मिनिटांचे हे स्ट्रेचिंग प्रकार पाठीचे दुखणे, खांदादुखी, कंबर आखडणे, हॅमस्ट्रिंग असे अनेक आजार कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील. 

व्यायाम करण्यासाठी अनेक जणांकडे पुरेसा वेळ नसतो. कुणाकडे वेळ असतो, पण व्यायामाचा कंटाळा येतो. या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना शरीराचा फिटनेस टिकवून ठेवायचा असेल, तर काही स्ट्रेचिंग प्रकार करायलाच हवेत. नेमके कोणते स्ट्रेचेस करायचे, कसे आणि किती वेळ करायचे, याविषयीची माहिती सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी नुकतीच एका व्हिडिओद्वारे शेअर केली आहे. ५ मिनिटांचे हे स्ट्रेचिंग प्रकार (5 types of stretching in 5 minutes) पाठीचे दुखणे, खांदादुखी, कंबर आखडणे, हॅमस्ट्रिंग असे अनेक आजार कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील. 

स्ट्रेचिंगचे ५ प्रकार १. पहिला व्यायाम करण्यासाठी भिंतीच्या समोर उभे रहा. उजव्या हाताने भिंतीचा आधार घेतला असेल तर डावा पाय गुडघ्यात वाकवून मागच्या बाजूने वर करा. त्यानंतर डाव्या हाताने डावा पाय शक्य तेवढा मागे ओढा.

राधिका मर्चंटचा मेहंदी कार्यक्रमाचा घागरा असा भारी की..... बघा अंबानी परिवाराच्या सुनबाईंचा थाट 

ही अवस्था ५ ते १० सेकंद टिकवा. या अवस्थेत असताना पाठीला बाक आलेला नको. शिवाय तुम्ही खूप जास्त भिंतीवर झुकलेले नको. आता असाचा व्यायाम उजव्या पायानेही करा.

 

२. दुसरा व्यायाम करण्यासाठी पुन्हा एकदा भिंतीचा आधार घ्या. दोन्ही तळहात भिंतीवर टेकवा. भिंतीपासून दूर जा. त्यानंतर कंबरेतून भिंतीच्या दिशेने खाली वाका. यावेळी तुमचे पाय आणि जमीन यात ९० अंशाचा कोन असावा. तसेच कंबरेतून झुकल्यानंतरही पाठीचा कणा ताठ असावा. हे स्ट्रेचिंगही ५ ते १० सेकंद करा.

अस्सल पंजाबी चवीची ढाबास्टाईल दाल- मखनी करा घरीच, ही बघा एक चवदार रेसिपी

३. तिसरा व्यायाम करण्यासाठी उभे राहुन दोन्ही पायांत थोडे अंतर घ्या. डावा तळपाय डाव्या बाजुला तर उजवा तळपाय उजव्या बाजूने बाहेर काढा. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा. आता दोन्ही हात सरळ रेषेत समोर करा आणि एकमेकांत गुंफून घ्या. या अवस्थेत ५ ते १० सेकंद रहा.

 

४. स्ट्रेचिंगचा चौथा प्रकार म्हणजे दोन्ही हात पाठीमागे न्या आणि जसे आपण नमस्कार करताना दोन्ही तळहात जोडतो, तसेच ते पाठीवर जोडा. ही स्थितीही ५ ते १० सेकंद टिकवा.

छोले छान जमतात, पण भटुरे फुगतच नाहीत? ही बघा रेसिपी- टम्म फुगणारे कुरकुरीत भटुरे..

५. पाचवा व्यायाम म्हणजे उजवा हात वर करा. कोपऱ्यात वाकवा आणि त्यानंतर उजवा तळहात पाठीवर मध्यभागी लावा. डाव्या हाताने उजव्या हाताचा कोपरा ओढून धरा. हाच व्यायाम आता डाव्या हातानेही करा.

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाम