उन्हाळ्याच्या गरमीने हैराण झालेला प्रत्येकजण पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहात असतोच. पावसाळा सुरु झाला की सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरते. या थंडगार वातावरणाचा आनंद घ्यायला आपण प्रत्येकजण उत्सुक असतोच. पावसाळ्यात आपण बरेचदा गरमागरम चहा व भजी खाण्याचा आनंद लुटतो. असे असले तरीही या वातावरणात आपल्याला खूपच सुस्ती व आळस आल्यासारखे होते. खरंतर सततच्या पावसामुळे, आपल्याला व्यायामासाठी किंवा फिरायला घराबाहेर पडता येत नाही. अशा स्थितीत शारीरिक हालचालींच्या अभावामुळे दिवसभर अंगात आळस भरून राहतो.
दिवसभर अंगात आळस भरून राहिल्यामुळे आपल्याला इतर कामे करायला कंटाळा येतो. पावसाळ्याच्या दिवसांत सगळीकडेच साचलेले पाणी, चिखल यांसारख्या इतर अडचणींमुळे आपल्याला बाहेर फिरायला किंवा व्यायाम करायला जाता येत नाही. अशावेळी घरी राहून नेमका व्यायाम कसा करावा किंवा आपल्या फिटनेसकडे लक्ष कसे द्यावे याबाबत मोठा प्रश्नच आपल्यासमोर निर्माण होतो. अशा परिस्थितीत, आपण घरच्या घरी आपली रोजची कामे करता करता थोडा व्यायाम करून आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करु शकतो(Do not make rain an excuse, complete your 10,000 steps at home).
पावसाळ्यांत घरीच बसून आपण आपला फिटनेस कसा राखू शकतो ?
१. घरातल्या घरात फेऱ्या मारा :- पावसाळ्याच्या दिवसांत आपण घराबाहेर जाऊन वॉल्क करु शकत नाही. अशावेळी 'इनडोअर वॉक' हा शारीरिक हालचाल सुरु ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यासाठी, आपण आपला आवडता टीव्ही कार्यक्रम पाहताना, गाणी ऐकताना किंवा फोनवर बोलत असताना एकाच जागी बसून न राहता चालत चालत ही सगळे कामे करु शकता. असे केल्याने, आपल्या शरीराची सतत थोडी का होईना हालचाल होत राहते. ज्यामुळे आपण शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह राहाल.
सकाळी उठल्या उठल्या प्या १ ग्लास डिटॉक्स वॉटर, दिवसभर एनर्जी भरपूर-थकवा गायब...
२. आवडत्या गाण्यावर डान्स करा :- जर आपण पावसाळ्यात घरी राहून व्यायाम करण्याचा पर्याय शोधत असाल, तर यासाठी आपल्या डेली रुटीनमध्ये डान्स किंवा एरोबिक्सचा समावेश करू शकता. झुम्बा, स्किपिंग, जंपिंग जॅक आणि हॉपिंग अशा अॅक्टिव्हिटी आहेत ज्या घरी सहजपणे करता येतात.
घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...
३. बॅडमिंटन किंवा टेबल टेनिस खेळा :- याशिवाय आपण आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत टेबल टेनिस, बॅडमिंटन किंवा मिनी गोल्फसारखे इनडोअर गेम्स देखील खेळू शकता. या अॅक्टिव्हिटीज केवळ आपल्याला अॅक्टिव्हच ठेवत नाहीत तर दिवसभर तजेलदार आणि फ्रेश राहण्यास देखील मदत करतात.
पोट सुटले, टायर दिसतात ? ५ सोपे उपाय, पोट होईल कमी...
४. घरातील कामे करा :- पावसाळ्यात शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह राहण्यासाठी आपण घरातील कामेही करू शकता. यासाठी, आपण जिने चढणे आणि उतरणे, घराची साफसफाई करणे आणि पुसणे यासारखी दैनंदिन कामे करू शकता.
वजन कमी करण्यासाठी कोणती फळे खाणे योग्य ? ती नेमकी कधी खावी ? चूक झाली की वजन वाढलेच...
५. ऑफिस किंवा अपार्टमेंटच्या हॉलवेमध्ये फिरा :- पावसामुळे आपण बरेचदा बाहेर फिरायला जाऊ शकत नाही अशावेळी आपण ऑफिस किंवा अपार्टमेंटच्या हॉलवेमध्ये फेऱ्या मारु शकता. एवढेच नव्हे तर आपण ज्या ठिकाणी राहता त्या अपार्टमेंटच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये किंवा हॉलवेमध्ये शतपाऊली करू शकता. अशी ठिकाणे आपल्याला चालण्यासाठी पुरेशी जागा देतात यामुळे पावसाळ्यातही आपण आपला फिटनेस व्यवस्थितपणे सांभाळू शकता.
६. घरात ट्रेडमिलचा वापर करु शकता :- पावसाळ्यात बाहेर फेरफाटक मारणे सहज शक्य होत नाही अशावेळी आपण घरात किंवा जिममध्ये असणाऱ्या ट्रेडमिलचा वापर करु शकता.