जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात त्यांना सतत वजन चेक करण्याची सवय असते पण वजन करण्याआधी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. कधी वजन करावं कधी करू नये हे माहीत असायला हवं. कारण यावेळी तुमचं वजन कमी दिसण्याऐवजी जास्त दिसू शकतं. यामुळे तुम्हाला गिल्ट येऊ शकतं आणि तुम्ही डिमोटिव्हेट होऊ शकतात. कोणत्यावेळी वजन करायचे नाही बाबत न्युट्रिशनिस्ट अंबिका दत्त यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे. (Do not weight yourself in these 5 conditions)
जेवल्यानंतर लगेच वजन करू नका
जेवल्यानंतर तुमचे शरीर पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी पाण्याचे प्रमाण योग्य राखते. यामुळे वॉटर रिटेंशन वाढते आणि शरीर वजन व्यवस्थित दाखवत नाही. जेवण आणि पातळ पदार्थांची वजनात भर पडल्यामुळे वजन जास्त दिसू शकतं.
गॅस झाला असेल तर वजन करू नका
गॅसमुळे शरीरात अधिकाधिक पाणी जमा झालेले असते. यामुळे सूज, वजनात चढ- उतार होऊ शकते. यामुळे वजनावर परिणाम होतो आणि शरीर योग्य वजन दर्शवत नाही. गॅस जास्त झाल्यामुळे शरीरातील मल व्यवस्थित बाहेर पडत नाही. मलाची वजनात भर पडल्यामुळे वजन जास्त दिसू शकतं.
पार्टीवरून आल्यानंतर वजन तपासू नका
पार्टी आणि विशेष प्रसंगात अशा खाद्यपदार्थांचा समावेश असतो. ज्यात कॅलरीज, सोडीयम आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. यामुळे वॉटर रिटेंशन आणि सूज वाढते आणि वजनातही वाढ होते. त्यामुळे योग्य वजन दिसत नाही कारण डायजेटिव्ह सिस्टिमवर याचा परिणाम होतो.
झोप पूर्ण झालेली नसेल तेव्हा
झोप लेप्टिन यांसारखे भूकेच्या हॉर्मेन्सचं नियमित करण्यात महत्वाची भूमिका बजावते. जर तुम्ही योग्य प्रमाणात झोप घेतली नाही तर हॉर्मोन्सवर याचा परिणाम होऊ शकतो आणि भूक जास्त लागते, ज्याचा वजनावर परिणाम होतो. मेटाबॉलिझ्म सुरळीत चालण्याासाठी झोप आवश्यक आहे. यामुळे कॅलरीज बर्न करण्यात मदत होते.
पिरिएड्सच्या आधी आणि नंतर
पिरिएड्सच्या आधी आणि नंतर हार्मोनल बदल, मेटाबॉलिझ्म आणि उर्जेचा स्तर प्रभावित होतो यातील चढ उतारामुळे वजनात बदल दिसून येतो. म्हणून पिरिएड्सच्या आधी आणि नंतर वजन करू नका.