प्लास्टिकचा आपल्या जीवनावर इतका परिणाम झाला आहे की, आजच्या जगाची प्लास्टिकशिवाय कल्पनाही करता येत नाही. पिण्याच्या पाण्याच्या बाटलीपासून जेवणाच्या डब्यापर्यंत, प्रत्येक गोष्टीत प्लास्टिक आहेच. परंतु, याच्या दुष्परिणामांबद्दल कोणाला फारशी माहिती नाही. प्लास्टिकचा वापर मानवी शरीरासाठी किती घातक ठरू शकते, हे जाणून घेणं खुप गरजेचं आहे.
प्लास्टिक बॉटलमधून पाणी पिणे हे जितके आरोग्यासाठी घातक आहे, तितकेच यामुळे वजन देखील वाढू शकते. आता तुम्ही म्हणाल, वजन फक्त अनहेल्दी आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे वाढते. पण वजन वाढण्यामागे सतत प्लास्टिक बॉटलमधून पाणी पिणे, हे देखील एक मुख्य कारण आहे. ते कसे? यासंदर्भात, आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी माहिती दिली आहे(Do plastic water bottles make you gain weight?).
प्लास्टिक बॉटलमधून पाणी प्यायल्याने खरंच वजन वाढते का?
प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी प्यायल्याने आरोग्याला हानी पोहचू शकते. यासह रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होऊन, अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. विशेषतः पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होण्यास सुरुवात होते.
एक समोसा खाल्ल्याने आरोग्यावर किती परिणाम होतो? कॅलरीज बर्न करण्यासाठी काय करायला हवे?
प्लास्टिक बॉटलमधून पाणी प्यायल्याने वजन कसे वाढते?
प्लास्टिक बॉटलमधून पाणी प्यायल्याने वजनावर परिणाम होऊ शकतो. पोटाची चरबी वाढण्यासोबतच चेहऱ्यावर केस, मुरुम आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मुख्य म्हणजे, या सर्व गोष्टी शरीरातील प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होते.
प्लास्टिकमध्ये बीपीए असते. ज्यामुळे एंडोक्राइन सिस्टममध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. अशा वेळी शरीरात इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढू लागते, ज्यामुळे इन्शुलिनची पातळी बिघडते. इन्शुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते. त्यामुळे पोटाभोवती चरबी जमा होऊ लागते.
प्लास्टिक वापरणे बंद करा
- पोटाची चरबी कमी करण्यासाठी, आधी प्लास्टिकचा वापर कमी करा. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये किंवा डब्यात पदार्थ ठेऊ नका. त्याऐवजी स्टेनलेस स्टील किंवा काचेचे कंटेनर वापरा. व पाणी पिण्यासाठी नेहमी स्टीलच्या ग्लासचा वापर करा.
- एकदा वापरून झालेल्या प्लास्टिक बाटल्यांचा वापर पुन्हा करू नका.
कशाला हवा टूथब्रश? बोटाने दात घासले तर काय बिघडतं? डेंटिस्ट सांगतात..
- पॅक्ड फूड खाणे टाळा. घरातील फ्रेश शिजवलेले अन्न खा.
- मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये अन्न गरम करू नका.