Lokmat Sakhi >Fitness > तासंतास बसून काम करताय? बैठ्या जीवनशैलीमुळे पोट - कंबर सुटले? ५ उपाय - वजन वाढणार नाही...

तासंतास बसून काम करताय? बैठ्या जीवनशैलीमुळे पोट - कंबर सुटले? ५ उपाय - वजन वाढणार नाही...

Do sit down jobs make you gain weight? 5 Tips to Reduce Weight वजन वाढण्याचं टेन्शन सोडा, लाईफस्टाईलमध्ये करा ५ सोपे बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2023 02:17 PM2023-09-06T14:17:00+5:302023-09-06T16:33:14+5:30

Do sit down jobs make you gain weight? 5 Tips to Reduce Weight वजन वाढण्याचं टेन्शन सोडा, लाईफस्टाईलमध्ये करा ५ सोपे बदल

Do sit down jobs make you gain weight? 5 Tips to Reduce Weight | तासंतास बसून काम करताय? बैठ्या जीवनशैलीमुळे पोट - कंबर सुटले? ५ उपाय - वजन वाढणार नाही...

तासंतास बसून काम करताय? बैठ्या जीवनशैलीमुळे पोट - कंबर सुटले? ५ उपाय - वजन वाढणार नाही...

सध्या लोकांची जीवनशैली ही धावपळीची होत चालली आहे. ८ तासाचं काम, यासह इतरही अनेक गोष्टी असतात, ज्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला अनेकांना जमेलचं असे नाही. जर आपण वर्किंग वूमन असाल तर, घरची कामं, यासह ऑफिसची कामं आटोपण्यात संपूर्ण दिवस जातो. यासगळ्या गोष्टीत दिवस कधी संपतो, हे कळूनही येत नाही.

आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने शरीर आजारांना बळी पडते. मुख्य म्हणजे वजन झपाट्याने वाढते. वजन वाढलं की, मधुमेह, थायरॉईड, संधिवात यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे वजन कमी करणं हे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचं आहे. जर आपल्याला बिझी शेड्युलमधूल वजन कमी करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर, पोषणतज्ज्ञ पायल अस्थाना यांनी शेअर केलेल्या काही टिप्स फॉल करून पाहा(Do sit down jobs make you gain weight? 5 Tips to Reduce Weight).

सकाळी नाश्ता करून ऑफिसला जा

अनेक जण कामाच्या गडबडीत सकाळचा नाश्ता स्किप करतात. परंतु, दिवसभर काम करण्याची उर्जा हवी असेल तर, सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे. नाश्ता स्किप केल्याने वजन वाढते. जेव्हा आपण ब्रेकफास्ट स्किप करतो, तेव्हा लंच आणि डिनरमध्ये अधिक कॅलरीजयुक्त पदार्थ खातो. उपाशी राहिल्याने गोड पदार्थ खाण्याची देखील क्रेविंग्स वाढतात. त्यामुळे सकाळी पोहा, उपमा, किंवा साऊथ इंडियन पदार्थ खा.

सकाळी ब्रशही न करता पाणी पिणे योग्य की अयोग्य? तज्ज्ञ सांगतात, काय खावे-प्यावे आणि कधी?

चहा - कॉफीच्या जागी ग्रीन - टी प्या

काही लोकांना वारंवार चहा - कॉफी पिण्याची सवय असते. परंतु, चहा - कॉफीच्या अतिसेवनाने वजन वाढू शकते. कॅफिनच्या अतिसेवनामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे चयापचय मंदावते. व वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे चहा - कॉफीच्या जागी आपण ग्रीन - टी पिऊ शकता. ग्रीन - टी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

स्नॅक्सजागी फळे खा

काही लोकांच बैठी काम असतं. काम करत असताना काहींना बसल्या - बसल्या चटपटीत खाण्याची सवय असते. काही वर्कर छोटी भूक भागवण्यासाठी पॅक्ड स्नॅक्स खाण्यास प्राधान्य देतात. पॅक्ड स्नॅक्स  चवीला भारी तर असतातच, परंतु, यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढतात. हलकी भूक भागवण्यासाठी फळे खाणे उत्तम ठरू शकते. यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.

चपात्या उरल्या तर शिळ्या चपात्या खाव्या का? तज्ज्ञ सांगतात, शिळी चपाती नेहमी खात असाल तर..

शरीर हाड्रेट ठेवा

ऑफिसमध्ये काम करत असताना अनेक लोकं पाणी प्यायला विसरतात. ज्यामुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. यासह वजन देखील वाढू शकते. पाण्यात कॅलरीज नसतात. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी पाणी पिणे गरजेचं आहे. नियमित पाणी प्यायल्याने फॅट्स बर्न होण्यास मदत मिळते. त्यामुळे ऑफिसमध्ये ठराविक वेळेनंतर पाणी प्या. याव्यतिरिक्त आपण नारळ पाणी, सूप, लिंबू पाणी देखील पिऊ शकता.

टिफिनमध्ये खा हेल्दी पदार्थ

वजन कमी करायचं असेल तर, टिफिनमध्ये अशा पदार्थांचा समावेश करा, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळेल. तेलकट पदार्थ शक्यतो टाळा. एका वेळी एक धान्य खा. चपाती आणि भात एकत्र खाऊ नका. ६० टक्के टिफिनमध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. ताजी फळे आणि भाज्यांचे सॅलडही खा.

Web Title: Do sit down jobs make you gain weight? 5 Tips to Reduce Weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.