आजकाल लोक इतके बिझी झाले आहेत की, स्वत:ची काळजी घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. याचा थेट प्रभाव मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर पडतो. वेळ मिळत नसल्याने एक्सरसाईज केली जात नाही. लोक जंक आणि फास्ट फूड जास्त खात आहेत. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होत आहे. अनेकांना सकाळी झोपेतून उठल्यावरही शरीरात अस्वस्थता, कमजोरी, थकवा आणि आळस जाणवतो. अशात सकाळी या समस्या जाणवू नये म्हणून आम्ही काही टिप्स सांगत आहोत.
थकवा आणि स्ट्रेस दूर करण्याच्या टिप्स
1) मेडिटेशन
मानसिक शांतता मिळवण्यासाठी सकाळी उठून मेडिटेशन केलं पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यावरही थकवा आणि सुस्ती राहण्याची कारण रात्री व्यवस्थित झोप न येणं आणि मानसिक तणाव असू शकतात. ही समस्या दूर करण्यासाठी मेडिटेशन एक चांगला पर्याय आहे. मोकळ्या हवेत डोकं फ्रेश करण्यासाठी २० ते २५ मिनिटं मेडिटेशन करा.
२) स्ट्रेचिंग एक्सरसाईज
सकाळी झोपेतून उठल्यावर अनेकदा कमजोरी किंवा थकव्यामुळे शरीरात आखडलेपणा येतो. हे टाळण्यासाठी सकाळी स्ट्रेचिंग एक्सरसाईज करू शकता. स्ट्रेचिंग एक्सरसाईज केल्यानं शरीरातील मांसपेशी मोकळ्या होतात आणि शरीराला आराम मिळतो.
३) तेलानं करा बॉडी मसाज
थकवा दूर करण्यासाठी कोमट तेलांनं मालिश करणं हा एक फार जुना उपाय आहे. तेलानं मालिश केल्यानं मांसपेशींना आराम मिळतो. मालिश केल्यावर शरीर अॅक्टिव राहतं आणि थकवा दूर होतो. तेलानं शरीराची मालिश केल्यावर मानसिक तणावही दूर होतो.
४) कोमट पाण्यानं आंघोळ
शरीराचा थकवा दूर करण्यासाठी गरम पाणी खूप फायदेशीर ठरतं. शरीर रिलॅक्स करण्यासाठी आणि अॅक्टिव राहण्यासाठी गरम पाण्यानं आंघोळ करा. याला हीट थेरपी म्हटलं जातं. गरम पाण्यानं आंघोळ केल्यानं सुस्ती आणि थकवा लगेच दूर होतो.