Lokmat Sakhi >Fitness > एकदा खाली बसल्यावर उठणे अवघड होते, करा ४ योगासने, बघा बदललेला फिटनेस...

एकदा खाली बसल्यावर उठणे अवघड होते, करा ४ योगासने, बघा बदललेला फिटनेस...

What To Do When It Is Hard To Stand Up After Sitting : 4 Yoga Pose : जमिनीवर खाली बसल्यास उठताना आधार घाव्या लागतो. ४ योगासन ठरतील फायदेशीर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2023 12:07 PM2023-02-20T12:07:49+5:302023-02-20T12:30:11+5:30

What To Do When It Is Hard To Stand Up After Sitting : 4 Yoga Pose : जमिनीवर खाली बसल्यास उठताना आधार घाव्या लागतो. ४ योगासन ठरतील फायदेशीर...

Do You Find it Difficult to Stand After Sitting? A Simple Solution is Here....4 yoga pose... | एकदा खाली बसल्यावर उठणे अवघड होते, करा ४ योगासने, बघा बदललेला फिटनेस...

एकदा खाली बसल्यावर उठणे अवघड होते, करा ४ योगासने, बघा बदललेला फिटनेस...

जमिनीवर खाली बसल्यानंतर उठणे, जमिनीवर खाली मांडी घालून बसणे यांसारखी सोपी क्रिया करणे बऱ्याच जणांना खूप अवघड जाते. आपल्यापैकी बरेच जण जमिनीवर मांडी घालून बसणे, एकदा खाली बसल्यावर उठता न येणे यांसारख्या समस्येने त्रस्त आहेत. एकदा जमिनीवर खाली बसल्यानंतर उठण्यासाठी कित्येकांना कश्याचा तरी आधार घ्यावा लागतो, आधाराशिवाय उठणे म्हणजे शक्यच नाही अशी परिस्थिती असते. आपण दिवसातील बरेच तास टेबल, खुर्ची, सोफा यांवर आरामशीर बसून घालवतो. त्यामुळे आपल्या शरीराला टेबल, खुर्ची, सोफा यावर आरामशीर बसण्याची सवय लागलेली असते. यामुळे कधी जमिनीवर खाली बसण्याची वेळ आली तर आपल्याला ते सहज शक्य होत नाही.

ऑफिसमध्ये किंवा घरात बैठ्या जीवनशैलीची सवय अंगी लागल्यामुळे जमिनीवर खाली बसण्याचा आपला फारसा संबंध येत नाही. त्यामुळे आपल्याला देखील एकदा खाली बसल्यावर उठता येत नाही किंवा उठताना कश्याचा तरी आधार लागतो अश्या व्यक्तींपैकी एक असाल तर काही महत्वाची योगासन आपल्याला उपयुक्त ठरतील. काही प्रमुख चार योगासनांचा नियमित सराव केल्यास आपल्याला देखील बिनदिक्कतपणे जमिनीवरून कशाचाही आधार न घेता उठणे सहज शक्य होईल(What To Do When It Is Hard To Stand Up After Sitting : 4 Yoga Pose).

नक्की कोणती योगासन करता येऊ शकतात ? 

१. भरमासना :- 
१. सर्वप्रथम आपल्या दोन्ही हातांचे तळवे आणि पायांचे ढोपर जमिनीवर टेकवून स्थिर राहावे. 
२. त्यानंतर हळुहळु हातांच्या दोन्ही तळव्यांवर जोर देऊन ढोपर जमिनीपासून वर उचलावे. 
३. ढोपर जमिनीपासून वर उचलताना दोन्ही हातांच्या तळव्यांवर व पायांच्या पुढचा भाग आणि बोटांवर जोर देऊन, पाठीला थोडे पोक काढून वर उचलावे. 

भरमासना केल्यामुळे पाठीचा कणा, हात, पाय, पायांची बोटे या शरीराच्या अंगांना मजबूत बनवतात.   

२. नवासन -     
 १. पाय लांब करून बसणे.
 २. हळूहळू पाठीचा कणा थोडा मागे झुकवणे.
 ३. सावकाश दोन्ही पाय जमिनीपासून वर उचलून आपल्या चेहऱ्यापर्यंत वर उचलणे.
 ४. हळूहळू हात सोडून शरीर स्थिर करणे. दोन्ही हात खांद्याला समांतर करणे.
 ५. सुरुवातीस ५ ते १० आकडे आणि त्यानंतर ३० सेकंद ते एक मिनिटापर्यंत या आसनस्थितीचा सराव करा.

नवासन केल्याने आपली पाठीची खालची बाजू, बायसेप्स व ट्रायसेप्स, कोर (Abs), पायाची बोटं आणि घोटे या शरीराच्या अंगांना मजबूत बनवतात.  

३. उत्तानपादासन - 
१. सर्वप्रथम आपल्या पाठीवर सरळ झोपा. 
२. हात शरीराला अगदी समांतर ठेवा. 
३. तळवे जमिनीकडे तोंड करून ठेवा.
४. आता दोन्ही पाय श्वास घेत असताना, हळू हळू वर करा (६० अंशांचा कोन बनवा), ५ ते ७ सेकंद पाय त्याच अंशात वर स्थिर ठेवा.
५. श्वास सोडताना, हळूहळू पाय मागे आणा. 

उत्तानपादासन केल्यामुळे पाठ, नितंब,आणि घोट्याला, गुडघे, ढोपर, पाय यांच्यावर चांगला ताण पडून या शरीराच्या अंगांना मजबूत बनवतात. 

४. फलकासन - 
१. दोन्ही हातांचे पंजे आणि पायांची बोटे जमिनीवर टेकवा. 
२. शरीराचा संपूर्ण भार दोन्ही तळहातांवर आणि पायांच्या बोटांवर ठेवून शरीर वर उचला. 
३. शरीर सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. 
४. डोके, पाठीचा कणा, माकडहाड, हिप्स, गुडघे आणि टाच एकाच रेषेत राहतील याची काळजी घ्या. 

फलकासन केल्याने हात व खांदे, लोअर बॅक, बायसेप्स आणि ट्रायसेप्स, कोअर (एब्स) या शरीराच्या अंगांना मजबूत बनवतात.

Web Title: Do You Find it Difficult to Stand After Sitting? A Simple Solution is Here....4 yoga pose...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.