Join us  

जेवण झालं की लगेच चालायला जाता? अभ्यास सांगतात, जेवल्यानंतर लगेच चालण्याचे तोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2023 2:47 PM

Walking After Eating: Benefits and Downsides जेवल्यानंतर लगेच चालायला जाणं योग्य की अयोग्य?

रात्रीच्या जेवणानंतर चालावे, याने जेवण चांगले पचते असे आपल्याकडे म्हटले जाते. ज्याला आपण शतपावली असे म्हणतो. रात्री केलेल्या जेवणानंतर आपली हालचाल होत नाही. त्यामुळे बाहेर जाऊन फेरफटका मारण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, जेवणानंतर चालल्याने खरंच शरीरावर फरक पडतो का? याचा परिणाम वजनेवर होतो का? शतपावलीचा आरोग्याला कितपत फायदा होतो? यासह चालावे तर किती चालावे? असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला असेल. शास्त्रज्ञांनी असेही म्हटले आहे की, जेवणानंतर १५  मिनिटे चालणे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते.

स्पोर्ट्स मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, जेवणानंतर लगेच चालणे शरीरासाठी कधी कधी फायदेशीर ठरत नाही. अन्न पचनाच्या पहिल्या टप्प्यात असते. अशा स्थितीत लगेच चालण्याने पोटदुखी ही समस्या होऊ शकते.

जेवल्यानंतर कधी चालावे

रात्रीच्या जेवणानंतर साधारण ५ ते ७ मिनिटांनंतर चालावे. याचे दोन मुख्य कारणे आहेत. पहिला म्हणजे अन्न पचनाच्या स्थितीत येते. दुसरे म्हणजे चालल्यानंतर अन्न पचनाचा वेग वाढते. यासह रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास, व मधुमेह टाळण्यास मदत होते. म्हणून, रात्रीचे जेवण करा, थोडा वेळ थांबा आणि नंतर सुमारे ३० मिनिटे शतपावली करा.

डिनरनंतर शतपावली करण्याचे फायदे

हैप्पी हॉर्मोन्स वाढण्यास मदत

रात्रीच्या जेवणानंतर हैप्पी हॉर्मोन्सची संख्या वाढते. यासह रक्त परिसंचरण सुधारते. हैप्पी हॉर्मोन्स हृदयाची गती वाढवते. हे सर्व घटक आपल्याला उत्साही आणि आनंदी वाटण्यास मदत करतात.

क्रेविंग कमी करण्यास मदत

चालल्यानंतर शरीरात थकवा येतो, शरीर थकले की झोप चांगली लागते. अनेकदा झोप लागत नसल्यास आपल्याला भूक जास्त लागते. अशा परिस्थितीत चालल्यानंतर, तुम्हाला पटकन झोप येते, ज्यामुळे क्रेविंगचा त्रास आपल्याला होत नाही.

चयापचय वाढवते

मेटाबॉलिज्म बुस्ट अथवा कमी होणे आपल्या खाण्यावर अवलंबून असते. जेवणानंतर चालल्याने मेटाबॉलिज्म सुधारते. यामुळे वजन वाढत नाही, व जेवणही व्यवस्थित पचते.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य