फिटनेस टिकविण्यासाठी दररोज काही ना काही व्यायाम केलाच पाहिजे. पण काही जणांना व्यायाम करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही, तर काही जणांना वेळ असूनही ते व्यायाम करत नाहीत. कारण त्यांना व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे मग मधल्यामध्ये अनेक जण वॉकिंग म्हणजेच रोज चालायला जाण्याचा मार्ग निवडतात. जेवण झाल्यानंतर रात्रीच्या वेळी फिरायला जाणे किंवा सकाळच्या वेळी फिरायला जाणे सुरू करतात (do you think walking is the best exercise?). दररोज नियमितपणे चालायला जाणं म्हणजेच आपल्याकडून रोज काही ना काही व्यायाम होतो आहे, असं त्यांच्याप्रमाणेच तुम्हालाही वाटत असेल तर ऋजुता दिवेकर यांनी शेअर केलेली ही माहिती एकदा वाचायलाच हवी...(Is it possible to stay fit by walking everyday regularly?)
चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे असं तुम्हालाही वाटतं का?
चालायला जाणे म्हणजे व्यायाम असू शकतो का याविषयी माहिती सांगणारा ऋजुता यांचा व्हिडिओ rujuta.diwekar या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
नेहमीचंच वरण किंवा आमटी होईल आणखी चवदार, १ सोपी ट्रिक- फोडणी झाल्यानंतर लगेच....
या व्हिडिओमध्ये ऋजुता असं सांगत आहेत की चालणे हा काही व्यायाम नाही. तर ती फक्त एक प्रकारची ॲक्टीव्हीटी आहे. म्हणजेच तो व्यायाम नसून ती फक्त तुमच्या शरीराची होणारी हालचाल आहे. याचाच अर्थ असा की शारिरीकदृष्ट्या ॲक्टीव्ह राहण्यासाठी चालण्याची सवय योग्य असली तरी फक्त त्यामुळे तुम्ही फिट राहू शकत नाही. किंवा दुसरा एखादा व्यायाम करून तुम्हाला जो फिटनेस मिळू शकतो, तो केवळ चालण्यातून मिळू शकत नाही.
यासाठीच जर तुम्हाला नियमितपणे चालण्याची सवय असेल तर त्यात थोडा वेगळेपणा आणा जेणेकरून फिट राहण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. यासाठी चालत असताना संथ लयीमध्ये चालू नका.
तुपासोबत मुळीच खाऊ नका ३ पदार्थ! तब्येत बिघडण्याचा धोका- तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
थोडे जलद चाला. चालताना अधूनमधून रनिंग किंवा जॉगिंग करा. चालणे झाल्यानंतर सुर्यनमस्कार, स्ट्रेचिंग असे काही करा. किंवा चालण्याच्या ऐवजी पायऱ्यांची चढउतार करा.. असे काही बदल केले तर त्याचा नक्कीच जास्त फायदा होऊ शकतो.