हुमा कुरेशी म्हणजे बॉलीवूडची एक हॉट आणि ग्रेसफूल अभिनेत्री. हुमाचे लूक्स, स्टाईल आणि तिचे ग्लॅमर याविषयी नेहमीच चर्चा होत असते... आता सध्या हुमाचा एक फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा नुसता फोटो नाही तर हुमाने या फोटोच्या माध्यमातून जणू तिच्या चाहत्यांना फिटनेस टिप्स दिल्या आहेत..
मलायका अरोरा, शिल्पा शेट्टी, करिना कपूर या अभिनेत्री सोशल मिडियावर खूप जास्त ॲक्टीव्ह असतात आणि त्यांच्या वर्कआऊटचे फोटो टाकून त्या त्यांच्या चाहत्यांना फिटनेसबाबत मोटीव्हेट करत असतात. असाच एक प्रयत्न हुमानेही केला आहे. चाहत्यांना फिटनेसबाबत मोटीव्हेट करणारा एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती चक्रासन करताना दिसत आहे.. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आणि पाठीच्या अनेक तक्रारी दूर करण्यासाठी चक्रासन करणे फायदेशीर मानले जाते. म्हणूनच हुमासारखे परफेक्ट आणि फिट बॉडीपोश्चर हवे असेल, तर नियमितपणे चक्रासन करण्यास सुरुवात करा... Slow and Steady…. One day at a time towards a stronger ME !! अशी कॅप्शन हुमाने या पोस्टला दिली आहे. तुम्हाला नियमित व्यायाम करण्याची सवय नसेल तर एकदम चक्रासन करायला जाऊ नका. हुमाने सांगितलेला Slow and Steady…हा मंत्र लक्षात ठेवा.
कसे करायचे चक्रासन
How to do Chakrasana?
- चक्रासन हे थोडे अवघड आहे. त्यामुळे सुरुवातीला थोडे वार्मअप, स्ट्रेचिंग करा आणि त्यानंतर चक्रासन करण्याचा प्रयत्न करा.
- सगळ्यात आधी योगा मॅटवर पाठीवर झोपा.
- त्यानंतर दोन्ही हात कोपऱ्यातून वाकवा, हाताचे तळवे जमिनीवर टेकवा. हाताची बोटे पायाच्या दिशेने असली पाहिजेत, अशा पद्धतीने हात ठेवा.
- यानंतर पाय गुडघ्यात दुमडून शरीराच्या जवळ घ्या. तळपाय जमिनीवर टेकलेले हवे.
- आता दोन्ही तळहात आणि तळपाय यांच्यावर जोर देऊन संपूर्ण शरीर उचलण्याचा प्रयत्न करा.
- सुरुवातीला पाठ, कंबर, मांड्या उचला. सगळ्यात शेवटी मान आणि डोके उचला.
चक्रासन करण्याचे फायदे
Benefits of doing Chakrasana
- लिव्हर, किडनी, हृदय यांचे कार्य चांगले रहावे, म्हणून हे आसन करणे फायदेशीर मानले जाते.
- नियमिपणे चक्रासन केल्यास पोटावरची चरबी कमी होते.
- चक्रासन केल्यामुळे पाठीच्या कण्याचा व्यायाम होतो. त्यामुळे बॉडी पोश्चर सुधारण्यास मदत होतो.
- नियमितपणे चक्रासन केल्यास महिलांच्या पाळीच्या दिवसांतील वेदना कमी होतात.
- हात, पाय, दंड, पाठ, मान या स्नायुंना बळकटी मिळते.
- नियमितपणे चक्रासन केल्यास शरीर लवचिक होते.