Lokmat Sakhi >Fitness > व्हिटॅमिन K ची कमतरता म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण, ६ पदार्थ खा- धोका टाळा

व्हिटॅमिन K ची कमतरता म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण, ६ पदार्थ खा- धोका टाळा

Doctor told vitamin k deficiency symptoms and diseases : व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के निरोगी हाडे आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 03:43 PM2023-01-05T15:43:37+5:302023-01-05T17:06:56+5:30

Doctor told vitamin k deficiency symptoms and diseases : व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के निरोगी हाडे आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहे.

Doctor told vitamin k deficiency symptoms and diseases and 6 vitamin k rich foods | व्हिटॅमिन K ची कमतरता म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण, ६ पदार्थ खा- धोका टाळा

व्हिटॅमिन K ची कमतरता म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण, ६ पदार्थ खा- धोका टाळा

शरीर चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहण्यासाठी व्हिटामीन्स आणि मिनरल्सची आवश्यकता असते. व्हिटामीन्सच्या कमतरेमुळे वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. सतत आजारी पडण्याची स्थिती उद्भवते. व्हिटामीन्सची कमतरतेनं कॅन्सरपासून बचाव होतो. हाडांच्या विकासात मदत होते. याशिवाय इंसुलिन सेंसिटिव्हीसुद्धा वाढते. डायटिशिनय नेहा चौधरी यांच्यामते व्हिटामीन के चे २ भाग असतात. व्हिटामीन के १, व्हिटामीन के २.  के १ भाज्यांमधून मिळतं तर तरे के२ मांस आणि अंड्यांमधून मिळतं. (Doctor told vitamin k deficiency symptoms and diseases and 6 vitamin k rich foods)

व्हिटामीन के च्या कमतरेमुळे उद्भवणाऱ्या  समस्या

१) हृदयाच्या आरोग्याला बाधा उद्भवू शकते

२)  हाडं कमकुवत होतात. ऑस्टिओपॅरासिस, यासंबंधित आजार होतात. 

३) रक्तवाहिन्या कडक होतात, डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. 

४) दातांच्या समस्या उद्भवतात. ब्रश करताना आणि इंजेक्शन घेताना रक्त बाहेर येतं

५) नाकातून रक्त बाहेर येतं, 

६) लघवीदरम्यान रक्त बाहेर येणं.

गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीच्या काळातही डॉक्टर अनेकदा बाळाची तपासणी करतात. यासोबतच त्यांना व्हिटॅमिन केचे इंजेक्शनही दिले जाते. परंतु जर अर्भकामध्ये व्हिटॅमिन केची कमतरता असेल तर त्यांच्यामध्ये रक्तस्रावी रोग विकसित होऊ शकतो. ज्याला वैद्यकीय भाषेत एचडीएन असेही म्हणतात.

डॉक्टरांच्या मते, रक्त पातळ करणाऱ्या औषधांच्या हानिकारक प्रभावांना मागे टाकून जखमेच्या उपचारांमध्ये व्हिटॅमिन केची महत्त्वाची भूमिका आहे. याव्यतिरिक्त, नवजात मुलांमध्ये रक्तस्त्राव विकार टाळण्यासाठी व्हिटॅमिन के देखील उपयुक्त आहे. हाडांच्या आरोग्याला चालना देण्यासाठी व्हिटॅमिन के देखील आवश्यक आहे.

व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के निरोगी हाडे आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे हाडांची घनता वाढते आणि वृद्ध, महिलांमध्ये फ्रॅक्चरची शक्यता कमी करते. अभ्यासानुसार, हे व्हिटॅमिन धमनीच्या भिंतींमध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य देखील सुधारते.

डाळ भाताबरोबर तोंडी लावणीसाठी करा खमंग बटाटा तवा फ्राय; खायला चटपटीत, सोपी रेसेपी

जर तुम्हाला व्हिटॅमिन K च्या कमतरतेची लक्षणे दिसली तर तुम्ही ही कमतरता आहाराद्वारे पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात फक्त कच्चं चीज, कोबी, काजू, किवी, डाळिंब आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे लागेल. तसेच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध किंवा सप्लिमेंट घेऊ शकता.

Web Title: Doctor told vitamin k deficiency symptoms and diseases and 6 vitamin k rich foods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.