Join us  

काय सांगता! फळांचा रस प्यायल्याने वाढते वजन? काय खरं काय खोटं? संशोधक सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2024 6:49 PM

Does Drinking 100% Fruit Juice Put on Weight? : फळे खावीत की ज्यूस प्यावा? वजन कमी करण्यासाठी नक्की काय करावे?

नकळत घडणाऱ्या चुकांमुळे अनेकदा वजन झपाट्याने (Weight Gain) वाढते. लठ्ठपणामुळे फक्त शरीर बेढप दिसत नसून, यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, फॅटी लिव्हर यासह इतर गंभीर समस्या निर्माण होतात. वजन वाढण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. मुख्य म्हणजे निरोगी आहार किंवा काही सवयींमुळे देखील वजन वाढू शकते.

ऐकून आश्चर्य वाटेल, पण फळांचा रस प्यायल्याने देखील वजन झपाट्याने वाढू शकते (Weight Loss Tips). आता तुम्ही म्हणाल फळ आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. पण फळांचा रस प्यायल्याने वजन कसे काय वाढू शकते?(Does Drinking 100% Fruit Juice Put on Weight).

लहान मुलांना धोका अधिक

जामा पीडियाट्रिक्समध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, यासह टोरंटो आणि बोस्टन येथील संशोधकांना असे आढळून आले की, 'जे लोकं फळांचा रस पितात त्यांना वजन वाढण्याचा धोका जास्त असतो. हा परिणाम विशेषतः लहान मुलांमध्ये दिसून आला आहे.'

वॉकला जाऊनही वजन कमीच होत नाही? नेमकं कोणत्या वेळेत चालावे? चुकीच्या वेळेत चालाल तर..

काही फळांमध्ये फ्रक्टोज नावाचे नैसर्गिक साखर आढळते. जे रोजच्या कॅलरीजचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे झपाट्याने वजन वाढवण्यास कारणीभूत ठरते. पण यात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स देखील आढळते, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

फळांचा ज्यूस प्यावा की..?

फळांचा रस प्यायल्याने शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात, पण फायबर मिळत नाही. पण जर आपण फळांचा ज्यूस न पिता, फक्त फळं चावून खाल्लात तर शरीराला फायबर मिळेल. ज्यामुळे पचनक्रिया सुधारेल. शिवाय शरीरातील साखरेचे प्रमाणही कण्ट्रोलमध्ये राहील.

वजन कमी करण्यासाठी काय करावे?

- दर आठवड्याला किमान १५० मिनिटे व्यायाम करावा. यासह ताजी फळे आणि भाज्या खा.

घाईघाईत बकाबका ५ मिनिटांत जेवता? संशोधन सांगते, वजन वाढण्यापासून पित्ताच्या त्रासाचं महत्त्वाचं कारण

- गोड आणि कृत्रिम साखरयुक्त पदार्थांपासून दूर राहा.

- फॅन्सी आणि क्रॅश डाएटला फॉलो करू नका.

- जेवण कधीही वगळू नका. आपल्या भूकेपेक्षा कमी खा.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स