Join us  

सकाळी उठल्यानंतर गरम पायल्यानं खरंच वजन कमी होतं का? पाहा यात कितपत तथ्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 8:30 PM

Does Drinking Hot Water Reduce Belly Fat :

आजकाल वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले लोक काहीही करण्यास तयार असतात. जिम, योगा, जिम्नास्ट, याव्यतिरिक्त घरगुती उपायही करतात (Fitness Hacks). जे फिटनेस फ्रिक असतात ते  सकाळी रिकाम्यापोटी पाणी पितात. ज्यात ते जास्त तेल मसालयुक्त पदार्थ खातात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. खरंच गरम पाणी प्यायल्यानं चरबी कमी होते का याचं उत्तर पाहूया. (Does Drinking Hot Water Reduce Belly Fat)

१) गरम पाणी प्यायल्यानं शरीरातील जमा झालेले विषारी पदार्थ मलमुत्राच्या माध्यमातून बाहेर निघतात. यामुळे शरीरात अतिरिक्त फॅट जमा होत नाही.

विंचरताना केसांचे पुंजके निघतात-खूप पातळ झाले? ५ रूपयांच्या कढीपत्त्याचा जादूई उपाय, दाट होतील केस

२) गरम पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म मजबूत होतो. ज्या लोकांना पोटाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी आवर्जून गरम पाणी प्यायला हवं. ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं सहज पचन होण्यास मदत होते.  गरम पाणी प्यायल्यानं फॅट मॉलिक्यूल्स तुटतात.

३) गरम पाणी प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहते. यामुळे शरीर डिटॉक्स होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी शारीरिक स्वरूपात एक्टिव्ह राहण्यास मदत होते आणि कॅलरीज कमी होते.  सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ नये म्हणून गरम पाणी  प्यायला हवं. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो आणि आराम  मिळतो. 

मांड्या खूप जाड दिसतात-चालताना घासल्या जातात? 3 योगासनं करा, मांड्यांची चरबी होईल कमी

४) तुम्ही  मधात गरम पाणी  मिसळून सकाळी पिऊ शकता. यामुळे चरबी कमी होते. यामुळे त्वचा चांगली राहते. यात अनेक पोषक तत्व असतात. ज्यातून व्हिटामीन बी६, व्हिटामीन सी, एमिनो  एसिड, कार्बोहायड्रेट, रायबोफ्लेविन आणि नियासिन असते. ज्यामुळे कॅलरीज कमी होतात. सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास गरम पाणी प्या. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो आणि लवकर आरामही मिळतो. 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स