घर म्हटलं की कामं आलीच.. त्यामुळे प्रत्येक घरातल्या बाईच्या मागे भरपूर कामं असतात. काही जणींच्या मागे कमी असतात तर काहींच्या मागे खूप जास्त असतात. घरातली कामं कोणत्याही बाईला चुकलेली नाहीत. काही जणींच्या मागे तर घर- ऑफिस अशी दुहेरी कसरत असते. ही सगळी कामं करताना त्या पार दमून जातात. थकून जातात. त्यामुळे आपण अगदी फिट आहोत. आपण कामं करून एवढ्या थकतो की रात्री अंथरुणावर पडताच लगेच झोपूनही जातो. आपण भरपूर घरकाम करतो, आपलं जेवण व्यवस्थित आहे, झोप चांगली लागते.. मग असं सगळं चांगलं असताना दुसऱ्या व्यायामाची काय गरज असं अनेक जणींना वाटतं (Does Housework Is Equal To Exercise?). आणि मग त्या जीमला जाणं, योगा करणं किंवा घरातल्या घरात इतर कोणताही व्यायाम करणं टाळतात. पण घरकाम करून खरंच व्यायाम होतो का? घरकाम आणि व्यायाम यामुळे शरीरावर एकसारखाच परिणाम होतो? बघा याविषयी तज्ज्ञ काय सांगत आहेत...(what is the difference between house chores and exercise?)
घरकाम केल्यावर व्यायामाची गरज नसते का?
घरकाम हाच आपला व्यायाम, आपल्याला इतर व्यायामाची गरजच नाही, असं तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ डाॅक्टरांनी amuktamuk या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
जेवल्यानंतर फक्त ५ मिनिटे चाला- वजन कमी होण्यासाेबतच मिळतील ५ जबरदस्त फायदे
यामध्ये डाॅक्टर सांगतात की घरकाम हा व्यायाम नाही. घरकाम हे तुम्हाला नुसतं थकवून किंवा दमवून टाकणारं एक्झर्शन आहे. घरकाम करताना तुमची शारिरीक हालचाल होते हे खरं. पण ती हालचाल काही योग्य स्थितीमध्ये होत नाही. त्यातून तुमच्या स्नायूंना पाहिजे तसा व्यायाम होत नाही. त्यामुळे घरकाम हा व्यायाम नसतो. ती एकप्रकारची तुमची होणारी दगदग असते.
त्यामुळे घरकाम करत असाल तरी वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग असा कोणता ना कोणता व्यायाम प्रत्येकीने करायलाच पाहिजे असं डाॅक्टर सांगतात. नियमितपणे व्यायाम केला तर शरीराची झीज होणार नाही.
लिंबाचा रस ३- ४ महिने साठवून ठेवण्याचा सोपा उपाय- पाहिजे तेव्हा इंस्टंट लिंबू सरबत तयार...
वाढत्या वयासोबत वेगवेगळे आजार मागे लागणार नाहीत. शिवाय मेनोपॉजचा त्राससुद्धा खूप कमी होईल. त्यामुळे तुम्हाला झेपेल तो, जमेल तसा व्यायाम करा. घरकाम हाच व्यायाम असं समजून निर्धास्त राहण्याची चूक करू नका.