पोटाची थुलथुलीत चरबी (Weight Gain) करण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो. जस जसं वय वाढत जातं, तस तसं काहींचं पोटाचा घेरही वाढत जातो (Weight Loss). पोट वाढलं की आपल्याला कपडेही नीट फिट बसत नाही (Health Tips). वजन वाढणे ही आजकाल सामान्य समस्या बनली आहे (Lemon Water).
जास्त वजन वाढलं की, मधुमेहापासून ते रक्तदाबापर्यंत बयाच आजारांचा धोका वाढतो. जर आपल्याला कंबरेचा घेर आणि थुलथुलीत पोटाची चरबी कमी करायची असेल तर, कोमट पाण्याचा सोपा उपाय करून पाहा. हिवाळ्यात व्यायाम करण्याची इच्छा होत नसेल तर, हा उपाय करून पाहा वेट लॉस करू शकता.
आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांच्या मते, 'जर आपण रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून पीत असाल तर, आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. मुख्य म्हणजे यामुळे पोटाची चरबी कमी होते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील चयापचय वाढवण्यास मदत करतात. यासह शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि पचनक्रिया सुधारते'(Does Lemon Water Help You Lose Weight, check other health benefits).
थुलथुलीत पोटाची चरबी कमी करण्यासाठी लिंबू पाणी
- तज्ज्ञांच्या मते, कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने शरीरातील चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते. लिंबूमध्ये पेक्टिन नावाचा एक प्रकारचा फायबर असतो, जो भूक नियंत्रित करतो. ज्यामुळे आपण कॅलरीजचे सेवन कमी करतो.
- याशिवाय लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेली चरबी जाळण्यास मदत होते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे विशेषतः प्रभावी आहे. कोमट पाण्यासह लिंबाचा रस चयापचय गतिमान करतो, ज्यामुळे शरीराला अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत होते.
- लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील डिटॉक्सिफिकेशन देखील होते. म्हणजेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. यामुळे पोट स्वच्छ आणि स्नायू निरोगी राहतात. ज्यामुळे थुलथुलीत पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते.
ऐन हिवाळ्यात तुळस सुकली? ५ टिप्स -तुळस होईल हिरवीगार आणि डेरेदार, पाहा सोपे उपाय
- मात्र, फक्त कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने वजन कमी होत नाही, यासाठी योग्य सकस आहार आणि नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.