वजन कमी करणं हे खरंच खायचं काम नाही. निदान ४५ मिनिटं व्यायाम करून घाम गाळावाच लागतो. यासह आवडत्या पदार्थांचा त्याग करावा लागतो, ते वेगळंच. वजन कमी करताना, व्यायाम, डाएट, यासह आराम देखील महत्वाचा असतो. काही लोकं खूप आळशी असतात. ज्यांना वजन कमी करण्यासाठी विशेष मेहनत घेताना खूप कंटाळा येतो. ते लोकं झोपून देखील वजन कमी करू शकतात. आता तुम्ही म्हणाल झोपल्याने वजन कमी कसे होईल? वजन कमी करण्यासाठी किती तासांची झोप घ्यावी?(Does Sleep Affect Weight Loss? How It Works).
यासंदर्भात, गेट राईज या वेबसाईटला माहिती देताना राईज साइन्सचे को - फाउंडर जेफ्फ काह्न सांगतात, ''होय, आपण झोपून देखील वजन कमी करू शकता. झोपल्याने सुमारे एका तासाला ५० कॅलरीज बर्न होतात. परंतु एखादी व्यक्ती किती कॅलरीज बर्न करते हे त्यांच्या बेसल मेटाबॉलिक रेटवर (BMR) अवलंबून असते. यासह व्यायाम आणि आहारात प्रोटीन्सचा समावेश असणं गरजेचं आहे,''
ब्लँकेटशिवाय झोपा
जेव्हा आपण थंड तापमानात झोपतो, तेव्हा यापचय क्रिया वाढते. ज्यामुळे विश्रांती घेत असताना जास्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. संशोधनानुसार, रात्रीच्या वेळी थंडीमुळे हेल्दी ब्राऊन फॅट्सचे प्रमाण वाढते. ज्यामुळे शरीराला एक्स्ट्रा ब्लड शुगर यासह अधिक कॅलरीज बर्न करण्यास मदत होते.
एक समोसा खाल्ल्याने आरोग्यावर किती परिणाम होतो? कॅलरीज बर्न करण्यासाठी काय करायला हवे?
झोपण्यापूर्वी प्रोटीन शेक प्या
अनेक जण वजन कमी करण्याच्या नादात, डिनरमध्ये कमी खातात. किंवा खाणं टाळतात, उपाशी पोटी झोपतात. ज्यामुळे आपली झोप मोड होऊ शकते. त्यामुळे उपाशी पोटी कधी झोपू नये. झोपण्यापूर्वी प्रोटीन शेक प्या. प्रोटीन्समुळे वजन कमी होते, व पोट देखील भरलेले वाटते.
स्लीप मास्क घाला
एका संशोधनानुसार, अंधारात झोपणाऱ्या लोकांमध्ये, अंधुक प्रकाशात झोपणाऱ्या लोकांपेक्षा लठ्ठपणाची शक्यता २१ टक्क्यांनी कमी असते. जर आपल्याला अंधुक प्रकाशाशिवाय झोप लागत नसेल तर, झोपताना स्लीप मास्क घालून झोपा.
लिंबू जास्त खाल्ल्याने खरेच वजन कमी होते का? लिंबू आहारात किती असावा?
उपाशी पोटी झोपू नका
कमी कॅलरीज इनटेक केल्याने वजन कमी होते. परंतु, रात्रीचं जेवण टाळू नका. कारण यामुळे आपले शरीर उपासमारीच्या स्थितीत जाते, व कॅलरीज वाचवण्यासाठी चयापचय क्रिया कमी करते. त्यामुळे रात्रीच्या वेळी हलके पदार्थ खा.