घाम गाळा आणि वजन कमी करा, हे वाक्य आपण अनेकांकडून ऐकलं असेल. परंतु, घाम गाळून नक्की वजन कमी होते का? लठ्ठपणा ही जागतिक समस्या बनली आहे, यामुळे शरीरात अनेक आजार निर्माण होतात. शरीरातील फॅट्स कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी विविध लोकं अनेक सल्ले देतात. घाम गाळल्याने वजन कमी होते, फळं खाल्ल्याने वजन वाढत नाही, वेट ट्रेनिंग घेण्यापूर्वी कार्डीओ करणे या सल्ल्यांमागे नक्की खरं काय आणि खोटे काय?
यासंदर्भात, बॉलीवूड फिटनेस तज्ज्ञ मेहक नायर यांनी शरीरातील फॅट्स कमी करण्याची योग्य पद्धत, यासह फॅट्स कमी करताना लोकांमध्ये कोणते गैरसमज निर्माण होतात, यासंबंधित माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे(Does sweating make you lose weight?).
घाम गाळल्याने वजन कमी होते?
अनेकांचा असा गैरसमज आहे की, जितका जास्त घाम गाळाल तितके वजन कमी होईल. मेहक नायर सांगतात, 'वर्कआऊट करण्यापेक्षा आपला किती घाम गळतो, याकडे सर्वांचे लक्ष असते. पण असे करणे चुकीचे आहे. घाम आणि फॅट लॉस यांच्यामध्ये काहीही संबंध नाही. चरबी शरीराच्या आत बर्न होते, ती घामाच्या रुपात बाहेर येत नाही. बॉडी गरम असतानाच ती घामाच्या स्वरुपात हिट बाहेर टाकते.
फक्त १ चमचा पावडर कोमट पाण्यात घालून रोज प्या! घ्या वजन कमी करणाऱ्या पावडरची कृती
फळं खाल्ल्याने वजन वाढत नाही?
काही लोकांना असे वाटते की, फळं खाऊन वजन कमी होते. पण खरंच फळं खाऊन वजन कमी होते का? मेहक म्हणते, 'फळं खाऊन वजन वाढत नाही, हे एक गैरसमज आहे. फळांमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, त्याचे जास्त सेवन केल्यास वजन वाढू शकते. फळं खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते, पण वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी आहारात प्रोटीनयुक्त पदार्थ, यासह व्यायाम करणे गरजेचं आहे.
काटेकोर डाएट- भरपूर व्यायाम करुनही वजन कमीच होत नाही? कारण ५ चुका, त्या टाळल्या नाहीतर..
वेट ट्रेनिंग करण्यापूर्वी कार्डीओ करणे योग्य?
वजन कमी करण्यासाठी अनेक लोकं जिम लावतात, पण काहींना असे वाटते की, वेट ट्रेनिंग कार्डीओ केल्याने वजन कमी होते. मेहक यांच्या मते, ''ट्रेडमिलवर धावणे हा कार्डिओ व्यायामाचा भाग आहे. बरेच लोक आधी कार्डिओ आणि नंतर वेट ट्रेनिंग करतात, पण ही पद्धत चुकीची आहे. कार्डिओ करून शरीर थकवण्याआधी वेट ट्रेनिंग करायला हवे. यामुळे फॅट लॉस लवकर होते.''