Lokmat Sakhi >Fitness > योगासनं केल्यानं केस काळे होतात? करा ४ महत्त्वाची आसनं फक्त ५ मिनिटं, पाहा केसांवर जादू

योगासनं केल्यानं केस काळे होतात? करा ४ महत्त्वाची आसनं फक्त ५ मिनिटं, पाहा केसांवर जादू

Fight grey hair with these 4 yoga asanas केसांची निगा राखण्यासाठी योग आणि उत्तम आहार महत्वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2023 02:38 PM2023-02-22T14:38:15+5:302023-02-22T14:40:47+5:30

Fight grey hair with these 4 yoga asanas केसांची निगा राखण्यासाठी योग आणि उत्तम आहार महत्वाचा..

Does yoga make hair black? Do 3 important asanas in just 5 minutes, watch the magic on your hair | योगासनं केल्यानं केस काळे होतात? करा ४ महत्त्वाची आसनं फक्त ५ मिनिटं, पाहा केसांवर जादू

योगासनं केल्यानं केस काळे होतात? करा ४ महत्त्वाची आसनं फक्त ५ मिनिटं, पाहा केसांवर जादू

केस काळेभोर, जाड, सुंदर दिसावे अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. चेहऱ्याच्या सौंदर्यात केसांचा मोठा वाटा असतो. मात्र, खराब जीवनशैली, केसांची योग्य निगा न राखणे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणताणाव यासह इतर कारणांमुळे, केसांच्या निगडीत समस्या उद्भवतात. वयोमानानुसार केसांच्या वाढीत बदल होतात. आज जवळजवळ प्रत्येक स्त्री केस गळणे आणि पांढरे होण्याने त्रस्त आहे. कोवळ्या वयातही पांढरे केसांची समस्या वाढत आहे.

या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महिला अनेक उपाय करून पाहतात. काही उपाय कामी पडतात, तर काही उपाय केसांना अधिक हानी पोहचवतात. केसांची बाहेरून निगा राखण्यासह, शरीराला आतून पौष्टीक आहार देणं गरजेचं. यासह काही योग आपल्या केसांची निगा राखण्यासाठी मदत करतील. योग केल्याने शारीरिकसह मानसिक स्थिती सुधारते. ज्यामुळे केसांची नैसर्गिक ग्रोथ होईल, यासह काळेभोर आणि जाड होण्यास मदत मिळेल.

केसांची निगा राखण्यासाठी योगभ्यास

शीर्षासन

खाली डोकं आणि वर पाय..म्हणजेच शीर्षासन. हा योग केल्यामुळे शारीरिक शक्तीमध्ये चांगली वाढ होते. यासह केस गळतीची समस्या थांबते. या आसनाच्या सरावाने मेंदूच्या भागात होणारा रक्तपुरवठा चांगला सुधारतो. परिणामी, केसांशी संबंधित सगळ्या समस्या, उदा. केस पांढरे होणे, केस गळणे, कोंडा होणे इ. पासून सुटका होते.

बालासन

पोटाची समस्या यासह तणावामुळे केस गळणे सुरु होते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी बालासन उपयुक्त ठरेल. हा योग केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. बालासन करण्यासाठी गुडघे वाकवून वज्रासनात बसा. हात वर करताना दीर्घ श्वास घ्या, नंतर श्वास सोडताना शरीर पुढे वाकवा. डोके जमिनीवर ठेवा आणि पोट मांड्यांवर ठेवा. याने केस गळणे, पोटाचा त्रास यासह तणावापासून मुक्ती मिळेल.

त्रिकोणासन

रुक्ष आणि पांढऱ्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी त्रिकोणासन करा. या आसनाचा सराव करताना आपले शरीर तीन कोनांमध्ये विभागले जाते. याच्या सरावामुळे आपले कमरेचे स्नायू मजबूत बनतात. यासह सुटलेले पोट आणि पचनशक्ती सुधारते. ज्यामुळे केसांची वाढ योग्यरीत्या होते.

मासिक पाळीच्या चार दिवसात शारीरिक संबंध ठेवावेत का? डॉक्टर सांगतात, आरोग्यसाठी योग्य काय...

हा योग करण्यासाठी दोन्ही पाय काही अंतरावर ठेवून उभे राहा. आता हात आणि खांदे सरळ वर करा. त्यानंतर उजव्या हाताने पायाला स्पर्श करा. दुसऱ्या बाजूनेही ही प्रक्रिया पुन्हा करा. यामुळे तणाव कमी होतो यासह केसांना योग्य पोषण मिळते.

भुजंगासन

भुजंगासन याला कोब्रा पोझ देखील म्हणतात.  या आसनात सापाप्रमाणे धड पुढच्या दिशेने वर ठेवावे लागते. हा योग केल्याने पोटाच्या निगडीत समस्या दूर होतात. ज्यामुळे ताणताणाव यासह केसांची वाढ योग्यरीत्या होते. केस जास्त गळत असतील, पांढरे होत असतील तर भुजंगासनाचा सराव करा. हा योग करताना पोटावर झोपा, त्यानंतर पाय जोडून खांद्याच्या रेषेवर छातीजवळ तळवे ठेवा. कपाळ जमिनीवर टेकवा. दीर्घ श्वास घेत शरीराचा पुढचा भाग वर करा आणि हात सरळ ठेवा आणि काही सेकंद या स्थितीत रहा. पुन्हा ही प्रक्रिया करा.

Web Title: Does yoga make hair black? Do 3 important asanas in just 5 minutes, watch the magic on your hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.