Lokmat Sakhi >Fitness > Post workout meal: व्यायाम तर रेग्युलर करताय, तरी वजन कमी होत नाही? वर्कआऊटनंतरचा आहार बदला, चुकीचं खाल्लं तर..

Post workout meal: व्यायाम तर रेग्युलर करताय, तरी वजन कमी होत नाही? वर्कआऊटनंतरचा आहार बदला, चुकीचं खाल्लं तर..

Fitness tips: व्यायाम तर रेग्युलर करताय, तरीही म्हणावा तसा फायदा नाही? इथे चुकतंय तुमचं.. वाचा वर्कआऊट (meal after workout) नंतर काय खायचं आणि काय टाळायचं... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 01:16 PM2022-03-03T13:16:48+5:302022-03-03T13:17:27+5:30

Fitness tips: व्यायाम तर रेग्युलर करताय, तरीही म्हणावा तसा फायदा नाही? इथे चुकतंय तुमचं.. वाचा वर्कआऊट (meal after workout) नंतर काय खायचं आणि काय टाळायचं... 

Doing exercise regularly but not getting proper effect? Then must concentrate on post workout meal  | Post workout meal: व्यायाम तर रेग्युलर करताय, तरी वजन कमी होत नाही? वर्कआऊटनंतरचा आहार बदला, चुकीचं खाल्लं तर..

Post workout meal: व्यायाम तर रेग्युलर करताय, तरी वजन कमी होत नाही? वर्कआऊटनंतरचा आहार बदला, चुकीचं खाल्लं तर..

Highlightsव्यायाम केल्यानंतर जर तुम्हाला व्यवस्थित आहार मिळणार नसेल, तर व्यायामाचा काहीही उपयाेग नाही. त्यामुळे आहाराबाबतच्या या काही गोष्टी लक्षात घ्या आणि त्यानुसार तुमचं डाएट प्लॅन करा.

नियमित व्यायाम करूनही कोलेस्टरॉल कमी होत नाही, वजन घटत नाही किंवा तम्हाला अपेक्षित असा फायदा, फिटनेस मिळत नसेल, तर तुमचं काय चुकतंय हे लक्षात घेणं गरजेचं आहे.. आपण व्यायाम तर खूप करतो, पण त्या तुलनेत आहारावर (what to eat after workout?) लक्ष देत नाही. त्यामुळे मग व्यायाम करून शरीराला फायदा होणं तर दूरच पण खूप जास्त अशक्तपणा, थकवा, अंगदुखी (weakness due to workout) असे त्रास जाणवू लागतात. 

 

व्यायाम करतो म्हणजे मग आता आपण काहीही खाऊ शकतो, हा समज अतिशय चुकीचा आहे, असं सांगत आहेत सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekat). त्यांनी त्यांचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामला शेअर (instagram share) केला असून या व्हिडिओमध्ये त्या व्यायामानंतरचा आहार कसा असावा, काय खावं आणि काय टाळावं हे सांगत आहेत. व्यायाम केल्यानंतर जर तुम्हाला व्यवस्थित आहार मिळणार नसेल, तर व्यायामाचा काहीही उपयाेग नाही. त्यामुळे आहाराबाबतच्या या काही गोष्टी लक्षात घ्या आणि त्यानुसार तुमचं डाएट प्लॅन करा.

 

१. व्यायाम करणे ही एकप्रकारची डिहाड्रेटिंग क्रिया असते. यादरम्यान आपल्याला घाम येतो. त्यामुळे शरीरातून पाणी बाहेर जातं. डिहायड्रेशन होतं. हा त्रास टाळण्यासाठी व्यायाम करताना मध्ये मध्ये एखादा घोट पाणी घेतलं तरी चालतं. पण व्यायाम झाल्यानंतर पुढच्या २० मिनिटांत तुम्ही १ ग्लास पाणी प्यायला हवं. यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल आणि त्यामुळे व्यायामानंतरचा थकवा, अशक्तपणा जाणवणार नाही. 
२. व्यायाम झाल्यानंतर पुढचे २० मिनिट ते २ तास या काळात स्मोकिंग, चहा- कॉफी पिणे किंवा मद्यपान करणे टाळावे. 

 

३. रक्तामध्ये जशी साखर असते, तशीच आपल्या स्नायुंमध्येही असते. यालाच मसल ग्लायकोजन म्हणतात. व्यायाम केल्यानंतर मसल ग्लायकोजन आणि ब्लड- शुगर लेव्हल कमी होत जातात. असे झाल्यास शरीराला असलेली पोषकतत्त्वांची गरज भागविण्यासाठी मग शरीरातले फाईन टिश्यू आणि प्रोटीन्स ब्रेकडाऊन होण्याची प्रक्रिया सुरू होतो. असे झाल्यास खूप थकवा, अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी व्यायाम झाल्यानंतर आपल्या शरीराला पहिल्या २० मिनिटांत मायक्रोन्युट्रियंट्स मिळणे गरजेचे आहे.

 

४. त्यासाठीच व्यायाम झाल्यानंतर पहिल्या २० मिनिटांत तुम्ही एखादं केळ, प्रोटिन शेक, बनाना शेक, मल्टीव्हिटॅमिन शेक यापैकी काहीतरी घेणं गरजेचं आहे. व्यायाम केल्यानंतर शरीरातील फ्री रॅडिकल्सचं प्रमाण वाढलेलं असतं. या रॅडिकल्सला सेट करण्यासाठी, सेसिंटीव्ह झालेल्या हार्मोन्सला स्टेबल करण्यासाठी हा २० मिनिटांत काही तरी हेल्दी खाण्याचा किंवा मायक्रोन्युट्रियंट्स पोटात जाण्याचा नियम उपयुक्त ठरतो. 

तिशी आली तरी फिट राहायचं तर 'फॅट्स'चं गणित चुकवू नका, अन्यथा वाढेल वजन आणि पुढे धोका..

५. २० मिनिटांनंतर तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर असं काहीही घेऊ शकता. ऑफिसमधून थेट जीमला जात असाल तर व्यायाम झाल्यानंतर भरपूर भाज्या असणारं सॅण्डविज खाल्लं तरी चालेल. 
 

Web Title: Doing exercise regularly but not getting proper effect? Then must concentrate on post workout meal 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.