Lokmat Sakhi >Fitness > व्यायाम न करताही मिळतात व्यायामाचे फायदे, करा नियमित 3 गोष्टी

व्यायाम न करताही मिळतात व्यायामाचे फायदे, करा नियमित 3 गोष्टी

व्यायामासाठी वेळ नाही, व्यायामाची इच्छा नाही तरी व्यायाम करुन व्यायामाचे  जे फायदे मिळतात ते व्यायाम न करताही मिळवता येतात. त्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 06:27 PM2022-01-07T18:27:00+5:302022-01-07T18:40:08+5:30

व्यायामासाठी वेळ नाही, व्यायामाची इच्छा नाही तरी व्यायाम करुन व्यायामाचे  जे फायदे मिळतात ते व्यायाम न करताही मिळवता येतात. त्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या.

Doing these 3 things intentionally for getting benefits of exercise without doing exercise | व्यायाम न करताही मिळतात व्यायामाचे फायदे, करा नियमित 3 गोष्टी

व्यायाम न करताही मिळतात व्यायामाचे फायदे, करा नियमित 3 गोष्टी

Highlights दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल, संधी मिळेल तेव्हा चालावं. काम करतांनाही स्ट्रेचिंग करता येतं. बागकाम, घरकाम यातलं जे काम आवडेल, ज्यात शारीरिक कष्ट पडतील ती कामं अवश्य करावं.

व्यायाम ही अशी बाब आहे ज्यावर चर्चा जास्त होते, काम कमी. व्यायाम करण्याचे फायदे कितीही असले तरी व्यायाम न करण्याची कारणं त्यापेक्षा अधिक असतात, हे मात्र खरं. व्यायामानं आनंद मिळतो पण कधी तो केल्यानंतर आधी तर कंटाळाच येतो. व्यायाम अंगवळणी पडल्याशिवाय त्यात सातत्य आणि त्यातून मिळणारे फायदे अशक्य. कोणाला व्यायामाचा खरंच कंटाळा असतो तर कोणाला इच्छा असूनही व्यायाम करता येत नाही. आपण व्यायाम करत नाही याचं शल्य अनेकांना बोचतं, पण व्यायाम मात्र करवत नाही. हे फक्त आपल्याच बाबतीत होतं म्हणून अपराधी वाटून घेण्याचं कारण नाही. जगात बहुतांश व्यक्तींच्या बाबतीत हे असंच होत असतं.

Image: Google

आज जगात अशी एकही समस्या नाही ज्यावर आपल्याला काही उपाय सापडलेला नाही.तसंच व्यायामाचंही आहे. व्यायाम करुन आरोग्याला शरीराला जे फायदे मिळतात ते तर हवे असतात, पण व्यायाम मात्र करायचा नसतो/ करायची इच्छा असूनही करायला वेळ नसतो.  या समस्येवर तज्ज्ञांनी काही उपाय सांगितलेले आहेत. ते करुन आपण व्यायाम न करताही व्यायामाचे फायदे मिळवू शकतो. 

व्यायाम न करता  व्यायामाचे फायदे  मिळवण्यासाठी..

Image: Google

1. जास्तीत जास्त चाला

 दिवसभराच्या आपल्या व्यस्त जीवनशैलीत, कामाच्या व्यापात व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर स्वत:ला एक चांगली सवय लावून घ्यावी. दिवसभरात जितकं शक्य आहे तितकं चालावं. जिथे आपल्यालाच वाटतं की वाहान टाळून चालून आपण हे काम करु शकतो, तिथे अवश्य वाहानापेक्षा चालण्याचा पर्याय निवडावा. तसेच ऑफिसमधे कितीही टेन्शनचं काम असलं तरी ते बसून करावं लागतं. या बैठ्या कामाच्या पध्दतीचा शारीरिणाणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. वजनही केवळ एका ठिकाणी तासनतास बसल्यानं वाढतं. त्यामुळे ऑफिसमधे बसून काम असलं तरी  दर 45 मिनिटांनी जागेवरुन उठावं. एक 100-200 पावलं चालून यावं. यामुळे परत येऊन कामाचा स्पीडही वाढतो, मूड फ्रेश होतो आणि बसून आमलेलं अंग मोकळं होतं. शक्य असेल तर ऑफिसमधे गाडी जरा लांब जागी पार्क करावी. जेणेकरुन गाडी पार्क करुन कामाच्या जागी यायला, कामाच्या जागेवरुन गाडीपर्यंत जायला थोडं चालायला मिळेल. फोनवर जर कामाचं बोलणं  दहा पंधरा मिनिटं चालणार असेल तर जागेवर बसून न बोलता चालत चालत बोलावं. यामुळेही शरीराला व्यायाम होतो आणि चालण्याचं प्रमाणही वाढतं. वर्क फ्राॅम असलं तरी घरात चालण्यासाठीचे ब्रेक अवश्य घ्यावेत. रात्रीच्या जेवणानंतर विनाकारण टाइमपास म्हणून टी.व्ही पाहाणार असाल तर टीव्हीसमोर बसण्यापेक्षा चालण्याचा पर्याय निवडावा. सुट्टीच्या दिवशी भाजी आणणं, दूध आणणं ही कामं मुद्दाम चालत जावून करावीत. तसेच घरी जाताना, ऑफिसला जाताना लिफ्टची सोय असली तरी लिफ्ट टाळून जिनेचढावेत- उतरावेत. जिने चढणं उतरणं हा देखील उत्तम व्यायाम आहे. व्यायामाला ठरवून वेळ देता येत नसेल तर चालणं, जिने चढणं -उतरणं ही कामं मुद्दाम करावीत. 

Image: Google

2. कामाची जागा न सोडताही करा स्ट्रेचिंग

ऑफिसमधे किंवा घरी बसून काम करताना जास्त वेळ बैठक झाली तर खुर्चीवर बसूनही  किंवा खुर्चीजवळ उभं राहूनही स्ट्रेचिंगचे प्रकार करता येतात. यासंबंधीचे तज्ज्ञांनी सांगितलेल्या पध्दती युटयूबवरही उपलब्ध आहे. त्यामुळे काम करताना स्ट्रेचिंगचे प्रकार कसे करावेत हे शिकून घेऊन मधून् मधून स्ट्रेचिंग करावं. स्ट्रेचिंग केल्यामुळे शरीराला ताण मिळून काम करताना आलेला कंटाळा निघून जातो. तसेच शरीराला आवश्यक असलेला ताण मिळतो. बसून बसून आपलं पोट निघालंय, कमरेचा घेर वाढतोय अशी तक्रार न करता ते कमी करता येतील असे स्ट्रेचिंग आपण काम करतानाच्या वेळीही करु शकतो. 

Image: Google

3. बागकाम घरकाम जे आवडेल ते अवश्य करा

बागकाम करणं हा उत्तम शारीरिक आणि मानसिक व्यायाम आहे.  बागकाम करायचा कंटाळा येत नाही. वेळ कसा जातो ते कळत नाही. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी किंवा रोज शक्य असल्यास थोडा वेळ बागकाम करावं. घरात बाग मोठी  नसेल तर ज्यात शारीरिक कष्ट जास्त आहेत ते घरातलं काम मुद्दाम आपण करावं. आता तर फिटनेस तज्ज्ञ ओट्याजवळ उभं राहून केवळ स्वयंपाक करुन नका स्वयंपाक करतानांही वजन कसं कमी करता येतं हे सांगणाऱ्या शारीरिक क्रिया शिकवतात. त्यामुळे व्यायामाला वेळ नाही यामागची कारणं खूप असली ,अपरिहार्य असली तरी व्यायाम न करताही शरीराला व्यायाम देण्याचे हे मार्ग आहेत. शरीर आणि मन प्रसन्न आणि निरोगी ठेवायचं असेल तर शरीराला हालचाल हवीच. मग या हालचालीला व्यायाम म्हणा  नाहीतर व्यायाम करायला जमत नाही म्हणून मुद्दाम करायची ॲक्टिव्हिटी म्हणा दोन्हीचा अर्थ एकच आणि फायदेही सारखेच. 

Web Title: Doing these 3 things intentionally for getting benefits of exercise without doing exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.