Lokmat Sakhi >Fitness > पाठ- कंबर खूप दुखते? अर्ध पिंच मयुरासन करा, आखडलेलं अंग होईल मोकळं- ५ फायदे 

पाठ- कंबर खूप दुखते? अर्ध पिंच मयुरासन करा, आखडलेलं अंग होईल मोकळं- ५ फायदे 

Fitness Tips: पाठ- कंबर दुखत असेल, आखडून गेली असेल तर योग अभ्यासकांनी सांगितलेलं हा व्यायाम करून पाहा...(best exercise to get rid of back pain)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2024 16:21 IST2024-12-26T17:54:01+5:302024-12-27T16:21:47+5:30

Fitness Tips: पाठ- कंबर दुखत असेल, आखडून गेली असेल तर योग अभ्यासकांनी सांगितलेलं हा व्यायाम करून पाहा...(best exercise to get rid of back pain)

dolphin pose or ardh pinch mayurasana for reducing back pain, best exercise to get rid of back pain | पाठ- कंबर खूप दुखते? अर्ध पिंच मयुरासन करा, आखडलेलं अंग होईल मोकळं- ५ फायदे 

पाठ- कंबर खूप दुखते? अर्ध पिंच मयुरासन करा, आखडलेलं अंग होईल मोकळं- ५ फायदे 

Highlightsडॉल्फिन पोझ किंवा अर्ध पिंच मयुरासन केल्यामुळे पायाचे स्नायू चांगले ताणले जातात. त्यामुळे ज्यांना वारंवार पाय दुखण्याचा, पोटऱ्या ओढल्यासारख्या होण्याचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हे आसन करणे फायदेशीर ठरते. 

योग्य व्यायाम किंवा याेगासनं हा बऱ्याच आजारांवरचा एक उत्तम उपाय असू शकतो. हल्ली एकाच जागी तासनतास बसून काम केल्यामुळे अनेकांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास होतो. अनेक लोकांना चारचाकी किंवा दुचाकी जास्त चालवली तरी पाठ, कंबर दुखते. दुखण्याचं प्रमाण खूप तीव्र असेल तर लगेचच्या लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अन्यथा हा त्रास कमी होण्यासाठी काही व्यायाम तुम्ही घरच्याघरी लगेच करून पाहू शकता. पाठदुखी कमी करण्यासाठीचा एक व्यायाम आहे अर्ध पिंच मयुरासन (dolphin pose or ardh pinch mayurasana for reducing back pain). यालाच डॉल्फिन पोझ असेही म्हणतात. हा व्यायाम कसा करायचा आणि तो करण्याचे इतर कोणते फायदे आहेत ते पाहूया..(best exercise to get rid of back pain)

 

डॉल्फिन पोझ किंवा अर्ध पिंच मयुरासन कसे करावे?

डॉल्फिन पोझ किंवा अर्ध पिंच मयुरासन कसे करावे याविषयी हेल्थशॉट साईटला योग अभ्यासक सौरभ बोथरा यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार सगळ्यात आधी गुडघे आणि तळहात जमिनीला टेकवा.

Winter Care: त्वचा कोरडी पडून काळवंडली? लावा बदामाचं होममेड क्रिम- दुसऱ्या मॉईश्चरायझरची गरजच नाही

त्यानंतर हाताचे कोपरे जमिनीला टेकवा आणि हात पुढे पसरवून ठेवा. आता हळूहळू डोके जमिनीला टेकवा आणि त्याचवेळी गुडघे जमिनीपासून वर उचला.

डोके जमिनीला टेकलेले असतानाच पाय गुडघ्यात न वाकवता सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्य होईल तेवढा वेळ ही आसनस्थिती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. 

 

डॉल्फिन पोझ किंवा अर्ध पिंच मयुरासन करण्याचे फायदे

१. हा व्यायाम केल्याने पाठ, कंबरेचे आखडून गेलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होते.

२. शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी डॉल्फिन पोझ किंवा अर्ध पिंच मयुरासन करणे फायद्याचे ठरते.

कधी कधी एन्झायटी वाढून खूप अस्वस्थ होतं? ५ पदार्थ खा- मन शांत होऊन रिलॅक्स वाटेल

३. हा व्यायाम केल्यामुळे डोक्याच्या भागात चांगला रक्तपुरवठा होतो. त्यामुळे थकवा, ताण कमी होण्यास मदत होते.

४. डॉल्फिन पोझ किंवा अर्ध पिंच मयुरासन केल्यामुळे पायाचे स्नायू चांगले ताणले जातात. त्यामुळे ज्यांना वारंवार पाय दुखण्याचा, पोटऱ्या ओढल्यासारख्या होण्याचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हे आसन करणे फायदेशीर ठरते. 

 

Web Title: dolphin pose or ardh pinch mayurasana for reducing back pain, best exercise to get rid of back pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.