Lokmat Sakhi >Fitness > जिम लावायला वेळ नाही, मग घरच्या घरी करा टेबल एक्सरसाईज, फिटनेस वाढेल उत्तम...

जिम लावायला वेळ नाही, मग घरच्या घरी करा टेबल एक्सरसाईज, फिटनेस वाढेल उत्तम...

10 Minute Total Body Strength Workout Using Your Coffee Table : व्यायाम करण्याची साधने आपल्याकडे नसतील तर घरातील खुर्च्या व टेबल यांचा वापर करून रोज थोडा व्यायाम आपण नक्कीच घरी करू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2023 07:25 PM2023-01-26T19:25:06+5:302023-01-26T19:36:29+5:30

10 Minute Total Body Strength Workout Using Your Coffee Table : व्यायाम करण्याची साधने आपल्याकडे नसतील तर घरातील खुर्च्या व टेबल यांचा वापर करून रोज थोडा व्यायाम आपण नक्कीच घरी करू शकतो.

Don't have time to go to the gym, then do table exercises at home, fitness will increase... | जिम लावायला वेळ नाही, मग घरच्या घरी करा टेबल एक्सरसाईज, फिटनेस वाढेल उत्तम...

जिम लावायला वेळ नाही, मग घरच्या घरी करा टेबल एक्सरसाईज, फिटनेस वाढेल उत्तम...

आपले शरीर फिट ठेवण्यासाठी आपण योग्य आहारासोबतच त्याला व्यायामाची ही जोड देतो. शरीराच्या प्रत्येक भागासाठी वेगवेगळे व्यायामप्रकार करणे गरजेचे आहे. हे व्यायाम प्रकार करण्याच्या अनेक सोप्या पद्धतीसुद्धा असतात. यामध्ये सोपे आणि सहज व्यायाम प्रकार करुन आपण आपले शरीर चांगल्या प्रकारे टोन करु शकतो. ऑफिस कल्चरमध्ये झालेला बदल, घर बसल्या `वर्क फ्राॅम होम'ची नवी संकल्पना अशा काही गोष्टींचा प्रभाव आपल्या आरोग्यावर होत आहे. सुडौल शरीर आणि आरोग्यासाठी व्यायाम हा फार महत्वाचा असतो. पण सगळ्यांनाच जीममध्ये जाऊन व्यायाम करणे शक्य होत नाही. जर आपल्याला जीममध्ये जाऊन व्यायाम करणे शक्य होत नसेल तर आपण काही व्यायामप्रकार घरीही करु शकतो. जिममध्ये व्यायाम करण्यासाठी जशी साधने असतात तशी साधने आपल्याकडे नसतील तर घरातील खुर्च्या व टेबल यांचा वापर करून रोज थोडा व्यायाम आपण नक्कीच घरी करू शकतो(10 Minute Total Body Strength Workout Using Your Coffee Table).

घरातील टेबलाचा वापर करून व्यायाम कसा  करता येईल ? 

१. स्क्वॅट्स (Squats) - स्क्वॉट हा व्यायामप्रकार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या लोअर बॉडीचा वापर करावा लागेल. सर्वात आधी तुम्हाला सरळ उभे राहून हात समोरच्या बाजूला ठेवायचे आहेत. त्यानंतर पुन्हा पाठ ताठ ठेवून मागच्या बाजूला बसा. मागच्या बाजूला बसताना टेबल तुमच्या मागे ठेवून द्या. टेबलाला हलकेच स्पर्श होईल इतके खाली बसा. जसे की, तुम्ही टेबलवर बसले आहात, तसे बसा. फक्त हे लक्षात ठेवा की, हा व्यायाम करताना तुम्हाला ९० - १०० डिग्रीवर मागच्या बाजूला बसायचे आहे. 

२. माउंटन क्लाइंबर (Mountain Climber) -  माउंटन क्लाइंबर हा व्यायाम करताना टेबलावर दोन्ही हात ठेवून पुशअप व्यायामाच्या स्थितीमध्ये शरीर आणावे. मग एकानंतर दुसरा पाय गुडघ्यात मोडून पुढे आणून ताणावा. हे करत असताना अ‍ॅब्सच्या आसपासचा भाग ताठ ठेवायचा प्रयत्न करावा. व्यायामा दरम्यान हृदयाचे ठोके वाढतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरीज बर्न होतात.

३. लंजेस (lunges) - लंजेस म्हणजे एका जागी उभे राहून तुम्हाला एक पाय पुढे घेऊन तो पुढच्या दिशेला काटकोनात वाकवायचा असतो. असे करताना तुम्हाला तुमचा पाय तळव्यांच्यापुढे जाऊ द्यायचा नाही. हा प्रकार तुम्हाला थोडा जलद गतीने करायचा आहे. तुम्ही दुसरा पाय पुढे घेताना तुम्हाला उडी मारुन दुसऱ्या पायाने लंजेस मारायचे आहेत.  

घरातील टेबलाचा वापर करून आपण घरच्या घरी 'टेबल एक्सरसाइज' कसे करू शकतो याबद्दलचा एक व्हिडीओ half_life_to_health या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. 

४. ट्रायसेप बेंच डिप्स (Triceps Bench Dips) - बेंच डीप्स करण्यासाट्नी आपल्याला एक फ्लॅट बेंचची किंवा टेबलची गरज असते. टेबलाकडे पाठ करून उभे राहा. आता याच अवस्थेत आपले हात मागे टेबलावर ठेवा. हात टेबलावर ठेवल्यावर हळुहळु हातावर जोर देत खाली बसा. आता पाय समोरच्या बाजूने पसरवायचे आहे. मग हळू हळू खाली जायाचे आहे आणि मग पुन्हा वर यायचे आहे. हे करत असताना हातावर आणि पायांच्या टाचांवर जोर द्यावा. 

५. शोल्डर टॅप्स (Shoulder Taps) - हा व्यायाम करताना सर्वप्रथम तुमच्या समोर टेबल ठेवा. आता आपले दोन्ही हात या टेबलावर ठेवून पुशअप्स करण्याच्या स्थितीत या. यानंतर एका हातावर शरीराचा तोल सावरून दुसरा हात विरुद्ध खांद्याला (म्हणजे उजवा हात उचलला असेल तर त्याने डाव्या खांद्याला स्पर्श करा) स्पर्श करून पुन्हा आहे त्याच स्थितीत आणा. असे दोन्ही हातांचे करा. 

६. रिवर्स प्लॅंक (Reverse Plank) - रिवर्स प्लॅंक करण्यासाठी सरळ ताठ उभे राहा. टेबल आपल्या मागे ठेवून द्या. आपली पाठ टेबलाच्या बाजूने असेल असे उभे राहा. आता टेबलाच्या कडांवर हात ठेवा. पाय सरळ लांब करा. आता हातांवर आणि पायांवर जोर देत संपूर्ण शरीर हलकेच वर खाली करा.

 

Web Title: Don't have time to go to the gym, then do table exercises at home, fitness will increase...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.