Lokmat Sakhi >Fitness > तुम्हालासुद्धा ही ५ लक्षण जाणवतात का ? असे असेल तर आपल्याला 'बॉडी डिटॉक्स' करण्याची गरज आहे...

तुम्हालासुद्धा ही ५ लक्षण जाणवतात का ? असे असेल तर आपल्याला 'बॉडी डिटॉक्स' करण्याची गरज आहे...

5 Warning Signs Your Body Needs a detox : शरीराला बॉडी डिटॉक्सची गरज असते तेव्हा शरीर देत ५ महत्वपूर्ण संकेत, नेमके कोणते आहेत ते संकेत, वेळीच ओळखा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 08:45 AM2023-10-19T08:45:00+5:302023-10-19T08:45:04+5:30

5 Warning Signs Your Body Needs a detox : शरीराला बॉडी डिटॉक्सची गरज असते तेव्हा शरीर देत ५ महत्वपूर्ण संकेत, नेमके कोणते आहेत ते संकेत, वेळीच ओळखा...

Don’t ignore these 5 tell-tale signs that say your body needs a detox,5 Warning Signs Your Body Needs a detox | तुम्हालासुद्धा ही ५ लक्षण जाणवतात का ? असे असेल तर आपल्याला 'बॉडी डिटॉक्स' करण्याची गरज आहे...

तुम्हालासुद्धा ही ५ लक्षण जाणवतात का ? असे असेल तर आपल्याला 'बॉडी डिटॉक्स' करण्याची गरज आहे...

'बॉडी डिटॉक्स' हा शब्द आजपर्यंत आपण अनेकवेळा ऐकला असेलच. 'बॉडी डिटॉक्स' (Don’t ignore these 5 tell-tale signs that say your body needs a detox) ही आपल्या शरीराची एक महत्वपूर्ण प्रक्रिया असून फार कमी जणांना याबद्दल माहित असते. डिटॉक्सिफिकेशन्सच्या माध्यमातून शरीरातील घाण स्वच्छ केली जाते. ही घाण वेळीच स्वच्छ झाली नाही तर आरोग्याच्या अनेक लहान - मोठ्या समस्या निर्माण होतात. शरीराची अंतर्गत स्वच्छता शरीराच्या बाह्य स्वच्छते इतकीच महत्त्वाची असते. शरीरातील अपायकारक घटक अनेक गंभीर समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. निरोगी राहण्यासाठी यावर उपाय करणे किंवा योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. जंक फूड, पुरेसे पाणी न पिणे, व्यायाम न करणे, समतोल आहार न घेणे अशा अनेक वाईट सवयींमुळे ही समस्या निर्माण होते. शरीरातील या अपायकारक घटकांवर मात करणे म्हणजेच शरीर ‘डिटॉक्स’ (What are 5 signs your body is in need of a detox?) करणे होय. जेव्हा शरीरात अशा घटकांमध्ये वाढ होते, तेव्हा शरीर इशारा देण्यास सुरुवात करते.

घाण (Detox Symptoms: What are the Signs Your Body is Detoxing?) केवळ आपल्या आजूबाजूला असते असे नाही तर आपल्या शरीरातही असते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा आपल्याला सामना करावा लागतो. अनेकदा असे घडते की आपल्याला कोणत्याही कारणाशिवाय सुस्ती वाटू लागते, अचानक आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागतात, आपले अन्न नीट पचत नाही. जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर समजून जा की तुम्हाला तुमचे शरीर डिटॉक्स (5 Warning Signs Your Body Needs a detox) करणे आवश्यक आहे. म्हणजेच, शरीरातील विषारी पदार्थ (Signs That Indicate Your Body Needs A Detox Right Now) काढून टाकणे आवश्यक आहे. या विषारी घटकांमुळे आपण आजारी पडण्याआधी, स्वतःचे संरक्षण करा आणि शरीर निरोगी ठेवा. जेव्हा आपल्याला बॉडी डिटॉक्स करण्याची गरज असते तेव्हा शरीर नेमके कोणते इशारे देते हे लक्षात घेऊयात(Don’t ignore these 5 tell-tale signs that say your body needs a detox).

कोणती लक्षण दिसल्यास बॉडी डिटॉक्स करण्याची आवश्यकता आहे ? 

१. पचनक्रियेत बिघाड होणे :- पचनक्रिया सुरळीत चालणे ही आपल्या शरीरातील एक महत्वपूर्ण क्रिया आहे. ही महत्वपूर्ण प्रक्रिया बिघडली की समजा आपण काहीतरी चुकीचे करत आहोत. पोटात गॅस होणे, अपचन, मळमळ होणे, उलटी होणे, जळजळ होणे, पोट फुगणे, उलटी येणे यांसारख्या समस्या निर्माण झाल्यास समजावे की आपल्याला बॉडी डिटॉक्स करण्याची गरज आहे. या सगळ्या मार्फत पोटांतील घाण बाहेर फेकण्यास मदत होते. पोट हे सर्व समस्यांचं मूळ असत त्यामुळे पोट वेळीच स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. 

दिवसभरात १०,००० पाऊले चालले म्हणजे हार्ट ॲटॅकचा धोकाच नाही, तज्ज्ञ सांगतात असं तुम्हाला वाटत असेल तर...

२. सतत थकवा वाटणे :- सतत थकवा आल्यासारखा वाटल्याने दिवसभर कशातही लक्ष न लागणे. कोणतही काम करताना ऊर्जा नसणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. अशावेळी साखर, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, प्रोसेस्ड फूड टाळा. अशा परिस्थतीत, जास्तीत जास्त पाणी पिणे आणि हिरव्या भाज्या खाणे फायदेशीर ठरते. पुरेशी झोप घेऊनही जर तुम्हाला दिवसभर झोप येत असेल आणि थकवा जाणवत असेल, तर हे लक्षण आहे की तुम्हाला तुमचे शरीर डिटॉक्स करणे आवश्यक आहे. 

३. चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या येण्याचे प्रमाण वाढणे :- जर त्वचेशी संबंधित समस्या आपल्याला वारंवार त्रास देत असतील, तर हे शरीरात घाण जमा होत असल्याचेही लक्षण आहे. जेव्हा रक्तामध्ये विषारी पदार्थ जमा होऊ लागतात तेव्हा चेहऱ्यावर पिंपल्स, पिंपल्स, रॅशेस, डाग सारखे येत राहतात किंबहुना त्यांचे प्रमाणही वाढते.

कितीही गोळ्या, औषध खाऊन अ‍ॅसिडिटी जात नाही ? सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगते ४ सोपे उपाय...

४. वजन वाढणे :- वजन वाढणे हे सुद्धा आपल्या शरीरात विषारी घटक वाढले असल्याचा एक प्रमुख इशारा आहे. जास्त करुन आहाराच्या चुकीच्या सवयीं असणारे लोक या समस्येने हैराण असतात. काही लोक हे गरजेपेक्षा जास्त खातात, जेवढ्या जास्त कॅलरी ते घेतात तितक्या कमी खर्च करतात. त्यामुळे कॅलरी ऊर्जेला चरबीच्या रुपात जमा करुन वजन वाढतं. अशावेळी तेवढंच खावं जेवढं आपण पचवू शकता.

तुम्हाला पण वर्कआऊट पूर्वी चहा पिण्याची सवय आहे का ? चहाची तलफ लागलीच तर चहाला उत्तम पर्याय...

५. तणाव असणे :- आपल्या शरीरातील वाढत्या विषारी तत्वांमुळे आपल्याला सतत तणाव जाणवतो. तणावामुळे शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया प्रभावित होतात. पर्यावरणातील प्रदूषण, किटकनाशके तसेच जंक फूडमुळे तणाव वाढतो. तणावामुळे शरीरात विषारी तत्वांचा प्रभाव वाढतो, याला टॉक्सीक फ्रि रॅडिकल्स म्हटले जाते.

ट्रेडमिलवर चालावे की बाहेर मॉर्निंग वॉक ? फिट राहण्यासाठी नेमकं काय आहे फायदेशीर...

Web Title: Don’t ignore these 5 tell-tale signs that say your body needs a detox,5 Warning Signs Your Body Needs a detox

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.