Lokmat Sakhi >Fitness > घाणेरड्या-कळकट योगा मॅटवरच रोज योगासनं करता? ५ टिप्स - मॅट ठेवा स्वच्छ, आजारांना आमंत्रण नको...

घाणेरड्या-कळकट योगा मॅटवरच रोज योगासनं करता? ५ टिप्स - मॅट ठेवा स्वच्छ, आजारांना आमंत्रण नको...

How To Clean Your Yoga Mat : योगा मॅटवर आपर रोज योगासनं करणार असू तर ती स्वच्छही हवी, कळकट मॅटवर आसनं करणं चूकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 02:15 PM2023-03-24T14:15:24+5:302023-03-24T14:21:28+5:30

How To Clean Your Yoga Mat : योगा मॅटवर आपर रोज योगासनं करणार असू तर ती स्वच्छही हवी, कळकट मॅटवर आसनं करणं चूकच

Don’t let your yoga mat be a hotspot of germs. Clean it the right way in 5 simple steps | घाणेरड्या-कळकट योगा मॅटवरच रोज योगासनं करता? ५ टिप्स - मॅट ठेवा स्वच्छ, आजारांना आमंत्रण नको...

घाणेरड्या-कळकट योगा मॅटवरच रोज योगासनं करता? ५ टिप्स - मॅट ठेवा स्वच्छ, आजारांना आमंत्रण नको...

आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या हेल्थच्या बाबतीत खूपच काळजी घेताना दिसतात. सध्याच्या बिझी शेड्युलमधून थोडासा वेळ काढून लोक 'फिटनेस फ्रिक' बनण्याकडे लक्ष देत आहेत. आपल्या आरोग्याची काळजी घेताना आपण डाएट, जिम, योगा यांसारख्या विविध पर्यायांचा वापर करतो. काहीवेळा आपण जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करतो तर कधी घरच्या घरीच करतो.जिमला जाताना आपण गरजेच्या असणाऱ्या सर्व वस्तू आपल्या जिमच्या बॅगेत भरुन नेतो. योगा मॅट ही  जिमच्या बॅगेतील सर्वात महत्वाची वस्तू आहे. या योगा मॅटचा वापर करुन आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज किंवा योगा त्यावर करतो. योगा मॅट आपण दररोज जिममध्ये किंवा घरी वापरतो. पण त्याच्या स्वच्छतेचं काय ? योगा मॅट कशी स्वच्छ करावी किंवा त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल बऱ्याचजणांना माहिती नसते. 

योगा मॅट वारंवार वापरुन अस्वच्छ झाल्यास त्यावर बॅक्टेरिया खूप मोठ्या प्रमाणांत वाढतात. योगा मॅट्सवर अनेक विषाणू, जीवाणू आणि बुरशी मोठ्या प्रमाणांत वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे आपल्याला त्वचेची ऍलर्जी किंवा कोणत्याही संसर्गजन्य रोगाचा सहज धोका निर्माण होऊ शकतो. योगा स्टुडिओ आणि जिममध्ये लोक खूप घाम गाळतात, हा घाम या मॅट्सवरही पडतो. अशा परिस्थितीत जर त्यांची नियमित स्वच्छता केली जात नसेल तर त्यातून दुर्गंधी येऊ लागते. जर या मॅटची स्वच्छता योग्यवेळी आणि योग्य प्रकारे केली नाही तर आपल्या त्वचेला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात(Don’t let your yoga mat be a hotspot of germs. Clean it the right way in 5 simple steps).

योगा मॅट नेमकी कशी स्वच्छ करावी ? 

१. योगा मॅट कोमट पाण्यात भिजवा :- योगा मॅट धुण्यासाठी प्रथम एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यानंतर त्यात २ ते ३ टेबलस्पून डिश वॉश लिक्विड घालावे. डिश वॉश लिक्विडच्या ऐवजी आपण  सौम्य डिटर्जंटचा देखील वापर करु शकता. नंतर या सोल्युशनमध्ये योगा मॅट भिजवा. यामुळे मॅटवर साचलेली सर्व घाण निघून जाईल. पण लक्षात ठेवा गरम पाणी वापरू नका. यामुळे योगा मॅट खराब होण्याची शक्यता असते. योगा मॅट सुमारे ५ ते १० मिनिटे भिजत ठेवा. यामुळे आपल्याला योगा मॅट साफ करणे सोपे होईल.

२. योगा मॅट स्पंजने अशी करा स्वच्छ :- आपण योगा मॅट काही मिनिटांसाठी कोमट पाण्यात भिजवली आहे, आता ती स्वच्छ घासून घ्यावी. स्पंजने किंवा सॉफ्ट दातांच्या ब्रशने अन्यथा हातांनी योगा मॅट घासून घ्या. योगा मॅटचा प्रत्येक कोपरा पूर्णपणे स्वच्छ करा. आपण योगा मॅट कमीतकमी दोनदा पूर्णपणे घासून घ्यावी. योगा मॅट स्वच्छ धुतांना ती दोन्ही बाजूंनी घासून घ्यावी. यामुळे आपली योगा मॅट चमकदार होईल.

३. योगा मॅट स्वच्छ पाण्याने धुवून घ्या :- योगा मॅट व्यवस्थित घासून त्यावरची घाण, मळ काढून टाकल्यानंतर योगा मॅट स्वच्छ पाण्यात धुवावी. योगा मॅटमधून  सर्व घाण आणि साबण निघेपर्यंत ती वाहत्या पाण्याखाली धुवून घ्यावी. यासाठी आपल्याला जास्त पाण्याचा वापर करावा लागेल. योगा मॅट व्यवस्थित स्वच्छ करण्यासाठी बाथरूममध्ये वाहत्या नळाखाली योगा मॅट थोड्या वेळासाठी ठेवून द्यावी.

४. योगा मॅटमधून जास्तीचे पाणी काढून टाका :- योगा मॅट चांगली नेटनेटकी धुवून झाल्यानंतर आता फक्त आपल्याला त्यातील अतिरिक्त पाणी शोषून घ्यायचे आहे. यासाठी, आपल्याला प्रथम योगा मॅट वेगाने दोन्ही हातांनी झटकावी लागेल. जेणेकरून त्यात साचलेले जास्तीचे पाणी निघून जाईल. याशिवाय योगा मॅटच्या आत कापड ठेवा. हे कापड योगा मॅटमध्ये असलेले पाणी काही प्रमाणात शोषून घेते. यामुळे काही वेळातच आपली योगा मॅट संपूर्णपणे कोरडी होते. 

मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा व्यायाम करण्याआधी या ९ गोष्टी लक्षात ठेवा...

५. योगा मॅट संपूर्ण कोरडी करुन घ्यावी :- योगा मॅट आता पूर्णपणे स्वच्छ असल्याने, आपण ती कोरडी करावी. योगा मॅट सुकविण्यासाठी आपण पँट हॅन्गरचा वापर करु शकता. याव्यतिरिक्त आपल्याकडे ड्रायिंग रॅक असल्यास, त्यावर योगा मॅट सुकवायला ठेवा. यामुळे योगा मॅट कोरडी होईल. ही योगा मॅट लगेच सुकवण्यासाठी वॉशिंग मशीनच्या कपडे वाळवण्याच्या ड्रायरमध्ये घालून सुकवू नका. यामुळे आपल्या योगा मॅटचे नुकसान तर होऊ शकतेच,  तसेच ही मॅट रबरापासून बनलेली असल्यामुळे आग लागण्याचीही शक्यता असते.

वेट ट्रेनिंग करताय पण जरा जपून, नाहीतर गंभीर दुखापत अटळ! लक्षात ठेवा ५ गोष्टी...

या गोष्टी लक्षात ठेवा... 

१. योगा मॅट धुण्यासाठी वेळ नसल्यास आठवड्यातून किमान दोन वेळा कोमट पाणी व कापडाने योगा मॅट स्वच्छ पुसून घ्यावी. 
२. योगा मॅटवर योगा, व्यायाम केल्याने अंगाला आलेला घाम त्यांवर पडतो. त्यामुळे त्यावर जंतू आणि बॅक्टेरिया जमा होतात. म्हणूनच आपण महिन्यातून किमान दोन वेळा त्याची खोलवर सफाई केलीच पाहिजे.
३. योगा मॅट अशा ठिकाणी ठेवावी ज्यामुळे त्यावर धूळ आणि मातीचा थर बसणार नाही.  
४. योगा मॅट्स धुण्यासाठी कठोर रासायनिक प्रॉडक्ट्सचा वापर न करता सौम्य प्रॉडक्ट्सचा वापर करावा.

Web Title: Don’t let your yoga mat be a hotspot of germs. Clean it the right way in 5 simple steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.