Lokmat Sakhi >Fitness > क्रॉसफिट वर्कआऊट मध्येच सोडायचा विचार करत असाल तर सावधान ! का ते नक्की वाचा...

क्रॉसफिट वर्कआऊट मध्येच सोडायचा विचार करत असाल तर सावधान ! का ते नक्की वाचा...

‘क्रॉसफिट’ हा मागील काही वर्षांपुर्वी अमेरिकेत सुरू झालेला व्यायाम प्रकार जगभरात लाखो लोक करत आहेत. पण बदलत्या ट्रेण्डनुसार आता मात्र अनेक फिटनेसप्रेमी क्रॉसफिट वर्कआऊट सोडण्याच्या विचारात आहेत.  काही जणांनी तर क्रॉसफिट वर्कआऊट अचानकपणे थांबवूनही टाकले आहे. तुम्ही असे काही करण्याचा विचार करत असाल, तर थांबा. कारण कोणताही व्यायाम प्रकार असा मध्येच सोडून दिला तर त्याचा तुमच्या शरिरावर निश्चितच विपरित परिणाम होऊ शकतो. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 08:06 PM2021-06-13T20:06:50+5:302021-06-13T20:10:35+5:30

‘क्रॉसफिट’ हा मागील काही वर्षांपुर्वी अमेरिकेत सुरू झालेला व्यायाम प्रकार जगभरात लाखो लोक करत आहेत. पण बदलत्या ट्रेण्डनुसार आता मात्र अनेक फिटनेसप्रेमी क्रॉसफिट वर्कआऊट सोडण्याच्या विचारात आहेत.  काही जणांनी तर क्रॉसफिट वर्कआऊट अचानकपणे थांबवूनही टाकले आहे. तुम्ही असे काही करण्याचा विचार करत असाल, तर थांबा. कारण कोणताही व्यायाम प्रकार असा मध्येच सोडून दिला तर त्याचा तुमच्या शरिरावर निश्चितच विपरित परिणाम होऊ शकतो. 

Don't quit crossfit exercise before taking guidance from the fitness trainer | क्रॉसफिट वर्कआऊट मध्येच सोडायचा विचार करत असाल तर सावधान ! का ते नक्की वाचा...

क्रॉसफिट वर्कआऊट मध्येच सोडायचा विचार करत असाल तर सावधान ! का ते नक्की वाचा...

Highlightsकोणताही व्यायामप्रकार एकदम सोडून देणे किंवा अतिप्रमाणात करणे दोन्हीही आरोग्यासाठी चांगले नाही. हळूहळू वर्कआऊटचे प्रमाण वाढत जाऊन ते एका विशिष्ठ पातळीपर्यंत पाेहोचले, की तुमचा बॉडी टोन त्यादृष्टीने तयार होऊ शकतो.

मेहनतीसाठी लागणारा स्टॅमिना वाढवणे आणि कोणतेही शारिरीक आव्हान पेलण्यासाठी शरीर मजबूत करणे, यासाठी अधिक तीव्र असा हा व्यायाम प्रकार आहे. एरोबिक्स, वेट लिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिक या तीन व्यायाम प्रकारांना एकत्रित करून क्रॉसफिट वर्कऑऊट तयार होते. हेवी वर्कआऊट असणारा हा व्यायाम एक तासापेक्षाही कमी वेळेसाठी केला जातो. पण अधिकाधिक कॅलरीज यामध्ये बर्न होतात. शिवाय यामध्ये अतिशय जास्त शारिरीक कष्ट असल्याने बऱ्याचदा यातून इतरांना इजाही झालेली आहे. त्यामुळे अनेक जण क्रॉसफिट वर्कआऊट करणे सोडून देत आहेत. 

याविषयी सांगताना औरंगाबाद येथील फिटनेस ट्रेनर रूपा बाबला म्हणाल्या की, कोणतेही मेकॅनिकल साहित्य न वापरता आपल्या बॉडीच्या मदतीने आपण जे वर्कआऊट करू शकतो, त्याला क्रॉसफिट म्हणतात. पुशअप्स करणे, उठाबशा करणे यातून आपण आपले शरीरच उचलत असतो. या व्यायाम प्रकारातून तुमचा स्टॅमिना बिल्टअप होत जातो आणि तो खूप वेळ टिकणारा असतो.
फिटनेस ट्रेनर रूपा बाबला यांच्या मते 'युज ऑर लूज' हे आपल्या मसल्सचे तत्व असते. तुम्ही जर रेग्युलर एक्सरसाईज केली, तर निश्चितच तुमचे शरीर त्यादृष्टीने तयार होत जाते. कोणताही व्यायाम प्रकार जेव्हा आपण करतो, तेव्हा आपले शरीर आणि आपले मन यांना त्यादृष्टीने तयार करण्यासाठी ५० ते ५५ दिवस द्यावे लागतात. एवढ्या दिवसांचा नियमित व्यायामच तुमच्या शरिराला तशी सवय लावू शकतो. त्यामुळे क्रॉसफिटच नाही, तर कोणताही व्यायामाचा प्रकार थांबवायचा असेल, तर तो हळूहळू थांबवा, असा सल्लाही रूपा यांनी दिला आहे. 
 
Web Title: Don't quit crossfit exercise before taking guidance from the fitness trainer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.