Join us

गळ्यावरची चरबी वाढल्याने चेहरा बेढब दिसतो? रोज करा ही ५ कामं, डबल चिनपासून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2025 13:01 IST

Reduce Double Chin Naturally: Thinning Face Beauty Hacks: How to Lose Face Fat Fast: Tips to Reduce Cheek Fat: Double Chin Exercises: Face Fat Reduction Tips: Beauty Hacks for Slimming Face: Face Fat Loss Routine: चेहऱ्यावरील चरबी कमी होऊन आपण टोन्ड आणि आकर्षक चेहरा मिळवू शकतो.

वाढत्या डबल चिनच्या त्रासामुळे आपल्यापैकी अनेकजण त्रस्त आहेत. चेहऱ्यावर जास्त चरबी दिसू लागली की, त्याचा आकार देखील बदलतो. (Reduce Double Chin Naturally) त्यामुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य देखील खराब होते. अनेकदा यामुळे आपल्यातील आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो.(Thinning Face Beauty Hacks) जर आपल्याही चेहऱ्यावर डबल चिन किंवा अतिरिक्त चरबी साठली असेल तर रोज या ५ गोष्टी करायला हव्या.(How to Lose Face Fat Fast)चेहऱ्यावर असणारी अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आपण रोजच्या दिवसभरात काही सोप्या गोष्टी करायला हव्या.(Tips to Reduce Cheek Fat) ज्यामुळे चेहऱ्यावरील चरबी कमी होऊन आपण टोन्ड आणि आकर्षक चेहरा मिळवू शकतो. (Double Chin Exercises)

रोज थंड पाण्याने आंघोळ केली तर...? शरीराला मिळतात ६ जबरदस्त फायदे

चेहऱ्यावरील चरबी कशी कमी करावी?

1. चेहऱ्याचा व्यायाम चेहऱ्याच्या स्नायूंना टोन करण्यासाठी चेहऱ्याचा व्यायाम खूप फायदेशीर आहे. हे चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यास आणि त्वचा घट्ट करण्यास मदत करते. चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी हे व्यायाम करा. 

  • गालाचा व्यायाम : आपले गाल हवेने भरा आणि काही सेकंद धरुन ठेवा. नंतर हळूहळू हवा सोडा. 
  • जबड्याचा व्यायाम : आपले तोंड उघडा आणि जबडा खाली खेचा. नंतर तो वर हलवण्याचा प्रयत्न करा. 
  • ओठांचा व्यायाम : आपले दोन्ही गाल आत खेचून ओठांचा चंबू तयार करा. ओठांना वर खाली हलवा. 

 

2. चेहऱ्याचा मसाज 

चेहऱ्याचा मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते. तसेच चेहऱ्यावरील चरबी कमी होण्यास मदत होते. यासाठी आपण नारळाचे तेल, ऑलिव्ह तेल किंवा चेहऱ्यावर वापरता येणारे कोणतेही तेल वापरु शकतो. मालिश करताना हलक्या हाताने गोलाकार हालचालीत चेहरा घासा. यामुळे त्वचा घट्ट होते तसेच चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी होते. 

सतत चिडचिड-थकवा,चक्कर येते? प्रचंड केसगळती? पाण्यात मिसळा २ पदार्थ, अशक्तपणा कमी, येईल ताकद

3. मीठ कमी खा 

जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी साचते, ज्यामुळे चेहरा सुजलेला किंवा जाड वाटतो. चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी मर्यादित प्रमाणात मीठ खा. जास्त मीठ खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. प्रक्रिया केलेले पदार्थ, चिप्स आणि पॅकेज्ड स्नॅक्समध्ये जास्त प्रमाणात मीठ असते. अशावेळी आपण फळे, भाज्या खायला हवे. 

4. भरपूर पाणी प्या. 

पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते. यासाठी आपण रोज ८ ते १० ग्लास पाणी प्यायल्याने चेहऱ्यावरील चरबी कमी होण्यास मदत होईल. तसेच त्वचा देखील चमकदार होते. पाण्यासोबत लिंबू पाणी, नारळ पाणी आणि हर्बल टी देखील फायदेशीर आहे. 

5. पुरेशी झोप घ्या

झोपेच्या कमतरतेमुळे शरीरावर जास्त ताण येतो. ज्यामुळे आपले वजन वाढून चेहऱ्यावर अतिरिक्त चरबी येऊ शकते. दररोज आपण ७ ते ८ तासांची गाढ झोप घेणे महत्त्वाची आहे. चांगली झोप घेतल्याने शरीरातील चयापचय सुधारतो. चेहऱ्यावरील चरबी कमी होण्यास मदत होते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सत्वचेची काळजी