Join us  

सकाळी व्यायाम-डाएट करायला वेळ मिळत नाही? झोपण्यापूर्वी पाण्यात मिसळून प्या स्वयंपाकघरातील १ गोष्ट, झरझर घटेल वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2023 12:49 PM

Drink This Before Bedtime and Loss Weight Overnight : रात्री झोपण्यापूर्वी ही गोष्ट पाण्यात मिसळून प्या, काही दिवसात दिसेल आश्चर्यकारक फरक

सकाळी उठल्यानंतर बरेच जण वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात. किंवा मॉर्निंग वेट लॉस ड्रिंक पितात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पण असे फार कमी लोकं आहेत, जे रात्रीच्या वेळेस व्यायाम किंवा वेट लॉस ड्रिंक पितात. पण रात्री देखील वेट लॉस ड्रिंक पिऊन वजन कमी होऊ शकते.

अनेकांना धावपळीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. ज्यांना सकाळच्या वेळेस व्यायाम किंवा वेट लॉस ड्रिंक प्यायला वेळ मिळत नसेल तर, त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी वेट लॉस ड्रिंक प्यावे. यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी नक्कीच घटेल. कोणतं आहे ते ड्रिंक? झोपण्यापूर्वी पाण्यात नक्की काय मिसळून प्यावे? पाहा(Drink This Before Bedtime and Loss Weight Overnight).

वजन कमी आणि पचन सुधारण्यासाठी चिमुटभर हळदीचे २ सोपे उपाय, हळदीचा वापर आरोग्यासाठी वरदान

झोपण्यापूर्वी कोणते ड्रिंक प्यावे?

द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात दालचिनी पावडर मिक्स करून प्या. कोमट पाण्यात दालचिनी पावडर मिक्स करून प्यायल्याने चयापचय बुस्ट होते. ज्यामुळे पचनक्रियेत कोणतीही अडचण येत नाही. दालचिनीमध्ये पॉलीफेनॉल असते, जे पोटाशी संबंधित समस्यांसाठी फायदेशीर ठरते. याशिवाय त्यात दाहक-विरोधी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जे वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटते.

दिवाळीपूर्वी वजन कमी करायचंय? आजपासून तातडीने खा ५ पदार्थ, वजन घटेल आणि चेहऱ्यावरही येईल चमचमता ग्लो

रात्री दालचिनीचं पाणी कसे आणि कधी प्यावे?

दालचिनीचे पाणी तयार करण्यासाठी एका भांड्यात दीड कप पाणी घ्या. त्यात १ तुकडा दालचिनी किंवा दालचिनी पावडर घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा, पाणी चहाच्या गाळणीतून एका ग्लासमध्ये गाळून घ्या. दालचिनीचे पाणी कोमट झाल्यानंतर त्यात थोडे मध मिसळून प्या. यामुळे चयापचय क्रिया वाढते. शिवाय अपचन, पोटदुखी, पोट फुगणे, निद्रानाशाची समस्या दूर होते. यासह शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स