Lokmat Sakhi >Fitness > शरीर सुकडं पण पोटाचा आकार वाढलाय? घरीच ५ व्यायाम करा, ३० दिवसात वजन होईल कमी

शरीर सुकडं पण पोटाचा आकार वाढलाय? घरीच ५ व्यायाम करा, ३० दिवसात वजन होईल कमी

Easy Exercise for Reduce Belly Fat : रोज हे व्यायाम करून तुम्ही जवळपास ३० दिवसात वजनात फरक झालेला पाहू शकता. यामुळे पोटाची चरबीसुदधा कमी होईल. ( Top Exercises for Belly Fat Exercise to Reduce Fat for Women)

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 09:59 AM2023-08-08T09:59:06+5:302023-08-08T17:38:11+5:30

Easy Exercise for Reduce Belly Fat : रोज हे व्यायाम करून तुम्ही जवळपास ३० दिवसात वजनात फरक झालेला पाहू शकता. यामुळे पोटाची चरबीसुदधा कमी होईल. ( Top Exercises for Belly Fat Exercise to Reduce Fat for Women)

Easy Exercise for Reduce Belly Fat : Top Exercises for Belly Fat Exercise to Reduce Fat for Women | शरीर सुकडं पण पोटाचा आकार वाढलाय? घरीच ५ व्यायाम करा, ३० दिवसात वजन होईल कमी

शरीर सुकडं पण पोटाचा आकार वाढलाय? घरीच ५ व्यायाम करा, ३० दिवसात वजन होईल कमी

लठ्ठपणा सध्याची गंभीर समस्या बनली आहे. कारण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वजन वाढण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. वजन कमी करण्यासाठी काहीजण तासनतास घाम गाळतात तर काहीजण महागडा डाएट प्लॅन घेतात तरीही वजन कमी होत नाही. (Weight Loss Tips) तुम्हीसुद्धा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर जीमला न जाता घरच्याघरी सोपे व्यायाम करून वजन घटवू शकता. (Easy Exercise for Reduce Belly Fat)

ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार दोन वर्षांपर्यंत आठवड्यातून ३ वेळा योगा, बॅलेंस ट्रेनिंग आणि वेट ट्रेनिंग केल्यानं वजन कमी करण्याबरोबरच मासंपेशी मजबूत बनतात. शरीरातील ऑक्सिजनची लेव्हलही वाढते.  रोज हे व्यायाम करून तुम्ही जवळपास ३० दिवसात वजनात फरक झालेला पाहू शकता. यामुळे पोटाची चरबीसुदधा कमी होईल. ( Top Exercises for Belly Fat Exercise to Reduce Fat for Women)

रेक्टस एब्डोमिनिस

हा व्यायाम तुमचे पेल्विक पार्ट्स, प्युबिक बोन्सवर काम करतो.  २ प्रकारे हा व्यायाम केला जाऊ शकतो. पहिलं म्हणजे छातीला पेल्विक पार्ट्सजवळ आणण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम करताना जवळपास १५ वेळा क्रंचेचस करा.

डबल लेग रिच

डबल लेग रीच पेट हा व्यायाम केल्यानं पोटाच्या वरचा आणि खालचा भाग कमी होतो. हा व्यायाम करण्याासाठी सरळ झोपा त्यानंतर पाय वर करा. पाय ९० अंशात आणा. मग पुन्हा खाली न्या ४५ अंशात पाय खाली नेऊन वर आणा. जवळपास २० वेळा हा व्यायाम करा. 

प्लँक्स

प्लँक्स करताना पोटासह आर्म्स, ग्लुट्स, शोल्डर आणि पायांवर दबाव येतो. पोटावर झोपून दोन्ही हात कोपरापर्यंत खाली ठेवून हातांवर जोर देऊन शरीर वर उचला जवळपास १ मिनिट या स्थितीत राहा.  ३ वेळा हा व्यायाम रोज करा.

रोल अप

रोल अप हा व्यायाम हाडं लवचीक बनवण्यासह पोटाची चरबी कमी करण्यासठी उत्तम आहे.

प्लँक हिप डिप्स

पोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी आणि अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी प्लँक हा एक उत्तम व्यायाम आहे. हे करण्यासाठी  सगळ्यात आधी हाताचे कोपरे जमिनीवर ठेवून पुशअप पोझिशनने सुरूवात करा. आपले हात ९० अंश कोनावर ठेवा. त्यानंतर पाठीला बाहेरच्या बाजूनं न्या. नंतर पुन्हा आधीच्या स्थितीत या.

Web Title: Easy Exercise for Reduce Belly Fat : Top Exercises for Belly Fat Exercise to Reduce Fat for Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.