Lokmat Sakhi >Fitness > शरीर बारीक पण मांड्या जाडजूड दिसतात? न चुकता करा १ सोपा व्यायाम, दिसाल एकदम स्लीम- फिट

शरीर बारीक पण मांड्या जाडजूड दिसतात? न चुकता करा १ सोपा व्यायाम, दिसाल एकदम स्लीम- फिट

Easy Exercise to reduce thigh fats : बैठी जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव हेच यामागील मुख्य कारण असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 01:53 PM2023-12-27T13:53:36+5:302023-12-27T13:55:21+5:30

Easy Exercise to reduce thigh fats : बैठी जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव हेच यामागील मुख्य कारण असते

Easy Exercise to reduce thigh fats : Slim body but thick thighs? Do 1 simple exercise without fail, you will look slim-fit | शरीर बारीक पण मांड्या जाडजूड दिसतात? न चुकता करा १ सोपा व्यायाम, दिसाल एकदम स्लीम- फिट

शरीर बारीक पण मांड्या जाडजूड दिसतात? न चुकता करा १ सोपा व्यायाम, दिसाल एकदम स्लीम- फिट

लठ्ठपणा ही सध्या सर्वच वयोगटात वाढत असलेली समस्या आहे. लठ्ठपणा हा सगळ्या शरीरावर असेल तर ठिक पण काहीवेळा फक्त मांड्या आणि कंबरेचा भाग प्रमाणापेक्षा जास्त जाडजूड दिसतो. यामुळे नकळतच शरीर बेढब दिसायला लागते. मग आपल्याला फॅशनेबल कपडे तर वापरता येत नाहीतच पण आरोग्याच्याही समस्या उद्भवण्याची शक्यता असते.अशाप्रकारे मांड्या आणि कंबरेचा भाग वाढण्यामागे विविध कारणे असली तरी बैठी जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव हेच यामागील मुख्य कारण असते (Easy Exercise to reduce thigh fats).

शरीरावर एकदा फॅटस जमा झाले की ते कमी करणे हा मोठा टास्क असतो. एस्ट्रोजेन या हार्मोनमुळे पोटापासून ते मांड्यांपर्यंतची चरबी वाढते.ही वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आहारासोबतच नियमित व्यायाम करणे हा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय असतो. अगदी १० मिनीटांत होणारा असा १ सोपा व्यायामप्रकार पाहूया. जो केल्याने मांड्यांवर वाढलेली चरबी कमी होण्यास निश्चितच मदत होईल.  फिटनेसतज्ज्ञ नेहा हा व्यायाम सांगत असून त्यासोबत पोटावरची चरबी कमी करण्यासाठीचा व्यायामही सांगतात. 

(Image : Google)
(Image : Google)

कसा करायचा व्यायामप्रकार? 

दोन्ही पायात अंतर घेऊन उभे राहायचे. पाय गुडघ्यातून वाकवायचा कंबरेपर्यंत वर आणायचा. हाताचा तळवा कंबरेपाशी उघडा ठेवून पायाच्या तळव्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. हा व्यायामप्रकार दररोज न चुकता १०० वेळा केल्यास त्याचा मांड्यांची वाढलेली चरबी कमी होण्यासाठी निश्चितच चांगला फायदा होतो. एकदम १०० न करता ५० चे ३ किंवा २५ चे ४ सेट केले तरी चालतात.पण यामुळे मांड्यांच्या स्नायूंना चांगला व्यायाम होण्यास मदत होते. यासोबतच पोटावर वाढलेली चरबी कमी करायची असेल तर पाय ९० अंशात वर उचलायचा आणि दोन्ही हाताने पायाखाली टाळी वाजवायचा प्रयत्न करायचा. यामुळे पोटाच्या स्नायूंना ताण पडतो आणि तेथील चरबी घटण्यास मदत होते. 

 

Web Title: Easy Exercise to reduce thigh fats : Slim body but thick thighs? Do 1 simple exercise without fail, you will look slim-fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.