Lokmat Sakhi >Fitness > दिवसभर बसून पाठ अवघडून जाते? ब्रेकमध्ये १० मिनीटांत होतील असे ४ सोपे व्यायाम, पाठ होईल मोकळी

दिवसभर बसून पाठ अवघडून जाते? ब्रेकमध्ये १० मिनीटांत होतील असे ४ सोपे व्यायाम, पाठ होईल मोकळी

Easy Exercises for Back Pain : झटपट होणारे काही व्यायामप्रकार केल्यास ही पाठदुखी कमी होण्यास निश्चितच मदत होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2022 11:26 AM2022-12-21T11:26:57+5:302022-12-21T11:46:15+5:30

Easy Exercises for Back Pain : झटपट होणारे काही व्यायामप्रकार केल्यास ही पाठदुखी कमी होण्यास निश्चितच मदत होईल.

Easy Exercises for Back Pain : Back pain after sitting all day? 4 easy exercises that will be done in 10 minutes during the break, the back will be free | दिवसभर बसून पाठ अवघडून जाते? ब्रेकमध्ये १० मिनीटांत होतील असे ४ सोपे व्यायाम, पाठ होईल मोकळी

दिवसभर बसून पाठ अवघडून जाते? ब्रेकमध्ये १० मिनीटांत होतील असे ४ सोपे व्यायाम, पाठ होईल मोकळी

Highlightsबैठे काम असेल तर बसताना कोणती काळजी घ्यावी याविषयी...१० मिनीटांत होणारे ४ व्यायाम केल्यास मान, पाठ यांचे दुखणे थांबू शकते.

आपल्यापैकी बहुतांश जण दिवसभर लॅपटॉपसमोर बसून काम करतात. दिवसातील ८ ते १० तास बैठे काम करताना आपल्याला कदाचित जाणीव होत नाही. पण रात्री पाठ टेकली की सततच्या बैठ्या कामाने पाठ किती दुखते हे लक्षात येते. मात्र काही ठराविक गोष्टींकडे वेळीच लक्ष दिल्यास पाठदुखी, खांदेदुखी यांसारखे त्रास कमी होण्यास मदत होते. यासाठी आपले काम बैठे असेल तर बसताना कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत माहिती असायला हवे. तसेच थोडा वेळ काढून झटपट होणारे काही व्यायामप्रकार केल्यास ही पाठदुखी कमी होण्यास निश्चितच मदत होईल. पाहूयात सलग बैठे काम करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे (Easy Exercises for Back Pain). 

बसताना काय काळजी घ्याल? 

१. पाठ आणि पोटाच्या भागातील कपडे थोडे ढगळे हवेत. कारण या भागातील कपडे जास्त घट्ट असतील तर अवयवांना सफोकेट झाल्यासारखे होते. 

२. मान सतत खालच्या बाजूला राहत नाही ना ते पाहावे. 

३. लॅपटॉपवर काम करताना हाताची कोपरं टेबलवर राहतील याची काळजी घ्यायला हवी. यासाठी आपल्या उंचीला साजेसे असे टेबल आणि खुर्ची निवडावी.

४. आपण दिवसभर बसताना पाठीचा सपोर्ट योग्य पद्धतीचा हवा. 

५. वर्क फ्रॉम होम असेल तर बेडवर लोळून काम करु नये.

६. खूप मागच्या बाजूला रेलूनही बराच काळ बसू नये. 

कोणती आसनं करावीत...

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाठीचा ताण निघून जाण्यासाठी अगदी १० मिनीटांत होतील अशी काही आसनं आपण आवर्जून करायला हवीत. त्यामुळे बसून बसून आखडलेली पाठ मोकळी होण्यास मदत होते. 

१. अर्ध पवनमुक्तासन

दोन्ही पाय गुडघ्यात फोन्ड करुन पोटावर घ्यावेत आणि दोन्ही बाजूंना रोल करावे. यामुळे पाठीचे स्नायू मोकळे होण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. सेतूबंधासन

पाठीवर झोपून टाचा पार्श्वभागाला चिकटून घ्याव्यात. मांड्या, कंबर आणि पाठीचा भाग वर उचलून घ्यावा. यामुळे संपूर्ण शरीराला एकप्रकारचा ताण बसतो आणि स्नायू रिलॅक्स होण्यास मदत होते.

३. सुप्त वज्रासन

पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करावेत आणि कंबरेतून वाकवून जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे कंबरेचा आणि पाठीचा आखडलेला भाग मोकळा होण्यास मदत होते. 

४. मार्जारासन

मांजरीप्रमाणे पाठ वर-खाली केल्याने पाठीला एकप्रकारचा ताण येतो आणि पाठीचे दुखणे काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते. 

Web Title: Easy Exercises for Back Pain : Back pain after sitting all day? 4 easy exercises that will be done in 10 minutes during the break, the back will be free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.