Puffy face : अनेक महिलांना चेहऱ्यावर सूज येण्याची समस्या होत असते. याची कारणंही वेगवेगळी असतात. ज्यात इंफ्लेमेशन, वॉटर रिटेंशन, वाढलेलं वजन यांचा समावेश असतो. सूज वाढली तर चेहऱ्याचं सौंदर्य तर कमी होतंच सोबतच चिंताही वाढते. अनेकांना वाटत असतं की, ते जाड झालेत किंवा त्यांचं वजन वाढलं. पण कारण वेगळंच असतं. जर तुम्ही चेहऱ्यावर येणाऱ्या सूजेमुळे हैराण असाल तर यावर काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काही सामान्य उपायांनी चेहऱ्यावरील सूज दूर करू शकता.
अल्कोहोल कमी आणि पाणी जास्त प्या
तुमच्या चेहऱ्यात होणारे जास्तीत जास्त बदल हे वॉटर रिटेंशन या कारणानं होतात. अल्कोहोल वॉटर रिटेंशनची(शरीरातील अवयवांमध्ये पाणी जमा होणं) समस्या अधिक वाढवतं. कारण यानं तुम्ही डिहायड्रेट होता. त्यामुळे अल्कोहोल कमी प्या आणि पाणी जास्त प्या.
झोपही ठरते महत्वाची
कमी झोप घेतल्यानं केवळ तुमचं इम्यून सिस्टीम प्रभावित होतं असं नाही तर चेहऱ्यावर सूजही येते आणि चेहरा फुगलेला दिसतो. कमी झोपेमुळं अनेकप्रकारचे हार्मोन प्रभावित होतात, ज्यामुळे हार्मोन योग्यप्रकारे काम करू शकत नाहीत. याने शरीरात इंफ्लेमेशन होतं. या कारणाने चेहरा फुगलेला आणि सूजलेला वाटतो.
सोडियम आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ कमी खा
जर तुम्ही जास्त मीठ असलेले पदार्थ किंवा अधिक कार्बोहायड्रेट पदार्थ अधिक खात असाल तर शरीरात तरल पदार्थ जमा होतात. ज्यामुळे इंफ्लेमेशन वाढतं आणि चेहरा सूजतो. अशात सोडियम आणि कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाणं बंद करा किंवा कमी खा.
अॅक्टिव रहा
एक्सपर्ट सांगतात की, जास्तीत जास्त शारीरिक हालचाल केल्यानं तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते आणि याचा प्रभाव तुमच्या चेहऱ्यावरही बघायला मिळतो. त्यामुळे एक्सरसाईज आणि इतर फिजिकल अॅक्टिविटी करत रहा.
अॅंटी-इंफ्लेमेटरी खाद्य पदार्थ
आहारात अॅंटी-इंफ्लेमेटरी खाद्य पदार्थ जसे की, आलं, नारळ, हळद इत्यादींचा समावेश करा. या पदार्थांमुळे शरीरातील सूज कमी होते.