घरकाम, मुलांची जबाबदारी, पैशाची चिंता, ऑफिसच्या कामाच्या डेडलाईन्स, किराणा माल इ... बायकांच्या मागे न संपणाऱ्या चिंता असतात. यामुळे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आयुष्यातील हा ताण थकवणारा आहे. त्यामुळे तुम्ही अकाली वयस्कर दिसू शकता. याव्यतिरिक्त, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांना रजोनिवृत्ती, संधिवात, थायरॉईड, वजन वाढणे आणि थकवा यासारख्या विविध शारीरिक आजारांना सामोरे जावे लागते.
४० वर्षांवरील महिलांसाठी आरोग्य हेच प्राधान्य असायला हवे. खरं पाहता महिला स्वत:ची काळजी न घेता इतर गोष्टींचा ताण घेत बसतात. पण जर तुम्ही जर योगा केला आणि वयाच्या 20 आणि 30 च्या दशकात शारीरिकरित्या सक्रिय असाल, तर तुम्हाला नक्कीच वय वाढण्याची चिंता नसेल. मग ते 40 किंवा 60 असो. जर काही कारणास्तव आपण तरूण वयात स्वत: साठी थोडा वेळ काढू शकत नसाल तर 45 पासून सुरुवात करणे देखील एक चांगली कल्पना आहे.
२६ वर्षांनी रॅम्प वॉकमध्ये झळकला मिलिंद सोमण; त्याला पाहताच भर इवेंटमध्ये मलायका म्हणाली.....
तुम्ही कोणत्याही वयात योग सुरू करू शकता. संशोधन दर्शविते की45 व्या वाढदिवसानंतर प्रत्येक वर्षी चयापचन ५ टक्क्यांनी संथ गतीने होते. बहुतेक स्त्रिया त्यांचं आरोग्य, आहार आणि औषधांबाबत निष्काळजी होतात. गर्भधारणेदरम्यान स्त्रियांना सहसा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. यापेक्षा योगा रोज करून तुम्ही आपण स्वतःला निरोगी ठेवू शकता.
फिट, स्लिम राहण्यासाठी २० ते ३० वर्षाीय महिलांसाठी 'हे' ८ व्यायाम प्रकार; नेहमी दिसाल मेंटेन
वयाच्या 45 नंतर चांगल्या अन्नाची निवड आणि व्यायामाचा तुमच्या आरोग्यावर आणि जीवनमानावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा 2 योगसाधनांबद्दल सांगत आहोत, जे महिला स्वत: ला दीर्घकाळ तंदुरुस्त आणि तरुण ठेवण्यासाठी करू शकतात. शिल्पा शेट्टीनं इन्स्टाग्राम अकाऊंटवर योगासनांचा फोटो शेअर करत माहिती दिली आहे.
काय आहे शिल्पाची पोस्ट?
ही योगासनं शेअर करताना शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'लॉकडाऊन आणि इतर निर्बंध खूप तणाव निर्माण करू शकतात. पण, आपण एकजूट होऊन उभे राहून जे करायचे आहे ते केले पाहिजे. प्रथम, आपण हे निश्चित केले पाहिजे की आपले स्वतःचे शरीर शारीरिक हालचालींच्या अभावाला बळी पडणार नाही. आपली रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवताना आपले स्नायू आणि सांधे लवचिक आणि घट्ट ठेवणेही महत्वाचे आहे.'
तिनं पुढे लिहिलं की, 'म्हणून, आज सकाळी, मी स्वतःसाठी दिनक्रम थोडा कठीण करण्याचा निर्णय घेतला. नौकासनाकडे जाणारी पादहस्तासन मी निवडले. हा प्रवाह कोर स्ट्रेंथ तयार करण्यास मदत करतो, हॅमस्ट्रिंग्स ताणतो, ओटीपोटाचे स्नायू टोन करतो आणि हात, खांदे आणि जांघांच्या स्नायूंना बळकट करतो. हा योगा प्रकार करण्यााचा प्रयत्न करा, परंतु आपल्या क्षमतेनुसारच शरीर स्ट्रेच करा जबरदस्ती जास्त स्ट्रेच करू नका. सुरक्षित रहा, सोशल डिस्टेंसिग पाळा, कृपया बाहेर जाताना मास्क लावा.'