Lokmat Sakhi >Fitness > हिवाळ्यात वजन काही केल्या कमी होत नाही? रोज खा चविष्ट-हेल्दी ७ पदार्थ, वजन होईल कमी-आरोग्य सुधारेल

हिवाळ्यात वजन काही केल्या कमी होत नाही? रोज खा चविष्ट-हेल्दी ७ पदार्थ, वजन होईल कमी-आरोग्य सुधारेल

Eat these 7 winter foods for weight loss : थंडीत व्यायाम करायला कंटाळा येत असेल तर, नियमित ७ पदार्थ खाऊन वजन कमी करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2023 02:09 PM2023-11-23T14:09:20+5:302023-11-23T14:10:15+5:30

Eat these 7 winter foods for weight loss : थंडीत व्यायाम करायला कंटाळा येत असेल तर, नियमित ७ पदार्थ खाऊन वजन कमी करा..

Eat these 7 winter foods for weight loss | हिवाळ्यात वजन काही केल्या कमी होत नाही? रोज खा चविष्ट-हेल्दी ७ पदार्थ, वजन होईल कमी-आरोग्य सुधारेल

हिवाळ्यात वजन काही केल्या कमी होत नाही? रोज खा चविष्ट-हेल्दी ७ पदार्थ, वजन होईल कमी-आरोग्य सुधारेल

हिवाळा (Winter Season) म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती गुलाबी थंडी. सायंकाळ झाली की हवेत गारवा जाणवतो. शिवाय सकाळच्या थंडीमुळे आपल्याला लवकर अंथरूनही सोडवत नाही. यामुळे सकाळच्या वेळेस लोकं व्यायाम (Exercise) करण्यास टाळतात, किंवा कंटाळा करतात.

शिवाय थंडीत २ घास पोटात एक्स्ट्रा जातात. या दिवसात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा फार होते. शारीरिक व्यायामाचा अभाव शिवाय तळकट पदार्थांमुळे वजन तर वाढतेच, शिवाय इतरही गंभीर आजार छळतात. जर आपल्याला अधिक मेहनत न घेता वजन नियंत्रणात (Weight Loss) ठेवायचं असेल तर, ७ पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे वजन तर नियंत्रित राहीलच शिवाय आरोग्यही सुदृद राहील(Eat these 7 winter foods for weight loss ).

हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी न चुकता खा ७ पदार्थ

गाजर

द हेल्थसाईट.कॉम या वेबसाईटनुसार, गाजर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मुख्य म्हणजे यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. त्यातील व्हिटॅमिन - अ दृष्टी तीक्ष्ण करण्यास मदत करते. शिवाय त्यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे लवकर भूक लागत नाही, व वजन कमी करण्यास मदत होते.

डॉक्टर नेने सांगतात उत्तम आरोग्यासाठी फॉलो करा ५ गोल्डन रुल्स, मधुमेह-लठ्ठपणाचा होणार नाही त्रास

बीटरूट

बीटरूट हे प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, मॅग्नेशिअम, लोह, तांबे, फायबर आणि व्हिटॅमिन सी यांचे उत्कृष्ट स्त्रोत आहे. तसेच शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहण्यास मदत होते. आहारात बीटरूटचा समावेश केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

मेथीदाणे

सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, विटामिन डी आणि विटामिन सी यांसारख्या पोषक तत्वांनी मेथीदाणे परिपूर्ण आहे. याचा मुख्य फायदा केस, त्वचा आणि आरोग्याला होतो. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, एक चमचा मेथी दाणे एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. यातील गुणधर्मामुळे वजन कमी करण्यास मदत होईल.

पेरू

चविष्ट फळ पेरू प्रत्येकाला आवडते. पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. पेरूच्या दाण्यांमुळे शरीरातील कार्बोहायड्रेट कमी होते. यामुळे वजन कमी करणे सोपे होते. शिवाय गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

सकाळी चुकूनही खाऊ नका ६ पदार्थ, शरीराच्या अनेक अवयवांना होईल त्रास, वजन-कोलेस्टेरॉलही वाढेल झपाट्याने

ड्रायफ्रुट्स

आपल्या आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश करण्यास तज्ज्ञ सांगतात. नियमित ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. बदाम, काजू, पिस्ता, हे प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचा एक महत्त्वाचा सोर्स आहे. त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढत नाही.

तूप

हिवाळ्यात तूप आवर्जून खावे. सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यासारख्या समस्या सुटतात. तुपातील ओमेगा ३ फॅटी ऍसिडमुळे शरीरातील घातक फॅट्स बाहेर पडतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

दालचिनी पावडर

घरातील इतर पदार्थांचे स्वाद वाढवण्याचं काम दालचिनी करते. दालचिनी पावडर कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने चयापचय क्रिया बुस्ट होते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, व वजन कमी होण्यास मदत होते. आपण साखर-दुधाच्या चहाऐवजी दालचिनीचा चहा पिऊ शकता.

Web Title: Eat these 7 winter foods for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.