Lokmat Sakhi >Fitness > पोट खूप सुटलंय? खुर्चीवर बसून करा ४ व्यायाम करा, सुटलेलं पोट होईल कमी

पोट खूप सुटलंय? खुर्चीवर बसून करा ४ व्यायाम करा, सुटलेलं पोट होईल कमी

Effective chair exercise to loss belly fat : घरच्याघरी फक्त ५ ते १० मिनिटं वेळ काढून तुम्ही वाढलेलं वजन नियंत्रणात ठेवू शकता आणि अतिरिक्त फॅट्स वाढण्यापासूनही रोखू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 12:33 PM2023-08-13T12:33:47+5:302023-08-14T15:01:18+5:30

Effective chair exercise to loss belly fat : घरच्याघरी फक्त ५ ते १० मिनिटं वेळ काढून तुम्ही वाढलेलं वजन नियंत्रणात ठेवू शकता आणि अतिरिक्त फॅट्स वाढण्यापासूनही रोखू शकता.

Effective chair exercise to loss belly fat : Sitting exercises that can help you get rid of belly fat : | पोट खूप सुटलंय? खुर्चीवर बसून करा ४ व्यायाम करा, सुटलेलं पोट होईल कमी

पोट खूप सुटलंय? खुर्चीवर बसून करा ४ व्यायाम करा, सुटलेलं पोट होईल कमी

वजन वाढण्याचा प्रोब्लेम आजकाल तरूणांमध्ये जास्त दिसून येतो. तासनतास बसून काम करणं यामुळे शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स वाढत जातात. वजन कमी करण्यासाठी बाजारात बहुतेक लोक जीम, डाएटचा आधार घेतात पण अनेकांना जीमला जाण्यासाठी पुरेसा वेळही मिळत नाही अशावेळी वजन कमी करण्यासाठी काय करता येईल अशा प्रश्न अनेकांना पडतो. (Burn belly fat with these easy yet effective chair exercise)

घरच्याघरी फक्त ५ ते १० मिनिटं वेळ काढून तुम्ही वाढलेलं वजन नियंत्रणात ठेवू शकता आणि अतिरिक्त फॅट्स वाढण्यापासूनही रोखू शकता. ((Effective chair exercise  to loss belly fat) लटकणारं पोट कमी करण्यासाठी तुम्ही खुर्चीवर बसल्या बसल्या ५ व्यायाम करा. यासाठी  तुम्हाला इतर कोणत्याही उपकरणांची गरज भासणार नाही. एक्सपर्ट्सच्या मते रोज  दिवसभरातून १ तास काढून वॉक करायला हवं किंवा खुर्चीवर बसून हलका व्यायाम करा.  याचा फायदा होईल आणि वजन आपोआप कमी होण्यास मदत होईल.

चेअर स्वाट्स

खुर्चीवर बसल्या बसल्या तुम्ही बॉडी स्ट्रेच करू शकता.  या व्यायामामुळे  फक्त तुमची सुस्ती दूर होणार नाही तर शरीरातील अतिरिक्त फॅट्सही कमी होतील. फक्त हा व्यायाम करण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. 

पुशअप्स

पुशअप्सबद्दल तुम्ही ऐकून असाल. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही चेअर पुशअप्स करू शकता. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हेवी व्यायाम करण्याची काही गरज नाही.  या व्यायामामुळे तुमचं शरीर टोन्ड होण्यास मदत होईल.

ट्रायसेप्स डिप्स

(Image Credit - rncholapuerta)

हा व्यायाम करण्यासाठी खुर्चीवर बसा नंतर  अर्धच उभं राहून पुढे या या.  दोन्ही हातांनी खुर्चीच्या टोकांना घट्ट धरून ठेवा. नंतर खुर्चीला हळूहळू ट्रायसेप्ससने पूश करा मग वर खाली या.  

गरुडासन

(Image Credit- ekhartyoga)

खुर्चीवर बसल्या बसल्या तुम्ही गरुडासन  करू शकता. याला इगल चेअर असंही म्हणतात. ताडासनाच्या मुद्रेत उभं राहून गुडघे दुमडा आणि डावा पाय उचलून उजव्या पायांवर फिरवा. याचप्रमाणे हात सुद्धा क्रॉस करून घ्या. काही सेकंद या स्थितीत राहून पुन्हा सामान्य स्थितीत या.

Web Title: Effective chair exercise to loss belly fat : Sitting exercises that can help you get rid of belly fat :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.