Lokmat Sakhi >Fitness > पोट सुटलंय, वजन कमीच होत नाही? दिवसभरात ६ गोष्टी करा, वजन घटेल भरभर

पोट सुटलंय, वजन कमीच होत नाही? दिवसभरात ६ गोष्टी करा, वजन घटेल भरभर

Effective tips to lose belly fat at home : खाण्यापिण्यात बदल करून तासनतान जीममध्ये घाम गाळूनही शरीरात बदल झालेला दिसत नाही. अशावेळी पोट कमी करण्यासाठी काही लहान- लहान गोष्टींकडे लक्ष दिले तर फरक दिसून येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 08:34 AM2023-08-10T08:34:00+5:302023-08-10T16:31:36+5:30

Effective tips to lose belly fat at home : खाण्यापिण्यात बदल करून तासनतान जीममध्ये घाम गाळूनही शरीरात बदल झालेला दिसत नाही. अशावेळी पोट कमी करण्यासाठी काही लहान- लहान गोष्टींकडे लक्ष दिले तर फरक दिसून येईल.

Effective tips to lose belly fat at home : Weight loss tips 6 lifestyle changes to get rid of belly fat | पोट सुटलंय, वजन कमीच होत नाही? दिवसभरात ६ गोष्टी करा, वजन घटेल भरभर

पोट सुटलंय, वजन कमीच होत नाही? दिवसभरात ६ गोष्टी करा, वजन घटेल भरभर

वाढतं वजन आणि पोटाची चरबी हा चिंतेचा विषय बनला आहे. बाहेर निघणाऱ्या पोटामुळे लोक अन्फीट दिसून येतात. पोट बाहेर आल्यामुळे मनासारखे कपडेही घालता येत नाही. (Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life) पोट कमी करण्यासाठी लोक व्यायाम, डाएट असे बरेच मार्ग अवलंबतात  पण त्याचा मनासारखा परिणाम दिसून येत नाही. खाण्यापिण्यात बदल करून तासनतान जीमध्ये घाम गाळूनही बदल झालेला दिसत नाही. अशावेळी पोट कमी करण्यासाठी काही लहान- लहान गोष्टींकडे लक्ष दिले तर फरक दिसून येईल.(Effective tips to lose belly fat at home weight loss tips)

न चुकता चाला 

अनेकदा आपल्याला वाटतं की चालायला जाण्याची मेहनत कोण करणार पण मॉर्निंग वॉकमुळे तुम्ही अनेक पटीनं वजन कमी करू शकता.  रोज वॉक केल्यानं शरीर शेपमध्ये यायला सुरूवात होते आणि शरीर इंचेसमध्ये कमी होते. तुम्ही पार्क किंवा घरात  वॉक करू शकता.

कोमट पाणी प्या

कोमट किंवा गरम पाणी प्यायल्यानं पोटावर चांगला परीणाम होतो. पाणी कोणत्यावेळी आणि किती प्यायचं याबाबत बरेच लोक कन्फ्यूज असतात. काहीही खाण्याच्या २० मिनिटांनंतर तुम्ही कोमट पाणी प्यायल्यास  त्याचा चांगला परिणाम पचनक्रियेवर दिसून येतो. 

फायबर्स

खाण्यापिण्यात फायबर्सचे प्रमाण वाढवा. फायबर्सयुक्त फळं, भाज्या आणि इतर गोष्टींमुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखं वाटतं.  यामुळे फूड इंटेक कमी होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. 

दिवसभरात एकतरी फळ खा

दिवसभरात एकतरी सिजनल फ्रुट खा. एप्पल, पेरू,पिअर अशी कोणतीही फळं तुम्ही खाऊ शकता. फळं सकाळी ११ वाजताच्या दरम्यान किंवा ४ ते ५ च्या दरम्यान खाऊ शकता.

प्रोटीन्सचा आहारात समावेश करा

प्रोटीन्स शरीरातील फॅट्सचं प्रमाण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे शरीराला भरपूर उर्जा मिळते आणि मसल्स मजबूत राहतात. याव्यतिरिक्त तुम्ही अंडी, दूध, ड्रायफ्रुट्सही खाऊ शकता.

झोप पूर्ण घ्या

कोणताही आजार बरा होण्यसाठी,  इम्यूनिटी वाढवण्यासाठी ८ तासांची झोप महत्वाची असते. त्याचप्रमाणे  अपूर्ण झोप वजन कमी न होण्याचं कारण ठरू शकते. झोप पूर्ण झाली नाही तर वजन वाढू शकतं. म्हणून वजन कमी करण्यासाठी जास्तीत झोप घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे फॅट लॉसची प्रक्रिया वेगानं होईल.

Web Title: Effective tips to lose belly fat at home : Weight loss tips 6 lifestyle changes to get rid of belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.