Lokmat Sakhi >Fitness > पोट, कंबरेचा घेर वाढतच चाललाय? रात्री फक्त ‘इतके’ वाजता जेवा, दिसाल मेटेंन

पोट, कंबरेचा घेर वाढतच चाललाय? रात्री फक्त ‘इतके’ वाजता जेवा, दिसाल मेटेंन

Effective Ways To Lose Belly Fat : 2017 च्या अभ्यासानुसार, जास्त वजन असलेले लोक झोपण्याच्या काही वेळापूर्वी जास्त कॅलरी घेतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 05:53 PM2022-06-10T17:53:19+5:302022-06-12T08:01:15+5:30

Effective Ways To Lose Belly Fat : 2017 च्या अभ्यासानुसार, जास्त वजन असलेले लोक झोपण्याच्या काही वेळापूर्वी जास्त कॅलरी घेतात.

Effective Ways To Lose Belly In Week : Belly fat expert michael mosley shares the best time to eat dinner to lose weight | पोट, कंबरेचा घेर वाढतच चाललाय? रात्री फक्त ‘इतके’ वाजता जेवा, दिसाल मेटेंन

पोट, कंबरेचा घेर वाढतच चाललाय? रात्री फक्त ‘इतके’ वाजता जेवा, दिसाल मेटेंन

आजच्या काळात वजन कमी करणं खूप गरजेचं झालं आहे. निरोगी वजन तुम्हाला केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त ठेवते. सहसा, लोक वजन कमी करण्यासाठी प्रथम उत्तम आहाराची निवडतात, परंतु त्यासोबत जेवणाची वेळ देखील तितकीच महत्त्वाची असते. (What is the best time to have dinner to lose weight) वास्तविक, अनेकांना रात्री उशिरा जेवण्याची सवय असते. पण जर तुम्ही रात्री उशिरा जेवण खाल्ले तर तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. वजन वाढण्यासाठी आणि कमी करण्यासाठी, तुम्ही किती कॅलरीज घेत आहात हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही किती वाजता कॅलरीज घेत आहात हे महत्त्वाचे आहे. (What is the best time to eat dinner)

रात्री उशिरा अन्न खाल्ल्याने चयापचय मंदावते, त्यामुळे कॅलरीज बर्न होत नाहीत आणि परिणामी वजन किंवा पोटावरील चरबी वाढते. (Effective Ways To Lose Belly In Week) याशिवाय काही लोक आपले वजन नियंत्रणात ठेवतात ते रात्रीचे जेवण वगळतात आणि नंतर एकटे दूध किंवा काहीतरी हलके खाऊन पोट भरतात. (Expert shares the BEST time to eat dinner) आहार गुरू आणि लेखक डॉ. मायकल मोस्ले यांनी रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ सांगितली आहे.  रात्रीच्या जेवणाच्या वेळेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. (What is the best time to eat dinner for weight loss)


1) रात्री ८ पर्यंत जेवण

डॉ. मोस्ले यांच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी रात्री 8 वाजेपर्यंत अन्न खावे आणि त्यादरम्यान कोणत्याही कॅलरीजचे सेवन टाळावे. डॉ.मोस्ले म्हणतात की झोपल्यानंतर कोणत्याही कॅलरीजचे सेवन टाळणे महत्त्वाचे आहे. कारण नंतर ते तुमच्या सिस्टीममध्ये बराच काळ राहते. रात्रीच्या वेळी लोकांना नूडल्स, पिझ्झा, चिप्स किंवा बिस्किटे यांसारख्या झटपट खाद्यपदार्थांची क्रेव्हिंग्स असणे सामान्य आहे. यामुळे, कॅलरीजचे सेवन रात्रभर वाढते, जे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे.

रात्री लवकर झोपच येत नाही? चांगल्या झोपेसाठी इफेक्टीव्ह ठरतील ५ टिप्स, १५ मिनिटांत ढाराढूर झोपाल

रात्री उशिरा जेवणाच्या माध्यमातून घेतलेली चरबी (Fats) आणि साखर (calories) दीर्घकाळ प्रणालीमध्ये राहते. कारण ठराविक वेळेनंतर शरीर काम करणे थांबवते आणि पचनक्रियाही मंदावते. काही अभ्यासांनी असे म्हटले आहे की हे नैसर्गिक शरीर घड्याळात देखील व्यत्यय आणू शकते. सर्कॅडियम लय 24-तासांचे चक्र दर्शवते, जे शरीराला कधी झोपायचे आणि तुमच्या रोगप्रतिकारक पेशी कधी सक्रिय असतात हे सांगते.

2) रात्री लवकर जेवल्यानं काय फायदा होतो

2017 च्या अभ्यासानुसार, जास्त वजन असलेले लोक झोपण्याच्या काही वेळापूर्वी जास्त कॅलरी घेतात. यावेळी मेलाटोनिनची पातळी जास्त राहते. मेलाटोनिन हा हार्मोन आहे, ज्यामुळे संध्याकाळी झोप येते. 250 अभ्यासांच्या दुसर्‍या विश्लेषणात, तज्ज्ञांनी लोकांनी काय खाल्ले आणि त्याचा पोट आणि भूक यांच्यावर कसा परिणाम होतो हे पाहिले. 

विश्‍लेषणातील तज्ज्ञांनी निष्कर्ष काढला की रात्रीचे जेवण दुपारी 4 वाजण्यापूर्वी खाणे हा पोटाची अतिरिक्त चरबी कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. तज्ज्ञ रात्रीच्या तुलनेत सकाळी जास्त अन्न खाण्याची शिफारस करतात. कारण यावेळी सतर्कता, पचनशक्ती आणि रक्तातील साखर सर्वकाही नियंत्रणात राहते.

Web Title: Effective Ways To Lose Belly In Week : Belly fat expert michael mosley shares the best time to eat dinner to lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.