Lokmat Sakhi >Fitness > ओटीपोट सुटलंय, व्यायामाचा कंटाळा येतो? अंथरुणात पडून रोज १ योगासन करा; स्लिम होईल पोट

ओटीपोट सुटलंय, व्यायामाचा कंटाळा येतो? अंथरुणात पडून रोज १ योगासन करा; स्लिम होईल पोट

Effective Yoga For Belly Fat (Pot kami karnyache upay) कामाच्या गडबडीत व्यायामासाठी अर्धा, एक तास काढणंही खूप कठीण होतं. अशावेळी तुम्ही घरच्याघरी व्यायाम करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 09:06 AM2023-10-08T09:06:00+5:302023-10-08T09:10:01+5:30

Effective Yoga For Belly Fat (Pot kami karnyache upay) कामाच्या गडबडीत व्यायामासाठी अर्धा, एक तास काढणंही खूप कठीण होतं. अशावेळी तुम्ही घरच्याघरी व्यायाम करू शकता.

Effective Yoga For Belly Fat : One Simple Yoga Asana To Reduce Belly Fat | ओटीपोट सुटलंय, व्यायामाचा कंटाळा येतो? अंथरुणात पडून रोज १ योगासन करा; स्लिम होईल पोट

ओटीपोट सुटलंय, व्यायामाचा कंटाळा येतो? अंथरुणात पडून रोज १ योगासन करा; स्लिम होईल पोट

सतत बसून बसून वजन वाढतं, आळस येतो यामुळे हळूहळू काहीही करण्याचा उत्साह राहत नाही.  बदलत्या वातावरणामुळे पोटाच्या समस्या उद्भवतात इतकंच नाही तर वजनात वाढ होते तर कधी पोट सुटतं. पोट मांड्या सुटल्यामुळे शरीर बेढब दिसतं. (Pot kami karnyache upay) व्यायामाला वेळ नसल्यामुळे प्रत्येकजण जीम, योगा क्लासला जातोच असं नाही. कामाच्या गडबडीत व्यायामासाठी अर्धा, एक तास काढणंही खूप कठीण होतं. अशावेळी तुम्ही घरच्याघरी व्यायाम करू शकता. (Effective Yoga For Belly Fat)

एक्सपर्ट्समते आहारात बदल केल्याने तसंच फळं-भाज्यांचा समावेश केल्याने शरीरयष्टीत बदल होऊ शकतात. चांगला आहार आणि फिजिकल एक्टिव्हीटीज करणंही तितकंच गरजेचं आहे. कधी कधी कामाचा इतका आळस येतो की आपण व्यवस्थित व्यायाम करू शकत ना सकाळी लवकर उठू शकत. कोणते योगासन केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते ते समजून घेऊ. (Yoga poses that target belly fat)

पोट कमी करण्यासाठी हलासन हे बेस्ट योगासन आहे.  हे आसन करताना पोटाचा खालचा भाग दाबला जातो. ज्यामुळे चरबी वेगाने कमी होण्यास मदत होते. हलासन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. Plow Pose नावानेही ओळखलं जातं. हे आसन केल्याने आरोग्याला बरेच फायदे मिळतात. 

हे आसन करताना जमिनीवर मॅट पसरवून कंबरेवर झोपून घ्या. दोन्ही हात मांड्यांजवळ ठेवा. नंतर श्वास घेताना हळूहळू पायांना सरळ वरच्या दिशेने उचला. नंतर पुन्हा खाली आणा. डोकं वर उचलून २ ते ३ मिनिटांनी पुन्हा सामान्य स्थितीत या. 

रात्रीच्या जेवणात चपाती खावी की भात? वजन कमी करण्यासाठी काय उत्तम, तज्ज्ञ सांगतात...

हलासन करण्याचे फायदे

हलासन केल्याने फक्त पोटाची चरबी कमी होत नाही तर शरीरसु्दधा फिट राहते. याशिवाय  शरीर योग्य आकारात येते. हे आसन केल्याने मेटाबॉलिझ्म वेगाने होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.  डायबिटीसग्रस्त महिलांसाठी हलासन एका वरदानाप्रमाणे आहे. यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.  यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासूनही आराम मिळतो. 

रात्री भिजवून सकाळी खा ५ पदार्थ; प्रोटीन-व्हिटामीन भरपूर मिळेल, गॅस-पोटाचे त्रास होतील दूर

हलासन कधी करावे?

भरलेल्या पोटाने हे आसन करू नका, पोट रिकामं असताना  आसन केल्याने अधिकाधिक फायदे मिळतील. आर्थरायटिस आणि मानेच्या वेदनांनी त्रस्त असाल तर हलासन करू नका. प्रेग्नंट महिलांनीही हे आसन करू नये. हाय ब्लड प्रेशर किंवा अस्थमा असलेल्या रुग्णांनी हे आसन करू नये. 

Web Title: Effective Yoga For Belly Fat : One Simple Yoga Asana To Reduce Belly Fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.