Join us  

घोरण्याच्या सवयीमुळे चारचौघांत लाज वाटते? ३ सोपे उपाय करून बघा, घोरणं कमी होईल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2022 12:47 PM

Home Remedies to Reduce Snoring Habits: घोरण्याच्या सवयीमुळे अनेक जणांना चारचौघांत झोपण्याची लाज वाटते. ही सवय कमी करण्यासाठी करून बघा ३ सोपे उपाय..

ठळक मुद्देघोरण्याची सवय कमी करायची तर हे काही उपाय करून बघा..

वयाचा एक ठराविक टप्पा ओलांडला की अनेक जण झोपल्यावर घोरू लागतात. सुरुवातील सावकाश असणारं घोरणं नंतर नंतर मात्र अगदी जोरजोरात सुरू होतं. ही सवय खरंतर घोरणाऱ्या प्रत्येकालाच लाजिरवाणी वाटते. पण एकदा झोप लागल्यानंतर त्यांचेही स्वत:वर नियंत्रण नसते. मग घोरणं थांबवणार तरी कसं, असा प्रश्न पडतो. शिवाय घोरणारं माणूस जवळ झोपलं की त्याच्या आसपास झोपणाऱ्या इतर लोकांच्या झोपेचाही पार खोळंबा होऊन जातो. त्यामुळे तर घोरण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींना आणखीनच ऑकवर्ड होतं. म्हणूनच ही सवय कमी करायची तर हे काही उपाय करून बघा..(How to stop snoring at night?)

घोरण्याची सवय कमी करण्यासाठी..हे उपाय इन्स्टाग्रामच्या naturalcure.24h या पेजवर सांगण्यात आले आहेत. हे उपाय झोपण्यापुर्वी करून बघावेत. काही दिवसांत घोरण्याचं प्रमाण कमी झालेलं जाणवेल.

अशा पद्धतीने मोबाईल पकडाल तर हमखास पाठदुखी- खांदेदुखी छळणार.. बघा मोबाईल पकडण्याच्या ३ चुकीच्या पद्धती१. पहिला उपायहा उपाय करण्यासाठी दोन्ही तळहातावर अंगठ्याच्या खालचा जो उंचवटा असतो, तो एकमेकांवर गोलाकार पद्धतीने घासा. साधारण १०० वेळा ही क्रिया करा.

 

२. दुसरा उपायपहिला उपाय केल्यानंतर लगेचच हा उपाय करावा. यामध्ये दोन्ही हाताचे जे अंगठे आहेत, त्याच्या मागील बाजूने जो उंचवटा असतो तो एकमेकांवर गोलाकार पद्धतीने घासावा. म्हणजेच आधी पहिला उपाय करताना आपण तळहातावरचा जो भाग एकमेकांवर घासला त्याच्या बरोबर विरुद्ध भाग एकमेकांवर घासावा. ही क्रियाही साधारणपणे १०० वेळा करावी.

 

३. तिसरा उपायज्या लोकांना पाठीवर झोपण्याची सवय असते, ते लोक जास्त घोरतात असं एक निरिक्षण आहे. त्यामुळे झोपताना सहसा उजव्या कुशीवर झोपावे.

केसांसाठी ५ प्रकारचे होममेड हेअर स्प्रे! केसांची नेमकी समस्या ओळखा आणि त्यानुसार हेअर स्प्रे वापरा

त्यामुळेही घोरण्याचं प्रमाण कमी होऊ शकेल. शिवाय जे लोक खूप थकतात, ते लोक जास्त घोरतात, असंही म्हटलं जातं. त्यामुळे थाेडं काम कमी करण्याचा प्रयत्न करा. 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामहोम रेमेडी