Join us  

तरूणपणातच गुडघे, कंबर दुखणं वाढलं? रोज सकाळी १ लाडू खा-कॅल्शियम, प्रोटीन भरपूर मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 4:58 PM

How to make immunity Booster ladoo : ड्रायफ्रुट्सचे लाडू शरीरासाठी फायदेशीर ठरतात. या लाडूंमुळे शरीराला पुरेपूर उर्जा मिळते.

सकाळी उठल्यानंतर कमकुवतपणा, थकवा जाणवतो आणि दिवसभर जराही उत्साही वाटत नाही. अशी तक्रार अनेकांची असते. यामुळे तुमच्या रोजच्या कार्य पद्धतीवरही परिणाम होतो. अनेकांना कमी वयातच हाडं कमकुवत होण्याचा त्रास जाणवतो. (Healthy Immunity Booster Ladoo rich in Vitamins)

तासनतास बसल्यामुळे पाठ, कंबर दुखण्याचा त्रास जाणवतो. कमी वयात उद्भवणारे हे त्रास टाळण्यासाठी आणि कमकुवतपणा दूर करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी घरच्याघरी बनवलेले पौष्टीक लाडू खाऊ शकता.  कोणत्या प्रकारे लाडू खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळते पाहूया. (Energy booster ladoo)

ड्रायफ्रुट्स लाडू 

ड्रायफ्रुट्सचे लाडू शरीरासाठी फायदेशीर ठरतात. या लाडूंमुळे शरीराला पुरेपूर उर्जा मिळते. सकाळी ड्रायफ्रुट्सचा एक लाडू खाल्ल्याने दिवसभर शरीर एनर्जेटिक राहते. ड्रायफ्रुट्स लाडू ब्रेकफास्टसाठी एक उत्तम पर्याय आहे. ड्राय फ्रुट्सचा लाडू बनवणं खूप सोपं आहे. हे लाडू १ ते २ महिने चांगले टिकून राहतात.

लिंकाचे लाडू

डिंकाचे लाडू चवीला फार उत्तम असतात. या लाडूंची खासियत अशी की हे लाडू हाडांना मजबूत बनवण्याचे काम करतात. डिंकाचे लाडू हाडांना मजबूत बनवतात. कारण यात कॅल्शियम आणि प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. हेल्दी हाडं आणि इम्यूनिटी वाढवण्यासही फायदेशीर ठरतात. डिंकातील एंटी ऑक्सिडेंट्स कमकुवतपणा थकवा दूर करतात. 

शेंगदाणे आणि तिळाचे लाडू

शेंगदाणे आणि तिळापासून बनवलेले लाडू खाल्ल्याने एनर्जी वाढते. यात व्हिटामीन्स आणि कॅल्शियम देणारे घटक असतात. यामुळे मांसपेशींची ताकद वाढते. याशिवाय शरीरात उष्णता तयार होते. सुस्ती, थकवा येत नाही. घरच्याघरी तुम्ही तिळाचे लाडू करून खाऊ शकता. 

अक्रोडचे लाडू

अक्रोडचे लाडू खायला फार रुचकर आणि चविष्ट असतात. याची  खासियत अशी की यातून मिळणारे ओमेगा-३ ब्रेन बुस्टर, एनर्जी बुस्टरचे काम करतात. सकाळच्या नाश्त्याला या पदार्थांचे सेवन केल्याने दिवसभर शरीर एक्टिव्ह राहतं. एनर्जी वाढवण्यासाठी या प्रकारच्या लाडवांचे सेवन करू शकता. 

सुंठाचे लाडू

सुंठाचे लाडू  नेहमीच फायदेशीर मानले जातात. साधारणपणे प्रेग्नंसीनंतर कमकुवतपणा दूर करण्यासाठी आणि ब्रेस्ट मिल्क वाढवण्यासाठी तुम्ही या लाडूंचे सेवन करू शकता. आल्याची पावडर मिसळून हे लाडू तयार केले जाता. यात ड्रायफ्रुट्सही असतात. सुंठात अनेक एंटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराला एनर्जी देतात. यात एंटी इफ्लेमेटरी गुण असतात जे वेदना दूर करण्यास मदत करतात.

टॅग्स :हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स