Join us  

जिम लावायचं ठरवताय? ट्रेनरला विचारा ३ प्रश्न, नाहीतर जिम लावलं तरी उपयोग शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 4:47 PM

Want to join gym: नव्या वर्षात हमखास जिम जॉईन करणारच, असा निर्धार अनेक जणांचा असतो. जिम जॉईन करायचं असेल तर जिममध्ये असणाऱ्या सुविधांविषयी हे काही प्रश्न तुम्ही ट्रेनरला विचारलेच पाहिजेत...

ठळक मुद्देआपण जे जिम जॉईन करू ते परफेक्ट असावंच, असं प्रत्येकीला वाटतं. पण परफेक्ट जिम म्हणजे काय, हेच अनेकदा आपल्याला समजत नाही.

नव्या वर्षी अमूक करणार, तमूक करणार असे काही निर्धार आपण नक्की केलेले असतात. यातल्या बऱ्याचशा गोष्टी फिटनेस (fitness) आणि आरोग्य यांच्याशी निगडित असतात. कुणाला नियमित वॉकींग (walking) करायचा असतं, तर कुणाला नियमित डाएट (diet) करायचं असतात. तसंच नव्या वर्षी आपण जिम जॉईन करू (Ensure these 3 things before joining gym) या, असा विचारही अनेक जणांनी केलेला असतो. 

 

मग जिम शोधण्याचा प्रयत्न सुरू होतो. त्यातही महिलांना, तरूणींना जिम लावायचं असेल, तर हा शोध आणखीनच बारकाईने केला जातो. आपण जे जिम जॉईन करू ते परफेक्ट असावंच, असं प्रत्येकीला वाटतं. पण परफेक्ट जिम म्हणजे काय, हेच अनेकदा आपल्याला समजत नाही. म्हणूनच तर जिम जॉईन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, कोणत्या बाबी जिममध्ये आहेत की नाहीत, हे तपासाव्या हे जाणून घेण्यासाठी या काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या..

फिटनेस ट्रेनर रुपा बाबला सांगतात की आपण जेव्हा जिम जॉईन करायला जातो तेव्हा या काही गोष्टी जिममध्ये आहेत की नाही, हे प्रत्येक व्यक्तीने तपासून पाहिले पाहिजे. स्पेशली महिलांनी जिम लावताना तर या काही गोष्टींची काळजी निश्चितच घेतली पाहिजे. 

 

१. प्रशिक्षित ट्रेनर आणि फ्रेंडली स्टाफ (qualified trainer and friendly staff)जिम जॉईन करायचं असेल, तर ही गोष्ट निश्चितच तपासून पाहिली पाहिजे. काही जिममध्ये प्रशिक्षित ट्रेनर खूप कमी असतात. त्यांच्या खालोखाल  जो स्टाफ काम करतो, तो प्रशिक्षित असेलच असं काही नसतं. त्यामुळे आपल्याला नेमकं कोण शिकवणार, त्यांनी त्या क्षेत्रातलं योग्य प्रशिक्षण घेतलं आहे का, याची खातरजमा अवश्य करून घ्यावी. त्यासोबतच तिथे काम करणारा जो स्टाफ आहे तो देखील फ्रेंडली असावा, जेणेकरून जिममध्ये आपण स्वत:ला चटकन ॲडजस्ट करू शकतो आणि ऑकवर्डनेस कमी झाल्याने जोमाने काम करता येते.

 

२. स्वच्छता आणि तिथलं वातावरण (cleanliness and ambience)आजकाल कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर तर प्रत्येकाने स्वच्छतेची काळजी घेतलीच पाहिजे. त्यामुळे तुम्ही जी जिम जॉईन करणार ती अशी असावी, जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाईल. तसंच तिथलं वातावरण देखील प्रसन्न असावं, जेणेकरून दररोज सकाळी जिममध्ये जावं असं मनापासून वाटेल. त्यामुळे जिममध्ये व्यायाम करताना मन रमावं यासाठी जिमची स्वच्छता आणि तिथलं वातावरण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

 

३. तिथे येणारे लोक (descent crowd)स्पेशली महिला आणि तरुणींचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरतो. जिममध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलेला सुरक्षित वाटायला हवे. त्यामुळे आपण ज्या जिममध्ये जाणार आहोत, तिथे जाऊन दोन- तीन वेळा भेट द्या. तिथे वेगवेगळ्या बॅचेसमध्ये येणारे लोक कसे आहेत, ते बघा. या लोकांसोबत व्यायाम करणं आपल्याला खरोखरंच कर्म्फटेबल वाटणार आहे का, असं स्वत:ला विचारुन बघा आणि जर सगळं याेग्य, जमण्यासारखं वाटलं तरच जीम जॉईन करण्याचा निर्णय घ्या. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सव्यायाम