Lokmat Sakhi >Fitness > Evening Workout: सकाळी व्यायामाला वेळच नाही, तर रात्री व्यायाम करावा का? काय त्याचे फायदे- तोटे?

Evening Workout: सकाळी व्यायामाला वेळच नाही, तर रात्री व्यायाम करावा का? काय त्याचे फायदे- तोटे?

Fitness Tips: नियमित व्यायाम न करण्याचं अनेक महिलांचं हेच तर कारण असतं.. सकाळी व्यायामासाठी वेळ मिळत नाही आणि सायंकाळी किंवा रात्री व्यायाम (Evening Workout is beneficial or not?) करावा की नाही, हे कळत नाही....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 06:14 PM2022-03-05T18:14:57+5:302022-03-05T18:18:19+5:30

Fitness Tips: नियमित व्यायाम न करण्याचं अनेक महिलांचं हेच तर कारण असतं.. सकाळी व्यायामासाठी वेळ मिळत नाही आणि सायंकाळी किंवा रात्री व्यायाम (Evening Workout is beneficial or not?) करावा की नाही, हे कळत नाही....

Evening Workout: No time for exercise in the morning? What are the advantages and disadvantages of Evening Workout? | Evening Workout: सकाळी व्यायामाला वेळच नाही, तर रात्री व्यायाम करावा का? काय त्याचे फायदे- तोटे?

Evening Workout: सकाळी व्यायामाला वेळच नाही, तर रात्री व्यायाम करावा का? काय त्याचे फायदे- तोटे?

Highlightsखूप इच्छा असूनही सकाळी व्यायामासाठी वेळ काढू शकत नाहीत. मग अशा महिलांनी रात्री किंवा सायंकाळी व्यायाम करावा का?

पुरुष मंडळींना स्वयंपाक करून ना कुणाचे डबे भरायचे असतात, ना घरातल्या प्रत्येक लहान- मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं असतं.. म्हणून त्यांचं आपलं बरं असतं. सकाळी आपापल्या वेळेला उठून त्यांना त्यांचा व्यायाम, योगा नियमित करता येतो. पण बायकांचं मात्र तसं नसतं.. दिवसातला त्यांचा सगळ्यात गडबडीचा वेळ म्हणजे सकाळचा. मग ती स्त्री गृहिणी असो किंवा मग वर्किंग वुमन. त्यामुळे खूप इच्छा असूनही त्या सकाळी व्यायामासाठी वेळ काढू शकत नाहीत. मग अशा महिलांनी रात्री किंवा सायंकाळी व्यायाम करावा का? सायंकाळचा व्यायामही फायदेशीर (Benefits of Evening Workout) ठरू शकतो का? ही घ्या तुमच्या मनातल्या या सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरं.. 

 

१. व्यायाम करणं महत्त्वाचं..
ॲक्टीव्ह राहण्यासाठी आणि फिटनेस जपण्यासाठी तुम्ही दिवसातून अर्धा ते पाऊण तास नियमितपणे व्यायाम करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी तुमच्या सवडीनुसार कधीही व्यायाम करू शकता. व्यायाम करणं फक्त महत्त्वाचं... दिवसाअखेर तुमचा स्टॅमिना, स्नायुंची ताकद, लवचिकता या सगळ्या गोष्टी सकाळच्या तुलनेत वाढलेल्या असतात. त्यामुळे रात्री तुम्ही अधिक उत्स्फुर्तपणे व्यायाम करू शकता. 

 

२. थकवा होईल दूर...
दिवसभर एवढं थकलेय, आता पुन्हा सायंकाळी व्यायाम करायचा म्हटलं की आणखी थकून जाईल, असं म्हणून सायंकाळी व्यायाम करण्याचा कंटाळा करू नका. उलट सायंकाळी झालेला व्यायाम तुमचा दिवस भरातला थकवा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो, असं काही फिटनेस तज्ज्ञांचं मत आहे. दिवसभराचा स्ट्रेस रिलीज करण्याच्या उद्देशानेही सायंकाळचा व्यायाम उपयुक्त ठरतो. 

 

३. रात्री शांत झोप येते..
ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, त्यांच्यासाठी रात्रीचा व्यायाम करणे, अधिक फायदेशीर ठरते. फक्त रात्री खूप हेवी वर्कआऊट करू नये. हलका ते मध्यम स्वरुपाचा व्यायाम रात्री केला तर चालतो. 


 

Web Title: Evening Workout: No time for exercise in the morning? What are the advantages and disadvantages of Evening Workout?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.