Lokmat Sakhi >Fitness > लॅपटॉप, कम्प्युटरवर सतत काम करून मान- पाठ दुखतेय? शिल्पा शेट्टी सांगतेय १ खास व्यायाम

लॅपटॉप, कम्प्युटरवर सतत काम करून मान- पाठ दुखतेय? शिल्पा शेट्टी सांगतेय १ खास व्यायाम

Fitness Tips For Reducing Back Pain: शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) सांगितलेला हा एक व्यायाम करून पाहा. १० मिनिटांतच मान- पाठ मोकळी होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2023 08:50 AM2023-11-01T08:50:31+5:302023-11-01T08:51:22+5:30

Fitness Tips For Reducing Back Pain: शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) सांगितलेला हा एक व्यायाम करून पाहा. १० मिनिटांतच मान- पाठ मोकळी होईल.

Exercise by Shilpa Shetty to reduce back pain due to constant working on computer and laptop | लॅपटॉप, कम्प्युटरवर सतत काम करून मान- पाठ दुखतेय? शिल्पा शेट्टी सांगतेय १ खास व्यायाम

लॅपटॉप, कम्प्युटरवर सतत काम करून मान- पाठ दुखतेय? शिल्पा शेट्टी सांगतेय १ खास व्यायाम

Highlightsअसा व्यायाम केल्यास लगेचच पाठ- मान मोकळी होईल, असं शिल्पा शेट्टी सांगतेय. 

कामानिमित्त काहीजणांना सतत लॅपटॉप- कम्प्युटर वापरावं लागतं. बऱ्याचदा सिटिंग अरेंजमेंट चुकीची असते. त्यामुळे अवघडलेल्या स्थितीत बसून काम करावं लागतं. किंवा काही जण वर्क फ्रॉम होम करतात. त्यावेळी ते त्यांच्या बसण्याच्या पोझिशनची अजिबातच काळजी करत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. गादीवर, सोफ्यावर जिथे जमेल तिथे बसून काम करतात. त्यामुळे मग काही दिवसांतच मान- पाठ दुखायला लागते. सगळं शरीरच आखडून जाते. तुमचंही तासनतास काम केल्याने असंच झालं असेल तर शिल्पा शेट्टी सांगतेय तो व्यायाम करून पाहा. लगेच आराम मिळेल. (Exercise to reduce back pain due to constant working on computer and laptop)

 

मान- पाठ दुखत असेल तर व्यायाम

शिल्पा शेट्टी दर आठवड्याला फिटनेस मोटीव्हेशन देत असते. त्यानुसार या आठवड्यातही तिने एक वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने मान- पाठ- कंबर आखडून गेली असेल तर कोणता व्यायाम करावा, याविषयी माहिती दिली आहे.

तुमचीही मुलं आहेत हुशार पण आत्मविश्वास कमी पडतो? करा ३ गोष्टी- मुलांचा कॉन्फिडन्स चटकन वाढेल

या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टीने एका बॉलचा वापर केला आहे. हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी तर सतरंजी किंवा योगा मॅट जमिनीवर अंथरा. त्यानंतर त्या मॅटवर पालथे झोपा. यानंतर उजव्या हातात बॉल धरा. उजव्या हाताने बॉल खांद्यावरून वर करा आणि डावा हात कंबरेवरून वर घेऊन उजव्या हातातला बॉल पकडा

 

आता अशीच क्रिया डाव्या हाताने करावी. डाव्या हातात बॉल धरल्यानंतर डावा हात डाव्या खांद्यावरून मागे करा आणि उजवा हात कंबरेवरून वर घ्या. आता डाव्या हातातला बॉल उजव्या हातात घ्या. म्हणजेच ज्या हातात बॉल आहे, तो हात वर असावा.

झगमग झगमग स्वस्तात मस्त लायटिंगच्या माळा घ्यायच्या? बघा पर्याय, न उडणाऱ्या माळांचा लखलखाट

ही क्रिया दोन्ही हाताने प्रत्येकी १० वेळा करावी. असा व्यायाम केल्यास लगेचच पाठ- मान मोकळी होईल, असं शिल्पा शेट्टी सांगतेय. 

 

Web Title: Exercise by Shilpa Shetty to reduce back pain due to constant working on computer and laptop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.