हल्ली बहुतांश जणांचं कामाचं स्वरुप बदललं आहे. तासनतास एकाच जागी बसून काम करावं लागतं. ऑफिसमध्ये असताना किंवा वर्क फ्रॉम होम करताना वारंवार उठून जमत नाही. कारण त्यामुळे कामाची लिंक तुटते. पण त्यामुळे मात्र पाय चांगलेच आखडून जातात. कधी कधी तर जास्त बसल्यामुळे पाय दुखतात. किंवा काही वेळा लांबचा प्रवास असेल तर प्रवासामुळे पाय आखडून जातात. अशा कोणत्याही परिस्थितीमुळे पाय आखडून गेले असतील, दुखत असतील तर त्यांना मोकळं करण्यासाठी कोणते व्यायाम करावेत ते पाहा....(How to overcome leg pain or leg cramping due to long sitting or travelling?)
आखडून गेलेले पाय मोकळे करण्यासाठी कोणते व्यायाम करावे?
बसून बसून पाय आखडून गेले असतील किंवा त्यांच्यावर सूज आली असेल तर कोणते व्यायाम करावे, याविषयीची माहिती अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree) हिने एका व्हिडिओद्वारे शेअर केली आहे. यामध्ये तिने एकदम सोपे असे ३ व्यायाम सुचविले आहेत.
ब्रेड न वापरता करा भरपूर प्रोटिन्स देणारं सुपरहेल्दी सॅण्डविच- मुलांनाही आवडेल, बघा रेसिपी
यामध्ये सगळ्यात पहिला व्यायाम म्हणजे सुरुवातीला पायाची बोटे एकमेकांपासून थोडे लांब करण्याचा प्रयत्न करा. यामुळे बोटांच्या स्नायुंचा व्यायाम होईल. त्यानंतर तळपाय पुढच्या बाजुने शक्य तेवढे झुकवा आणि त्यानंतर मागे ओढून त्यांच्यावर थोडा ताण द्या. साधारणपणे ५- ५ वेळा हा व्यायाम करा.
यानंतर दुसऱ्या व्यायामात तळपाय एकदा बाहेरच्या बाजुने झुकवा आणि नंतर पुन्हा आत घ्या. हा व्यायामही दोन्ही बाजुंनी साधारण ५- ५ वेळा करावा.
धूळ बसून खिडक्यांची जाळी काळपट झाली? १ सोपा उपाय- ५ मिनिटांत खिडक्या चकाचक...
वरील दोन व्यायाम झाल्यानंतर तिसरा व्यायाम करताना तळपाय क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने गोलाकार फिरवा. हा व्यायामही दोन्ही बाजुंनी प्रत्येकी ५- ५ वेळा करावा. हे व्यायाम केल्याने तळपायासोबतच पोटरी, मांड्या या भागांतले स्नायू मोकळे होतील. तसेच तळपायाचे जॉईंट्स, गुडघे, हिप्स जॉईंट यांचाही व्यायाम होईल आणि लवकर आराम मिळेल. पायांवर सूज आली असेल तर ती देखील उतरण्यास मदत होईल.