अशक्तपणामुळे किंवा मग सतत तासनतास खाली वाकून काम लॅपटॉप, कॅम्प्यूटरवर काम केल्यामुळे अनेक जणांना तसंच वाकून बसण्याची, चालण्याची, उभं राहण्याची सवय लागते. आपण ज्या पद्धतीने चालतो किंवा उभे राहतो, बसतो हे चुकीचं आहे हे समजतं. पण तरीही त्यांच्याही नकळत पाठीला बाक येतो किंवा पाठ वाकली जाते. सतत याच अवस्थेत पाठीचा कणा राहीला तर मग लवकरच पाठदुखीही मागे लागते. सतत पाठ- कंबर दुखते. तुमचंही असंच होत असेल तर हे काही व्यायाम (Exercise) करून बघा (How to correct body posture). यामुळे बॉडी पोश्चर सुधारण्यास तर मदत होईलच पण पाठदुखीही कमी होईल.(How to reduce back pain?)
बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी व्यायाम हे काही व्यायाम इन्स्टाग्रामच्या viola_aurelia01 या पेजवर शेअर करण्यात आले आहेत. अगदी सोपे आणि ५ ते ७ मिनिटांत होणारे हे व्यायाम आहेत. दिवसभरातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कधीही तुम्ही ते करू शकता. यातला प्रत्येक व्यायाम १०- १० वेळा करावा.
१. पहिल्या व्यायामात दोन्ही हात कोपऱ्यातून वाकवा. तळहात डोळ्यांसमाेर ठेवा आणि त्यांच्या मुठी घाला. आता दोन्ही हात एकाच वेळी फिरवा आणि कानांच्या बाजूला न्या. पुन्हा डोळ्यांच्या समोर घ्या. असे १० वेळा तरी करा.
२. दुसऱ्या व्यायामात दोन्ही हात कंबरेच्या दोन्ही बाजूने ठेवा. यावेळी हाताचे तळवे आपल्या समोर असावेत. आता दोन्ही हात एकाचवेळी फिरवा आणि कंबरेच्या आजूबाजुने येतील, असे ठेवा. पुन्हा हात समोरच्या बाजूने फिरवा.
तिखटाला जाळं लागून वर्षभराचं तिखट भुरकट- खराब होतं? करा फक्त २ गोष्टी, तिखट वर्षभर राहील लालेलाल
३. तिसऱ्या व्यायामात दोन्ही हाताचे तळवे डोक्याच्या खालच्या बाजुला मानेजवळ ठेवा. यानंतर दोन्ही हातांचे कोपरे एकाचवेळी पुढे आणि त्यानंतर मागे अशा पद्धतीने हलवा.
४. चौथ्या व्यायामात दोन्ही हात वर करा. त्यानंतर कोपऱ्यात वाकवून खाली घ्या आणि नंतर खांद्यालगत दोन्ही बाजूंनी घ्या. त्यानंतर पुन्हा वर घ्या. असं एकानंतर एक १० वेळा करा.